साम्राज्यवामनटीका - श्लोक १ ते २०

वामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते


लब्ध चिन्मकरंदातें वर्णी वामन ग्रंथिं या ॥
अर्थानुभव हा घेतां मनोमोह न त्यागितां ।
मुरतें स्वसुखानंदीं सर्वही तोचि पांहु तें ॥१॥
यास्तौ अनुभूतिलेश नामें संपूर्ण ग्रंथ हा ।
करूनि अर्पिला पायीं शेषशायी हरीचिया ॥२॥
समश्लोकी असी टीका तो श्रीवत्सांक स्फूरवी ।
तसी करूनि ते अर्पी त्याच श्रीपदपंकजीं ॥३॥
सत्यज्ञानानन्त आत्मा असे बम्हाचि निश्चयें ।
असत् अज्ञान अल्पत्व निषेधानेंच जाणतो ॥४॥
आत्मा सत्य असद्देह अनित्य तद्विलक्षण ।
आत्मा देह नव्हे तेव्हां असे अन्य तयाहुनी ॥५॥
देहात्मता निषेधें या पंचभूतें समातृक ।
जातांतमोगुणें युक्त अन्नमय निषेध हा ॥६॥
आत्मा ज्ञान असे प्राण अज्ञान तद्विलक्षण ।
तेव्हां आत्मा नव्हे प्राण असे अन्य तयाहुनी ॥७॥
प्राणात्मता निषेधानें इंद्रियें द्विप्रकार ही ।
जातां रजोगुणासह निषेध प्राणकोश हा ॥८॥
आत्मा अनंतचि मन अल्पत्वें तद्विलक्षण ।
आत्मा तेव्हां मन नव्हे असे अन्य तयाहुनी ॥९॥
मनात्मतानिषेधानें चित्तबुद्धि अहं मन ।
जातां सत्त्वगुणेंयुक्त मनोमय निषेध तो ॥१०॥
कोशत्रयनिषेधें या आत्मता नाहिं जाणतां ।
दावी गुरु नखशिखें साक्षित्वीं मग त्याहि ती ॥११॥
देहीं ब्रम्हांडिंही तैसा जो देहद्वयतीत त्या ।
दिसे जेणें अहंराहू चंद्र आत्मा तयासची ॥१२॥
एवं कोशत्रयातीत आत्मा चंद्र तया मनें ।
अहंकृच्छाखेपरता पाहती सत्त्वदृष्टिनें ॥१३॥
प्रळयीं जें जरे शेष निषेध शेषही तसें ।
आदि अंतीं एकचि जें मध्येंही तें असेच कीं ॥१४॥
ब्रम्हांडीं प्रत्यकत्वें जे आत्मता कळतांच ते ।
ब्रम्हांड उत्पत्ति लय आत्मत्वीं मग जाणती ॥१५॥
सृष्टी प्रळयज्ञानानें कीं आत्मा सत्यकीरण ।
यास्तौ भासे जगजळ न तें सत्य असत्यचि ॥१६॥
देह द्रष्टा भिन्न स्थूळ सूक्ष्म देह चराचरा ।
साक्षित्वें जाणता सर्व वास सर्वत्र यास्तव ॥१७॥
कोशत्रय जडोपाधीनिषेधें आत्मसिद्धता ।
झाली मनोमया कोशीं शुद्धी ते वंपदात्मक ॥१८॥
न मोडे परि संस्कार अविद्येचे अनादि ते ।
मोडती तेहि विद्येनें जाणतां तत्पदात्मक ॥१९॥
जीवात्मता वंपदेंची तत्पदें परमास्मता ।
विद्याऽविद्योपाधित्यागें ब्रम्हा असें ‘असी’ पद ॥२०॥

N/A

References : N/A
Last Updated : November 29, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP