मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|
संगीत संत तुकाराम

संगीत संत तुकाराम

मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.


१९११


त्यजि भक्तासाठी लाज जगी दास होऊनि आलों ॥धृ०॥
निजमुखांतलीं बोरें । दे मज शबरी स्वकरें ॥
तीं सेवुनि निधरि । अति तुष्ट मानसीं झालों ॥१॥


आनंदाचा कंद हरी हा देवकीनंदन पाहिला ॥धृ०॥
भक्तांसाठीं । ठेवुनी कर कटिं । भीमानिकटीं राहिला ॥
कंसभयानें । वसुदेवानें नंदयशोदें वाहिला ॥
यज्ञ-याग-जप-तपासि न भुले । घ्यानें ना कळे ॥
निश्चल साचा । परि तुकयाचा । भक्तिगुणासीं मोहिला ॥१॥


घ्या मुकुंद मुरारि गोविंद ॥ आनंद कंद घ्या हा छंद ।
घ्या मुकुंद ॥ घ्ता मुरारि । घ्या गोविंद । घ्या मुकुंद ॥
गोपाळा करुनि गोळा । मांडि काला सावळा ।
अंत नाही त्या सुखाला होय सकला आनंद ॥घ्या०॥
वाजवि कान्हा वाद्ये नाना गति तनानां व्रजललना ॥
हाक ठुंबरी फुगडया टिपरी खेळती नारी नरवृंद ॥घ्या०॥
रामभजन सब सार मिठाई सुधारसोका
सिंधके तुका और छोडके भजो भाई गोविंद ॥घ्या०॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP