प्रासंगिक कविता - खंडोबाची आरती

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


पंचानन हयवाहन सुरभूषणलीला । खंडामंडित दंडित दानव आवलीला ।
मणिमल्ल मर्दूनि धूसर जो पिवळा । विरकंकण बाशिंगें सुभनांच्या माळा ।
जयदेव जयजय मल्हारी । वारीं दुर्जन वारीं निंदक अपहारीं । जयदेव ॥१॥॥धु०॥
सुरवैरीसंहारा वर दे मज देवा । नाना नामीं गाइन मी तुमची सेवा ।
अखंड गुण गावया वाटतसे हेवा । फणिवर शिणला तेथें नर पामर केवा ॥जयo २॥
रघुवीरस्मरणें शंकर हदयीं नीवाला । तो हा मदनांतक अव-तार झाला ।
यालागुनि धांवे आवडिं वर्णीला । रामीं रामदासा जिवलग भेटला ॥३॥
एके समयीं मार्गांत दोन पक्षांचे शाहीर एकमेकांवर चढ करीत असतां
समर्थ आले त्या वेळीं समर्थांनीं डफगाणें करून त्यांस निरुत्तर केलें तो प्रकार:-

N/A

References : N/A
Last Updated : April 02, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP