मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कवी बांदरकर|श्री मुकुंदराज बांदकरकृत पदें| श्रीगणपतीचीं पदें श्री मुकुंदराज बांदकरकृत पदें स्फूट पदें श्रीगणपतीचीं पदें श्रीरामाचीं पदें श्रीगणपतीचीं पदें श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला. Tags : abhangbandkarkavyaअभंगकाव्यबांदकरमुकुंदराज श्रीगणपतीचीं पदें Translation - भाषांतर पद १ लें. नमिला तो गणराजा । आजि मी, जो प्रभु धांवे दासांचा काजा ॥ धृ० ॥दनिजनांचा पालक साचा, आई बाप जगाचा । साधि निरंतर निजजन काजा ॥ न० ॥१॥लाजे रति पति पाहुनि ज्या अति, आत्मज जो शंभूचा । दोंहीं भागीं ऋद्धि बुद्धि भाजा ॥ न० ॥२॥गातां वाचे नाम जयाचें, होय उत्साह मनाचा । निशिदिनि आवडे संत समाजा ॥ न० ॥३॥जगताचा धणि, देव मुकुटमणि जो कां जिवन जिवाचा । पालक कृष्णसुताचा माझा ॥ न० ॥४॥पद २ रें. गणराया तुज वराया रे आवडी मना ॥ धृ० ॥मंगलमूर्ति, त्रिजगिं तुझी कीर्ति । रक्षिसि तूं भक्त जना ॥ रे आव०॥१॥सुप्रसन्न होईं आत्मभक्ति देईं । पार्वतिच्या नंदना ॥ रे आव० ॥२॥येइं बा उदारा, चरणिं देइं थारा । करितों मी वंदना ॥ रे आव० ॥३॥विन्घसमुहवारीं, कृष्णसुता तारीं । हरिं भव बंधना ॥ रे आ० ॥४॥ N/A References : N/A Last Updated : June 13, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP