मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|
संगीत रणदुंदुभि

संगीत रणदुंदुभि

मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.


(१७-२-१९२७) संगीत : वझेबुवा


(चाल : अब छोडोना पराई कान्हा)
परवशता पास दैवे ज्यांच्या गळा लागला ॥
सजिवपणी घडती सारे । मरण भोग त्याला ॥धृ०॥
असुनि खास मालक घरचा । म्हणति चोर त्याला ॥१॥
सौख्य भोग इतरा सारे । कष्ट मात्र त्याला ॥२॥
मातृभूमि त्याची त्याला । होत बंदिशाळा ॥३॥


(चाल : देवता कामुकता रहिता)
आपदा राज-पदा भयदा । नृपति कामभोग निरति ॥धृ०॥
लोपुनिया चिरसुखदा । दिव्य शीलसंपदा ॥
पापरता । पामरता । माते, नरपति -
शिरि अरि सदा महा भया धरित - ॥


(गझल : नियामत सखे आई है)
जगि हा खास वेडयांचा । पसारा माजला सारा
गमे या भ्रान्त संसारी । ध्रवाचा ‘वेड’ हा तारा ॥धृ०॥
कुणाला वेड कनकाचे । कुणाला कामिनी जाचे ॥
भ्रमाने राजसत्तेच्या । कुणाचे चित्त ते नाचे ॥१॥
कुणाला देव बहकावी । कुणाला देश चळ लावी
कुणाची नजर धर्माच्या । निशेने धुंदली भारी ॥२॥
अशा या विविध रंगांच्या । पिशाच्या लहरबहरींनी ॥
दुरंगी दीन दुनियेची । जवानी रंगली सारी ॥३॥


(राग : तिलककामोद, ताल : एकताल, चाल : परमपुरुष नारायण)
वितरि प्रखर तेजोबल । करि जन समरनिरत ॥
हरुनि दयाल मोहजाल ॥धृ०॥
करूनि दया । ते विलया । हा स्वदेश नाश काल ॥


(राग : मालकंस, ताल : झपताल, चाल : कृष्ण मुखचंद्र)
दिव्य स्वातंत्र्य रवि आत्मतेजोबले ॥
प्रगटता अवनितलि कोण त्या लोपवी ॥धृ०॥
शौर्यसागर-लहरि गगन-मंडळ महा ॥
भेदिता कवण त्या अबल कर थोपवी ? ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP