मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कवी बांदरकर|
श्रीगुरुकृपाष्टक

श्रीगुरुकृपाष्टक

श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.

( लेखक-कृष्ण ज. थळी. )

( श्री सद्‍गुरु बांदकर महाराजांचें प्रथम दर्शन झालें त्या दुसर्‍या दिवशीं डोगरी येथें झालेलें अष्टक. )

शके अठरा आणि चोविसासी । आषाढ शुक्लीं गुरु पंचमीसी । डोंगरी स्थळीं श्रीकृष्ण भेटले हो । आतां कसा त्यां विसरूं पदां हो ॥१॥
त्यांनीं कृपेनें हरुनी भयातें । केला भयातीत अखंड मातें । श्री रामराया मज दाविलें हो । आतां कसा त्यां विसरूं पदां हो ॥२॥
सिंहासनी बैसलि राममूर्ती । सन्नीध शोभे मत्कृष्ण ज्योती । ऐसे कृपासागर दाविले हो । आतां कसा त्यां विरून पदां हो ॥३॥
ऐसें मला दाउनि स्वप्निंरूप । बाणीयलें अंतरिं तत्स्वरूप । तें रूप मत्‍ ह्लत्पटलावरी हो । आतां कसा त्यां विसरूं पदां हो ॥४॥
स्वप्नीं मला देउनि ही प्रचीत । बोले स्वयें हो मज जागृतींत । ध्यायीं मुला  तूं दिसलें रूपा हो । आतां क्तसा त्यां विसरूं पदां हो ॥५॥
होईल बाळा तव पूर्ण काम । मिळेल रे तूज अखंड राम । ऐसें दयाळू मज बोलिले हो । आतां कसा त्यां विसरूं पदां हो ॥६॥
जो कृष्णरायें मज बोध केला । तो नित्य धानीं स्मरुनीं पदांला । ऐसे दयाळू न जगीं दुजे हो । आतां कसा त्यां विसरूं पदां हो ॥७॥
श्रीकृष्णराज मज राम झाला । जन्मांतरींचा भव पार केला । गातों सदा प्रेमभरें लिला हो । आतां कसा त्यां विसरूम पदां हो ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : June 16, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP