उपमेयोपमा अलंकार - लक्षण २

रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.


ह्या श्लोकांतील तिसर्‍या सदृश पदार्थाचें निवारण करण्याच्या उद्दे-शानें केलेल्या वर्णनाचा विषय असलेलें जें सादृश्य, त्यांत या उपमेयोपमा अलंकाराची अतिव्याप्ति होऊं नये, म्हणून वरील व्याख्येंत, परस्परं हे शब्द घातले आहेत. ( म्ह० परस्पर सादृश्य दोन वाक्यांत असेल तरच उपमेयापेमा, एरवीं नाहीं. ) लिंगभेद, वचनभेद वगैरे दोषामुळें बिघडणारें सादृश्य ह्या अलंकारांत येऊं नये, एवढ्याकरितां वरील व्याख्येंत सुंदर हा शब्द घातला आहे. आतां या उपमेचीं ( म्ह० उपमेयोपमेचीं ) उदाहरण देतो:-
“ हे सुंदरी, ( भेदरलेल्या डोळ्याच्या स्त्रिये, ) चंद्राच्या प्रभेप्रमाणें तों वाटतेस, व चंद्राची प्रभा तुझ्यासारखी वाटते; तुझा डोळा कमळासारखा आहे, व कमळ तुझ्या डोळ्यासारखें आहे ”
ही उपमेयोपमा दोन प्रकारची असते-(१) जिच्यातील धर्म सांगितलेला असतो ती; व (२) जिच्यांतील धर्म सूचित केलेला असतो ती. या दोहोपैकीं पहिल्या प्रकरची उपमेयोपमा, तिच्यांतील पूर्वीं सांगितलेल्या अनुगामी वगैरे धर्मांमुळें अनेक प्रकारची होते.
अनुगामी धर्म असलेल्या उपमेयोपमेचें उदाहरण-
“ सर्व वेदांच्या समूहांत व लोकांतही ही गोष्ट निर्विवाद समजली जाते कीं, गुरु हा शंकराप्रमाणे श्रेष्ठ आहे, व शंकर गुरुप्रमाणें श्रेष्ठ आहे. ”
बिंबप्रतिबिंबभावानें झालेल्या साधारण धर्माचें ( असा धर्म असलेल्या उपमेयोपमेचें उदाहरण-
“  सुंदर पुष्पगुच्छांनीं युक्त, व सुंदर कुचयुगुलानें शोभणार्‍या अशा ( अनुक्तमें ), लतेप्रमाणें सुंदर स्त्रिया शोभत होत्या; व सुंदर स्त्रियांप्रमाणें लता शोभत होत्या. ”
या श्लोकांत, रमणीय व सुंदरत्व ( विलसितत्व ) हीं दोन विशेषणें आणि युक्तत्व व शोभणार्‍या हीं दोन विशेष्यें, एकमेकांशी वस्तुप्रतिवस्तु रूपसंबध पावलीं आहेत; व ह्या विशेषणें व विशेष्यें यांच्यामध्यें सापडलेला व बिंबप्रतिबिंबभाव पावलेला, पुष्पगुच्छ व कुचयुगल एतद्रूप साधारणधर्म आहे. ( या साधारण धर्मानें झालेली उपमेयोपमा आहे. )
लक्षणेनें झालेला ( उपचरित धर्म ) -
“ दुष्टांचें ह्लदय वज्राप्रमाणें कठीण असतें; व दुष्टाच्या ह्लदयाप्रमाणें वज्र कठीण असतें; असें तू समज. ( त्याचप्रमाणें ), सज्जनांचा स्वभाव अमृताप्रमाणें गोड असतो; व अमृत, सज्जनांच्या स्वभावाप्रमाणें गोड असते. ( असेही तूं समज ) ”
केवळ श्लिष्ट शब्दांमुळे उत्पन्न झालेला साधारण धर्म -
“ या जगांत लांडग्याप्रमाणें दुष्ट मनुष्य अविरतचिन्त असतो. ( लांडग्याकडे लावतांना या विशेषणाचा अर्थ असा-अवि म्हणजे मेंढरू, त्याच्या विषयी म्हणजे त्याला खाण्याविषयीच्या विचारांत, जो मग्न: झालेला असतो तो; दुष्ट मनुष्याकडे लावतांना ह्याचा अर्थ असा-जो सतत दुसर्‍याचें वाईट करण्याचा विचार करीत असतो तो ) आणि सज्जनांचें चित्त भारता-प्रमाणें व सज्जनांच्या चित्ताप्रमाणें भारत सकृप असतें.( सकृत हे विशेषण भारताकडे लावतांना, त्याचा अर्य-क्रुपाचार्याचे ज्या महाभारतांत वर्णन आलें आहे तें; सज्जनांच्या चित्ताकडे लावतांना सकृप याचा अर्थ कृपेनें युक्त असा करावा. ) ”

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP