उपमालंकार - लक्षण २०

रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.


ह्या श्लोकांतील शेंदूर व संध्या ह्या दोन धर्मांत, तसेंच गणपति व आभाळ ह्या दोन धर्मांत, आपापसांत बिंबप्रतिबिंबभाव असल्यानें, त्यांचा अभेद कल्पून एक विशिष्ट धर्म तयार केला गेला आहे. आणि मग त्या विशिष्ट धर्माशीं, क्यड्‍चा अर्थ जो आचार तद्रूप अनुगामी धर्म, अभिन्नत्वानें राहिला आहे.
कुठें कुठें तो बिंबप्रतिबिंबभावयुक्त धर्म, अनुगामी धर्माशीं कार्यं-कारणसंबंधानेंही मिश्रित होऊन राहतो. जसें-
“ ह्याच्या विषांमुळें कांहीं अनिष्ट होइल म्हणून भिणार्‍या लोकां-कडून, साप जसा दुरूनच टाळला जातो, तसा कपटीपणाच्या दोषामुळें दुष्ट माणूस दुरूनच टाळला जातो. ”
ह्या श्लोकांत कपटीपणा व विष यांचा बिंबप्रतिबिंबभाव उघडच आह. ‘ दुरूनच टाळणें ’ हा येथील अनुगामी धर्म; ह्या अनुगामी धर्माला ( ( कार्याला ) बिंबप्रतिबिंबभावानें युक्त तो ( कापटय व विषरूपी ) साधारण धर्म तो कारण आहे. ( म्हणून येथें अनुगामी धर्माचें बिंबप्रतिबिंबभावापन्न धर्माशीं कार्यकारणभावसंबंधानेम मिश्रण झालें आहे. )
अथवा कार्यकारणभावानें मिश्रित होण्याचें हें दुसरें उदाहरण-बाहेरून पूर्णपणें पिकल्यामुळें पिवळ्याजर्द, पण आंतून कडू जहर, देणारी असते. ”
ह्या ठिकाणीं सुस्वरूप असणें व दु:ख देणें हे दोन अनुगामी धर्म-ह्या दोन धर्मांच्या मध्ये कडूपणा व क्तूरपणा हे दोन धर्म ( परस्पराशीं ) बिंब-प्रतिबिंबभावापन्न आहेत. व हे दोन धर्म दु:खदायित्व ह्या धर्माशीं कार्य-कारणभावासंबंधानें मिश्रित आहेत. ( म्हणजे क्रूरपणा व कडूपणा हें कारण व दु:खदायित्व हें कार्य असा संबंध ). आतां राहिला धर्म सुस्वरूप असणें हा. त्याच्याशीं क्रूरपणा व कडूपणा ह्या दोन धर्मांचें सामानाधिकरण्यसंबंधानें मिश्रण झालें आहे. म्हणजे ( हे तिन्ही धर्म एका ठिकाणीं राहतात, हा त्यांच्यांतला संबंध आहे. स्त्रीमध्यें सुस्वरूप असणें, हा धर्म राहातो; व क्तूरपणा हाही; अर्थात्‍ त्याच्याशीं बिंबप्रतिबिंबभावसंबंधानें अभेद पावलेला कडूपणा हाही धर्म स्त्रीच्या ठिकाणी राहतो. )
अशाच रीतीनें इतर प्रकारच्या साधारण धर्मांचें, इतरांशीं कोणत्या-तरी संबंधानें मिश्रण होतें. याशिवाय आणखी साधारण धर्माचे प्रकार स्वत: हुडकून काढणें, विद्वानांना शक्य आहे. जसें-
“ फुलांच्या झुपक्यांनीं लवलेल्या लवलेल्या लतेशीं, हे स्तनांनीं लवलेल्या स्त्रिये, तूं जशी अत्यंत सदृश आहेस, तशी ती पालवलेली लताही हे गर्विष्ठे, तुझ्या ओठाशीं सदृश आहे. ”

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP