मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कवी बांदरकर|
श्लोक ५१ ते ६०

पवित्र उपदेश - श्लोक ५१ ते ६०

श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.

रामाचें निजरूप सद्‌गुरुवरें श्रीस्वात्मतत्वामृतीं । केलें स्पष्ट पहा मनीं धरुनियां श्रद्धा बरी निश्चितीं ॥
वाटे ग्रंथ लहान पूर्ण परि तो विश्वीं असे व्यापला । आत्मानात्म कथिलें मज सद्‌गुरुनीं । राधे करीं श्रवण तच्चरणा स्मरूनी ॥
एकाग्र चित्त करिसी तरि लाभ याचा । होईल जाण मग लेश नुरे भयाचा ॥५२॥
आसक्ती त्यजुनी प्रपंच करितां चित्ता न बाधा करी । साधाया हित आपुलें मज दिसे ही सज्जनोक्ती खरी ॥
गेलें होउनि काय हो आजवरी होईल कैसें पुढें । चिंता हे न करीं असंग मन हें होतां स्वरूपीं जडे ॥५३॥
राधे भाग्य तुझें अपार म्हाणुनी हें स्थान लाभे तुला । सेवा त्या प्रभुची अखंड करुनी घे साधुनी हें स्थान लाभे तुला । सेवा त्या प्रभुची अखंड करुनी घे साधुनी हेतुला ॥
येतां दीन अनाथ पंगु सदनीं सप्रेम भावें तया । सन्मानें करिं अन्नदान सुकृता सीमाच नाहीं यया ॥५४॥
मुकुंदराजा प्रिय तूंचि माझा । त्त्वद्देह लावीं हरि भक्ति काजा ॥
अखंड भक्ती करिं राघवाची । आज्ञा अशी प्रेमळ सद्‌गुरुंची ॥५५॥
श्रीदासबोधा प्रति तूं न सोडीं । रामा पुढें बैसुनि घेइं गोडी ॥
माता पिता राघव हेचि मानी । त्या वांचुनी कोणि नसे निदानीं ॥५६॥
जाईं शरण संतांसी । विचारीं तत्व हें तयां ॥
कथितील तुला सारें । भवाच्या हरुनी भया ॥५७॥
सद्नुरू बोलिले बाळा । यापरी जरि वागसीं ॥
होसी कृष्ण जगन्नाथा । अत्यंत प्रिय मानसी ॥५८॥
प्रेमें बाळपणीं मला गुरुवरें, ऐशापरी बोधिलें । आशिर्वाद वदूनि चित्त जवळीं घेऊनियां शोधिलें ॥
झाले चित असंग चिन्मय नसे कांहीच चिंता मला । राधे जें मज पूर्ण सौख्य दिधलें तें काय सांगूं तुला ॥५९॥
हा बोध तारक करुनि परंपरेला । देहात्मताजनित तो भ्रम दूर केला ॥
ऐसा पिता जगिं सुदुर्लभ चित्तिं वाटे । आनंद अंतरिं तयां स्मरतांचि दाटे ॥६०॥

N/A

References : N/A
Last Updated : June 16, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP