संत ज्ञानेश्वर रचित - ॐ नमो श्री आद्या । वेदप्र...

पूजा करण्याआधी मन प्रसन्न करण्यासाठी त्या त्या देवीदेवताचे स्तवन करावे.


ॐ नमो श्री आद्या । वेदप्रतिपाद्या ।
जय जय स्वसंवेद्या । आत्मरूपा ॥१॥
देवा तूंचि गणेशु । सकलमतिप्रकाशु ।
म्हणे निवृत्तिदासु । अवधारिजो जी ॥२॥
हें शद्बब्रह्म अशेष । तेचि मूर्ति सुवेष ।
तेथ वर्णवपु निर्दोष । मिरवत असे ॥३॥
स्मृति तेचि अवयव । देखा अंगीकभाव ।
तेथ लावण्याची ठेव । अर्थशोभा ॥४॥
अष्टादश पूराणें । तींचि मणिभूषणें ।
पदपद्धती खेवणें । प्रमेयरत्नांचीं ॥५॥
पदबंद नागर । तेंचि रंगाथिलें अंबर ।
जेथ साहित्य वाणे सपूर । उजाळाचें ॥६॥
देखा काव्यनाटका । जें निर्धारितां सकौतुका ।
त्याचि रुणझुणती क्षुद्रघंटिका । अर्थध्वनी ॥७॥
नाना प्रमेयांची परी । निपुणपणें पाहतां कुसरी ।
दिसती उचित पदें माझारीं । रत्नें भलीं ॥८॥
तेथ व्यासादिकांचिया मती । तेचि मेखळा मिरवती ।
चोखाळपणें झळकती । पल्लवसडका ॥९॥
देखा षड्‌दर्शनें म्हणिपती । तेचि भुजांची आकृती ।
म्हणऊनि विसंवादें धरिती । आयुधें हातीं ॥१०॥
तरी तर्कुं तोचि फरशु । नीतिभेदु अंकुशु ।
वेदान्तु तो महारसु । मोदकु मिरवे ॥११॥
एके हातीं दंतु । जो स्वमावता खंडितु ।
तो बौद्धमत संकेतु । वार्तिकांचा ॥१२॥
मग सहजें सत्कारवादु । तो पद्मकरु वरदु ।
धर्मप्रतिष्ठा तो सिद्‌धु । अभयह्स्तु ॥१३॥
देखा विवेकवंतु सुविमळु । तोचि शुंडादंडु सरळु ।
येथ परमानंदु केवळु । ब्रह्मसुखाचा ॥१४॥
तरी संवादु तोचि दशनु । जो समताशुभ्रवर्णु ।
देवो उन्मेषसूक्ष्मेक्षणु । विघ्नराजु ॥१५॥
मज अवगमलिया दोनी । मीमांसा श्रवणस्थानीं ।
बोधमदामृत मुनी - । अली सेविती ॥१६॥
प्रमेयप्रवाल सुप्रम । द्वैताद्वैत तेचि निकुंभ ।
सरिसे एकवटत इभ - । मस्तकावरी ॥१७॥
उपरि दशोपनिषदें । जियें उदारें ज्ञानमकरंदें ।
तियें कुसुमें मुगुटीं सुगंधें । शोभती भलीं ॥१८॥
अकार चरणयुगुल । उकार उदर विशाल ।
मकार महामंडल । मस्तकाकारें ॥१९॥
हे तिन्ही एकवटले । तेथें शब्दब्रह्म कवळलें ।
तें मियां गुरुकृपा नमिलें । आदिबीज ॥२०॥

N/A

References : N/A
Last Updated : July 22, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP