महाभूतविवेक प्रकरणम् - श्लोक १० ते १२

वामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते


पंचोत्त्क्यादानगमनविसर्गानंदका: क्रिया: ॥
कृषिवाणिज्यसेवाद्या: पंचस्वतर्भवंति हि ॥१०॥
वाक्पाणिपादपायूपस्थैरक्षैस्तत्क्रियाजनि: ॥
मुखादिगोलकेष्वास्ते तत्कर्मेद्रियपंचकं ॥११॥

मुख गोलकीं राहूनी वाणी ॥ शब्दांचा करितसे ध्वनी ॥
हस्तद्वयीं राहुनी पाणि ॥ घेणें देणें करी ॥३५॥
पादद्वयीं राहुन ॥ करीतसे आक्रमण ॥
गुदीं करी मळाचें विसर्जन ॥ तत् इंद्रियें ॥३६॥
शिश्नीं भोगातें भोगुन ॥ आनंद करीतसे जाण ॥
मूत्र रेत विसर्जन ॥ हेंही करितसे ॥३७॥
कृषि वाणिज्य आणि सेवा ॥ आदि शब्दें सकल क्रियाजात अघवा ॥
करितसे इंद्रिय मेलावा ॥ यथायोग्य ॥४८॥
इंद्रियें गोलकांतरीं राहुन ॥ करिती विषयांची आठवण ॥
गोलकही तद्रूप होऊन ॥ नाचूं लागे ॥३९॥

मनोदशेंद्रियाध्यक्षं ह्रप्तद्मगोलके स्थितम् ॥
तच्चांत: करणं बाहयेष्वस्वातंत्र्याद्विनेंद्रियै: ॥१२॥

दशेंद्रियाचें अव्यक्षमन ॥ तें ह्रदकमलीं स्थित होऊन ॥
सकल इंद्रियें स्वाधनि ॥ घेऊनी वर्तें ॥४०॥
शरीरीं जातांति अन्न ॥ आंत वाटूनीं होतसे चूर्ण ॥
मग तें पातळ पदरीं गाळून ॥ चोथा गुदीं विसर्गी ॥४१॥
कांहीं वेळ तसेंची राहतें ॥ तेथें सत्व निघून पाणी वरती सांटतें ॥
तें मूत्र पिशवी झालें भरतें ॥ असार म्हणोनी ॥४२॥
मग उरतें जें का सार ॥ तया अग्री कढवी अनिवार ॥
तेंचि लाल होतसे रुधिर ॥ शरीर पोसावया लागीं ॥४३॥
तयाची जी सांठवण ॥ मांसाची होतसे गोठण ॥
तया ह्रदय हें नामाभिधान ॥ आलें असें ॥४४॥
तें अंगुष्ठमात्र गोल असे ॥ कमलकलिका साम्य दिसे ॥
द्वादश पाकळया भेदें वसे ॥ म्हणोनी ह्रदकमल ॥४५॥
तें अंतरीं असे पोकळ ॥ हेंचि मनाचें वसतिस्थळ ॥
इयाचीच नांवे सकळ ॥ अंत:करणादि ॥४६॥
बाहयइंद्रियां चालक ॥ सकल शरीरा पोषक ॥
येथून करीतसे देख ॥ एकलेंची ॥४७॥
तेथें तें रुधीर आणकीं कढे ॥ तेणें रेत अर्क दोन निवडे ॥
तेथेंच सकलशीरांचीं बिर्‍हाडें ॥ देह पोसक्या ॥४८॥
त्यांना रक्त रेताची करी वाटणी ॥ आपण तैजम अर्क खातसे आनुदिनीं ॥
म्हणोनी तैजस अभिमानी ॥ नाम पावलें ॥४९॥
असो ऐसें जें कां मन ॥ त्याचेंच नांव अंत:करण ॥
आंतील झालें साधन ॥ म्हणोनियां ॥५०॥
हयाचा स्वतंत्र कारभार ॥ सकल इंद्रियें याचे ताबेदार ॥
होंउनी करिती कारभार ॥ मना सारिखा ॥५१॥

N/A

References : N/A
Last Updated : November 29, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP