महाभूतविवेक प्रकरणम् - प्रारंभ

वामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते


हरि ॐ
आतां आम्हीं ऐसें करुं ॥ श्रोतया आर्दी नमस्कारूं ॥
अवधानाचाद एती चारू ॥ म्हणोनीयां ॥१॥
श्रोतया विण ॥ वत्त्क्या नव्हे वक्तेपण ॥
मायबापचि ते जाण ॥ वक्तयाचे ॥२॥
तत्वविवेक संपला ॥ परि तृप्तींढेंकर नाहीं दिला ॥
म्हणोनी भूतविवेकाला ॥ आरोगू पूढती ॥३॥
“सदैव सोम्येदमग्र आसीत्” ॥ इत्यादि घेउनी श्रुतिसिद्धार्थ ॥
नानापक्वान्नें करीत ॥ श्रीविद्यारण्यमुनी ॥४॥
तेथें मी वाढपी झालों ॥ चौगुणें वाढुं लागलों ॥
श्रोतसमुदाय लागला डोलें ॥ आनंदानें ॥५॥
ब्रम्हानिष्ठ भवाद्दश श्रोते ॥ तेथें माझे सतगुरु ही होते ॥
त्याना प्रेमाचें उचंबळलें भरितें ॥ शब्द लालित्यें ॥६॥
म्हणती आतां पुरेकरीं ॥ श्लोकार्थातें विवरीं ॥
किती वाढिशी वरचेवरी ॥ तृप्ती वरी तृप्ति ॥७॥
ऐकुनी सतगुरुच्या बोला ॥ लागलों मी व्याख्यानाला ॥
तो प्रथम श्लोक पुढें आला ॥ मुनिवर्यांचा ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : November 29, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP