मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कवी बांदरकर|
श्री ‘सीताराम’ मंत्र श्लोक

श्री ‘सीताराम’ मंत्र श्लोक

श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.

सीमा न जो सुखसमुद्र जगन्निवसी । सिद्धांत एक प्रमु राम धणी जगासी । सिद्धांसि आपण सुख स्फुरवी मनासी । सिद्धेश्वर प्रिय सदोदित दर्शनासी ॥१॥
तारापतीसद्दश यन्मुख शत्रुहंता । तारापती वधुनि सुग्रिव सौख्यदाता । तारी जगा यदवतार हरूनि चिंता । तापत्रयां हरि तयासि नमूं अनंता ॥२॥
राजीवलोचन जगत्पति विश्वथारा । राज्यासनीं बसुनि वागवि विश्वभारा । राज्यीं प्रजा रमवि बोधुनि सद्विचारा । रात्रंदिनीं भजुं तया सदया सदारा ॥३॥
मत्कार्य साधिलचि आर्य सुखाब्धिराम । मन्मानसीं स्फुरवि चित्युखपूर्ण काम । मत्प्रेम त्यावरिच जो मुळिंचा अनाम । मच्चित्त हें रमवि आपण सौख्यधाम

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP