मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|
संगीत मूकनायक

संगीत मूकनायक

मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.


(१९०१). संगीत : खुद्द नाटककार

१ (राग : खमाज झिंजोटी, चाल : गंदेरी हार)
हे प्रभो विभो अगाध तव किती करणी
मन चिंतुनि हो रत चरणी ॥धृ०॥
चांदवा नभाचा केला । रविचंद्र लटकती त्याला
जणु झुंबर सुबक छाताला ॥ मग अंथरली ही धरणी ॥१॥
बाहुली मनुष्ये केली ॥ त्या अनेक रूपे दिधली
परि सूत्रें त्यांची सगळीं ॥ नाचविसी हस्ती धरूनी ॥२॥

२ (चाल : शेषशयन कमलनयन)
व्यक्त रदन बघुनि वदन भगिनीचे स्वता
दीपोत्सव वाटतसे मंद पाहता ॥धृ०॥
आश्चर्योत्थित भ्रुकुटि पुढती तोरणे
बालिशता होईलचि शुभ उभारणे
मोद होतसे त्वदीय अश्रुसिंचने
संमार्जन यानंतर होतसे वृथा ॥१॥

३ (राग : केदार, चाल : मोरा अलम न करियो)
मनि खेद न करि भगिनी । हे वच मानी
कष्टि बघुणि तुज जाई श्रमुनि ॥धृ०॥
प्रयत्न करणे मनुजा हाती ॥ सिद्धि असे ईशेच्छेवरती
दूरी होइल चिंता अंती ॥ धीर धरीं प्रभु आठवोनि मनि

४ (चाल : पायी पायी तोरी यारी की)
आलि कालि या मज तरुण दशा ॥धृ०॥
निशंकपणे रमणे गेले प्रणयकेलि मज सुचती ऐशा ॥१॥
धात्री पूर्वी निधि वाटे ती सांप्रत गमती तरुणी प्रियशा ॥२॥

५ (चाल : एजि हो तुम आये जो चारो जवान)
सुलभ मनिं गणा न भूपसुता । करूं बघतां कशि ती वनिता ॥धृ०॥
पडले धरणीपालाहि चरणीं । प्रयत्न जाति वृधा ॥ सकलहि ॥१॥
वीरहि आलै परतुनि गेले मुळी यश न मिळतां । तयांप्रति ॥२॥
राजकुमारी उभि सामोरी । त्यजा न किंकरता । विसरुनि ॥३॥

६ (राग : तिलककामोद, चाल :ज अब कित जाऊं मै बिहरन)
गेले किंकरकरि अवचित मी ।
ह्रदयिं शिरुनि सिंहासनि बैसुनि शासन मग करि ॥धृ०॥
वाटे आज्ञा त्या नच करिता त्यांची आज्ञा मान्य करावी
कृत्रिम अंतर दूर करुनि निकटचि बसवुनि करिं ॥१॥

७ (चाल : इडू इडू इडू करुणा नारायणा)
उगिच का कांता गांजितां दासी दीना ॥धृ०॥
व्यापुनिया सारी धरणी ॥ मूर्ति आपुली या नयनी
खेळते पहा दिनरजनी ॥ तेवि ह्रदयमंचकि लीना ॥१॥

८ (चाल : गिरिधर ब्रिजधर)
जलधर घनतर फिरति गगनभर दाहि दिशा करिति
बहु धूसर कृष्ण भयंकर पडति महीवर ॥धृ०॥
अमरलोकिंचे गूढ लाभ पर म्हणुनि तुंग शिर
पुराणतरुवर पडति क्षिति वर दंड भरिती खर ॥१॥
इतकें बघुनि श्रवणाक्षि स्थिर राहती तरि
त्यां करित सुजर्जर खेचर चपलादीप अचिरकर ॥२॥

९ (राग : भैरव-नंतर बागेश्री, चाल : आज नंदलाला सखि)
होय संसार तरु मुग्ध कोरक भुवनि । रम्य ते बालपण
देइ देवा फिरुनि ॥धृ०॥
कोप सुख हेतुविण ॥ शांत निश्चित मन ॥
शोक निमिषाहून ॥ नुरत मनि पद भवनि ॥१॥
निकटच्या वस्तुतति ॥ वरि अभिनया पुरति
ठेवी नटतुल्य रति ॥ अल्पपरिचय म्हणुनि ॥२॥

१० (चाल : राधिका रसीली जेणुं नाम)
भारती जडा सुधीहि मदधी बने ॥
बिंबसेवने ॥ जनी वदे सुधी असे मंजु भाषणे ॥धृ०॥
मधुमधुर बिंबसम अधर चुंबिला नच दंते
मधुमधूनि रसना अधू सुदति कां अदूर गतिका ही होते ॥१॥
नव नवल गमे फलकवलविना कशि नीरसना
वद वद मज कारण झडकरि दारुण मोहनिवारण करि आतां ॥२॥

११ (चाल : ओ मेरी जान दुलन तरवार)
तुजविण गमे वृथा संसार । संसार सौख्य कुठचे ॥
ध्वनि जिथे न नव चरणिचे ॥१॥
तुजविण जगी कुठे आराम ॥ आरामहीन सृष्टि ॥
तव जिथे न शीतल दृष्टि ॥२॥
तुजविण कुठे नसे आलोक ॥ आलोकशून्य जगती ॥
तव हास्य जिथे नच सुदति ॥३॥
तुजविण नको नको आनंद ॥ आनंद तरिच होई ॥
अनुभवा तुझ्यासह येई ॥४॥

१२ (चाल : रामा रे मै तो पनियाको गई)
सहज कशि खेळविते ललना ॥धृ०॥
रमणी लोचन तेविं फिरे मी मी तेंवी मम सेना ॥१॥
या विश्वाचे स्त्री लोचनयुग चालत मेरु असेना ॥२॥

१३ (चाल : अजी फेर उस्के जिये जानामे)
अष्टमीचा चंद्र शोभे व्योमभागी विहरता
सकल जगतावरति रजतासदृश किरणा वर्षता ॥धृ०॥
अल्पतेजा सकल भूतांगणि पसरी मृदुलता
पौर्णिमेच्या इंदुहूनी अंगि धरितो चारुता ॥१॥
निर्मि कविता सारभूता आसमंतात खिन्नता
कविजनांच्या कल्पनेला चेतवितो सर्वथा ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP