महाभूतविवेक प्रकरणम् - श्लोक २० ते २४

वामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते


वृक्षस्य स्वगतो भेद: पत्रपुष्पफलादिभि: ॥
वृक्षांतरात् सजातीयो विजातीय: शिलादित: ॥२०॥

मुळीं भेद असती त्रय ॥ स्वगत सजातीय विजातीय ॥
जैसा वृक्षाचा स्वगत भेद होय ॥ पत्र पुष्प फलादि ॥८५॥
अन्य वृक्षांच्या जाती ॥ ते सजातीय भेद होती ॥
मनुष्य पाणी शिलादि होती ॥ विजातीय भेद ॥८६॥

तथा सद्वस्तुनो भेदत्रयं प्राप्तं निवार्यते ॥
ऐक्यावधारणद्वैतप्रतिषेधैस्त्रिभि: क्रमात् ॥२१॥

ऐसे हे भेदत्रय झाले ॥ परि ते सद्वस्तुशीं नाहीं स्पर्शिले ॥
“एक मेवाद्वितीयं” ऐसें बोले ॥ श्रुति माता ॥८७॥
म्हणोनी भेदत्रयारहित ॥ सद्वस्तु असे निभ्रांत ॥
तेंचि क्रमानें प्रतिपादित ॥ करुं आतां ॥८८॥

सतो नावयवा: शंक्यास्तद्शंस्यानिरुपणात् ॥
नामरूपे न तस्यांशौ तयोरद्याप्यनुद्भवात् ॥२२॥
नामरूपे भवस्यैव सृष्टित्वात्सृष्टित: पुरा ॥
न तयोरुद्भवो तस्मान्निरंशं सद्यतो वियत् ॥२३॥

निरंश अवयव रहित ॥ सद्वस्तु सदां असत ॥
तेथें नामरूपादि प्रकार होत ॥ कवणें काळीं ॥८९॥
मुळींच झालें नाहीं उद्भव ॥ तेथें नामारूपाचा कैचा सद्भाव ॥
आकाशवत वस्तु निरवयव ॥ सदां सर्वदां ॥९०॥
नाहीं जेथें अवयव ॥ तेथें स्वगत भेदाचा कैचा ठावा ॥
वस्तु ठाईं असे अभाव ॥ सकल भेदाचा ॥९१॥

सदंतरं सजातीयं न वैलक्षण्यवर्जनात् ॥
नामरूपो पाधिभेदं विना नैव सतो भिदा ॥२४॥

नामरूप गुण लक्षण वर्जित ॥ वस्तु असे सदोदीत ॥
तेथें सजातीय भेद होत ॥ कवण्या गुणें ॥९२॥
नामरूपा वांचून ॥ भेदासी नसे ठाण ॥
आतां भेद कोठून ॥ सजातीय येई ॥९३॥
घटाकाश मठाकाश ॥ तैसा उपाधी भेद भासत ॥
तैसाही न स्पर्शत ॥ वस्तुचे ठाई ॥९४॥
कोठें ऐकिलें ना देखिलें ॥ वस्तु सजातीय पुढें आलें ॥
तात्पर्य भेद रहित संचले ॥ वस्तु जैशाचें तैसें ॥९५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 29, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP