संगीत साध्वी मिराबाई

मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.


प्रस्तुत नाटकाचे नाटककार आहेत - सदाशिव अनंत शुक्ल
(८-२-१९३०) सं. : सवाई गंधर्व, हिराबाई, सुरेशबाबू माने, केशवराव भोळे


(राग : भीमपलास, ताल : त्रिवट)
रुचिरचि हा ल्याले भक्तिभाव । शुभ-गुण-मणि अलंकार ॥धृ०॥
प्रभुला पुजिले या मनमंदिरीं । तनमनधन पदिं वाहिले ॥


(राग : बागेश्री, धुमाळी)
त्राता प्रभु सकलांचा । हा अंतरिचा साचा दृढ भाव निरंतरचा ॥धृ०॥
नच जिवास आसरा । प्रभुवाचुनि दुसरा ।
घेतचि स्वजनांचा तो भोर शिरीं सारा ॥


(राग : पिलु, ताल : कवाली)
ब्रिजलाला गडे पुरवी ह्रदयिंची आस ॥धृ०॥
वाजिव श्रीहरी । मंजुळ बासरी । पाजिव शांति सुधा जीवास ॥


(राग : भैरवी, ताल : दादरा)
असार पसारा शून्य संसार सारा ।
हा प्रभुराजा जीवासि एक निवारा ॥धृ०॥
मज निरोप द्यावा ठेवुनि प्रेमभावा ।
सकल चरणिं माझा हा नमस्कार घ्यावा ।
सफल जनन झाले, सेविलें सौख्य सारा ।
प्रभु चरण विलीना जाहली आज मीरा ॥१॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:53:01.0000000