मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|
संगीत प्रेमसंन्यास

संगीत प्रेमसंन्यास

मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.



(राग : भीमपलास, ताल : एकताल, चाल : देरेना)
प्रणया नवरुचि देता । हा विरह रुचिर गमला
विरहपीडिता । तृषित मना ।
मजसम मधुपा । तू गमसि कमला ॥१॥


(राग : तिलक कामोद, ताल : त्रिताल, चाल : जब हरी)
सुखमय आशा । विधिने नाशा । निशिदिनिं छळिते ।
घोर निराशा ॥धृ०॥
काव्य कल्पना । भुलवी भुवना ।
अनुभव परि ये । अरसिक ऐसा ॥१॥


(राग : भैरवी, ताल : केरवा, चाल : अनाथके नाथ)
प्रभू प्रकटला । अता हंसला ।
प्रेमिजनांचा उद्धार । निकटि दिसला ॥धृ०॥
पाशगळी प्रेम सुमांचा ॥
वास तया सौभाग्याचा ।
या पुण्यकालीं बोले सखे मधु बोलां ॥१॥


(राग : पहाडी, ताल : केरवा, चाल : दाता हमरे)
ऐसा महिमा । प्रेमाचा ।
मधुर भासला । खेळ सदा । प्रेमाचा ॥धृ०॥
प्रभु परि माझा । मग रुसतां ।
डाव उधळला । सौख्याचा प्रेमाचा ॥१॥


(राग : बिहाग, ताल : केरवा, चाल : सखेरी बन)
रमवि नयनां । ही प्रभुलीला
अमर कृतिला । त्या तुलना ना ॥धृ०॥
जादुगार चतुर भासला
रमवी भुलवी । तो सहज भुवना ॥१॥


(राग : पिलु, ताल : केरवा, चाल : तानोम्‌ तानोम्‌)
सखये विसरुनि जगताला ।
सेवू प्रणयाला । सुरस प्याला । गाऊ प्रेममंगला ॥धृ०॥
वाहिन मी मम जीवाला । तव सेवेला ॥
तुज सुख देता । मोद मजला ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP