मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत कर्ममेळांचे अभंग| अभंग १६ ते २० संत कर्ममेळांचे अभंग अभंग १ ते ५ अभंग ६ ते १० अभंग ११ ते १५ अभंग १६ ते २० अभंग २१ ते २७ संत कर्ममेळांचे अभंग - अभंग १६ ते २० संत कर्ममेळा हे संत चोखामेला यांच्या कुटुंबीयांपैकी एक होत. Tags : abhangkarmamelasantअभंगकर्ममेळासंत अभंग १६ ते २० Translation - भाषांतर १६) झालों परदेशी एकटा येकला । परी तुझा अंकिला दास देवा ॥१॥आतां बुझावण करणें तुम्हांसी । मी तो पायांपासी ठाव मागे ॥२॥मोकलितां तुम्ही कोण पुसे मज । थोरीव सहज बुडालीसे ॥३॥कर्ममेळा म्हणे आतां दंडवत । करा माझें हित तुम्ही दिवा ॥४॥१७) तुमचा तो कळला भाव । माझा झाला पारखा ठाव ॥१॥घेवोनी बैसलासी ठेवणें । माझे द्यावें मजकारणें ॥२॥कायसा करिसी वादावाद । मुळींच खुण्टलासे भेद ॥३॥कर्ममेळा म्हणे हरि । तुम्हां मज नाहीं उरी ॥४॥१८) तुमच्या संगतीचें काय सुख आम्हां । तुम्हां मेघश्यामा न कळे कांहीं ॥१॥हीनत्व आम्हांसी हीनत्व आम्हांसी । हीनत्व आम्हांसी देवराया ॥२॥गोड कधी न निळेचि अन्नें । सदा लाजीरवाणें जगामध्यें ॥३॥तुम्हांसी आनंद सुखाचा सोहळा । आमुचे कपाळा वोखटपण ॥४॥चोखियाचा म्हणे कर्ममेळा देवा । हाचि आमुचा ठेवा भागाभाग ॥५॥१९) न कळे तुमचें महिमान । सलगी पायीं जाण करितसे ॥१॥कमाविलें जेणें तेंचि देई मज । येवढेंचि काज माझें आहे ॥२॥ जाणीवा शाहाणीव नको भरोवरी । नेणतें मी हरि पोसणें तुमचें ॥३॥कर्ममेळा म्हणे जीवींची निजखूण । दाखवा चरण तुमचे देवा ॥४॥२०) नाहीं मी मागत आणिकाचें कांहीं । आमुचें आम्हां देई पांडुरंगा ॥१॥समर्थ म्हणोनी धरितों पदरा । वाउगा पसारा दाऊं नको ॥२॥ब्रीद बांधिलें कासया चरणीं । तें सोडी चक्रपाणी पांडुरंगा ॥३॥कर्ममेळा म्हणे तुज आमुची आण । नको निर्वाण करूं आतां ॥४॥ N/A References : N/A Last Updated : July 10, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP