मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|
संगीत उद्याचा संसार

संगीत उद्याचा संसार

मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.


(३-१-१९३६)


वेड लावी ती जिवाला बालिका,
उरि शलाका टोंचते ती, तारका ।
अप्सरा ती गोड गाणीं
गात नेई मज विमानीं,
स्वर्गिचा लागे रुपेरी उंबरा,
तोंच मारी मस्तकी ती, ठोकरा ।


जगाचे बंध कोणाला ? जगाचा बांधला त्याला ।
मला जो थांबवी ऐसा, जगीं निर्बंध ये कैसा ?
जगाने देह हा केला, जगाने वाहिले त्याला,
हाणा मारा, खुडा तोडा, परी आता मला सोडा !
न कीर्तीला, न प्रेमाला, न सौख्याला, न विलासाला,
न विघ्नाला, न मृत्यूला, मला ये आडवायाला
पुरे संबंध प्रेमाचा, नको हा खेळ प्रेमाचा,
मिळे ज्या प्रीतीचा त्याला, विषारी तो असा पेला ।


जीव प्रणय़ भुलवी ! कां हा ?
मनाला सहज फसवित कां या । माया वाया,
तृषित जसे हरिण फसे । जल भासें,
मूढ जन तेवि !
जनिं पतंग कां । भुलतं दीपका ?
घाली झडप किरणांना । वाटते भय न त्या केवि ?

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP