मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कवी बांदरकर|
पतीनपावनराम’ श्लोकाष्टक

पतीनपावनराम’ श्लोकाष्टक

श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.

परात्पर श्रीपति रामभूप ॥ पदीं रमे त्या सुख दे अमूप ॥ परावर व्यापक चित्स्वरूप ॥ परेश भक्तांस्तव जो सरूप ॥१॥
तीरें वधी शोधुनियां अराती ॥ तीव्रें गुणें, सज्जनपक्षपाती ॥ तीनीं गुणीं लिप्त न यत्प्रभा - ती ॥ तीर्थास्पदें यद्‌गुण साधु गाती ॥२॥
तद्रूप ये नाम जरी मुखांत ॥ तल्लीन होतो जिव यत्सुखांत ॥ तरावया यत्न असा भवांत ॥ तथापि जाती जन रौरवांत ॥३॥
पावे स्मरूं त्या जरि मायबापा ॥ पाहे प्रयत्नें हरुनी त्रितापा ॥ पाळी कृपें ओढुनि आत्मचापा ॥ पापां न ठेवी भजुं त्या रमापा ॥४॥
वरिष्ट जो एकचि राम देव ॥ वरिन मी त्या ह्रदयीं सदैव ॥ बदेन तन्नाम अवश्यमेब ॥ वसेन देऊनि तयासि खेंच ॥५॥
न रत्न रामा सदयासमान ॥ नरां-सुरांमाजि जगन्निधान ॥ नभापरी रूप न होय मान ॥ नमूनि ज्या देति समस्त मान ॥६॥
रात्रिंचरां देउनि तीव्र मारा ॥ राजेश्वरें आणियली स्वदारा ॥ राज्यासनीं बैसुनि कारभारा ॥ राष्ट्रीय तो चालवि भक्तथारा ॥७॥
मनीं मुखीं ज्या प्रिय आत्मनाम ॥ मवाळ त्यांच्यावरि पूर्णकाम ॥ मरामती वाढवि सौख्यधाम ॥ मदोत्धतांचा करुनी विराम ॥८॥
पतीतपावना रामा श्लोकाष्टक तुझें तुवां ॥ विष्णु कृष्ण जगन्नाथा रचिलें स्फूर्तिनें तुझ्या ॥१॥ ( अनुष्टुभ्‌ ).

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP