मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|
संगीत सज्जन

संगीत सज्जन

मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.


(२-४-१९३१). संगीत : वझेबुवा


(राग : रागेश्री, ताल : त्रिताल)
निशामय कालि या पाहीं । काल-सदन-गत सकला आशा ।
प्रलयवह्निचा होम पेटला ॥धृ०॥
भाव सुखाचा तव आगम हा, मानसि लागे भययुत तळमळ ॥१॥


(राग : सुहासुगराई, ताल : त्रिताल)
तमांध झाला, भ्रमला हा, ज्ञानदीप हतबला घ्यावा ॥धृ०॥
मळवितो विमलशा कुलयज्ञा बंधु कसा,
हाच भाव मूढ करी जीवा ॥१॥


(राग : भीमपलास, ताल : त्रिताल)
नच लघुता तारानाथ स्मरताचि वितरित सम समाधान ॥धृ०॥
पाहुनिया कृति आज आपुली करितिल जन यशोगान ॥१॥


(राग : नंद, ताल : झपताल)
उदित नव तारा आकाशी या होत
जीवा विसावा, नयना निवारा ॥धृ०॥
ह्रदया परी ताप तत्कांति देते
विनय करि नियता विचारा ॥१॥


(राग : अडाणा, ताल : झपताल)
सोडिला प्रखर शर । बोल अधम हा तुज गमत ।
मति कुटिला कशाला वरिसी रे ॥धृ०॥
परि मशक जैसा बघतसे तनुवरी ।
वच मी गणितसे भय ना खरे ॥१॥


विष-फला कां । हट्टग्रहे ग्रहिसी अशी
सुमनी ग्रहण तव कुतुहल ॥धृ०॥
विमल भालिं चारु प्रभा
विकला करिसी तियेसि
जा-भय नच का ? ॥१॥


(राग : भूप, ताल : त्रिताल)
पाश तुटे । हा । होता अभिनय दोष मज लाभ ॥धृ०॥
धरणि प्रमुदिता वाटे माता । काय वाहि जणुं अंकि घ्यावया ।
निज कर देत मज आज ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP