मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|
संगीत सिंहाचा छावा

संगीत सिंहाचा छावा

मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.


(८-१-१९२७). संगीत : आनंद संगीत मंडळी


(चाल : ललना, लाडली)
चतुरे । बोल ना मधु बोल फुलांचे प्यारे ॥धृ०॥
शृंखला प्रेममाला । प्रेमी जिवाला बांधायाला ।
दिव्य धरी बला अबला प्रेमला । जग रंगवि प्रेम सारे ॥


(चाल : प्रेम दे नितांत तुझे)
आई गे । प्रशांत मने देई तू निरोप मला ।
समर मार्ग शौर्यधना सुखद स्वर्गसम झाला ।
तुजविन पायि गर्व सर्व शत्रु शौर्याचा
रडविन धाई धाई वैर्‍याना साचा ।
मिरविल डौल वृथा काय पुत्र पार्थाचा ।
नच मी अजाण बाळ, जाण काळ काळाचा
माया ममता आवरुनी दे शुभ आशीर्वादाला
रणांगणांत जायाला वीर पुत्र तव सजला ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP