महाभूतविवेक प्रकरणम् - श्लोक १३ ते १६

वामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते


अक्षेष्वर्थार्पितेष्वेतत्‌गुणदोषविचारकम् ॥
सत्वं रजस्तमश्चास्य गुणा विक्रियते हि तै: ॥१३॥

इंद्रियें घेतां विषय गोडी ॥ तेथें हें आवडी निवडी ॥
गुणदोषाची परवडी ॥ करीतसे ॥५२॥
आतां हा विषय पुरे ॥ इयाची गोडी आणीख घ्यारे ॥
येणें येणें नानाप्रकारें ॥ आज्ञा करितसे ॥५३॥
हें नाहीं ज्या कामीं ॥ तेथें इंद्रियें असून निकामी ॥
ऐसें हें पराक्रमी ॥ वर्ततसे ॥५४॥
सत्व रज तमोगुणें ॥ हें विकारी होतसे जाणे ॥
तयाची ही पृथक्करणें ॥ दाऊं पुढती ॥५५॥

वैराग्यं शांतिरौदार्यमित्याद्य: सत्वसंभवा: ॥
कामक्रोधौ लोभयत्नामित्याद्या रजसोस्थिता: ॥१४॥
आलस्य भ्रांतितंत्राद्या विकारास्तमसोस्थिता: ॥
सात्विकै: पुण्यनिष्पत्ति: पापोत्पत्तिश्च राजसै: ॥१५॥
तामसैर्नोभयं किं तु वृथायु: क्षपणंभवेत् ॥
अवाहंप्रत्ययी कर्तेत्येवं लोकव्यवस्थिति: ॥१६॥

होतांचि सत्वांचा संभव ॥ लाधे वैराग्य शांति औदार्य ठेव ॥
आणीखही नाना वैभव ॥ आपोआप येतें ॥५६॥
काम क्रोध लोभ ॥ मद मत्सर आणि दंभ ॥
नाना यत्न होती स्वयंभ ॥ रजोद्भवीं ॥५७॥
आलस्य निद्रा भ्रांति ॥ तमोगुणीं उद्भवती ॥
आणखीही नाना जाती ॥ मूर्खपणाच्या ॥५८॥
सात्विक गुणाचेनि योगें ॥ पुण्य व्हावया लागे ॥
राजसाचे निसंगें ॥ पापोत्पत्ति ॥६९॥
तामस गुई दोन्ही नाहीं ॥ व्यर्थ आयुष्य जातें पाहीं ॥
ऐसें हें मनचि पाहीं ॥ नाना विकारीं होतसे ॥६०॥
ऐसें जें कां मन ॥ तयाचाही स्वामी आंपण ॥
अहं प्रत्ययी होऊन ॥ कार्य करी ॥६१॥
गीते माजी परमात्मा ॥ बोलियेले “अहं आत्मा” ॥
आदि मध्य अंत ग्रामा ॥ भूतीं असे ॥६२॥
लोकींही हीच स्थिति ॥ कार्य कारी त्यातें प्रभु म्हणती ॥
म्हणोनी अहमात्मा निश्चिती ॥ मुख्य येथींचा ॥६३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 29, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP