श्री कल्याणकृत अष्टपदी

ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.


अष्टपदी उच्चारा रा मा प ती त पा व ना ।
आत्मारा म स्मरणभावे वारी यातना ।
अखंड चित्तीं चिंतन जाल्या उन्मनी मना ।
आनंदाचे ठाव रंगी नाहीं अनुमाना ॥ध्रु.॥
राम नाम उफराटें पावे वाल्मिक उद्धारा ।
राम३ नाम ध्यातां चि प्रचीत आली शंकरा ।
राजीवेश दाविला सूर्यवंशी साजिरा ।
राजित शरयूतीरा आले अयोध्यापुरा ॥१॥
मागुनि विश्वामित्रें राया ऋषीच्या कामा ।
मारुनि राक्षस बळिये सिद्धी पावविले होमा ।
मार्गीं शिळा करुनी बाळा धाडी आश्रमा९ ।
माहा विक्रमें पर्णुनि सीता आले निजधामा ॥१२॥
पट्ट रामराज्याचा कैकै केला विक्षेप ।
परदेशीं वनवासीं करनें लागलें तप ।
परेश फणिवर सीता देवी लावण्यरूप ।
पञ्चवटिके येउनि रावण हरी पापरूप ॥३॥
तीकारणें उभयतां नाना वनें धुंडितीं ।
तीव्र विरहानळ मानसीं लागली खंती ।
तीगुणांपरता जो कवणा नेणवे गती ।
तीर्थ६ वंदी कार्या कार्या कारण शिव हा मुकती ॥४॥
तये अटव्यीं फीरत पंपा सरोवरा येत ।
तत्काळिक सैन्येसीं सुग्रिव भेटे हनुमंत ।
तये चि वेळीं रामें वाली केला नि:पात ।
तीर्थ वंदी जो श्री राघव ऋष्यमूक पर्वत ॥५॥
पाठविले हनुमंता सीता शुद्धी स्वरूपा ।
पाहुनि माता भीम मोडी वनीं पादपा ।
पाडुनि राक्षस बळिये जाळी लंकेच्या पडपा ।
पाउनि वार्ता क्षेम सांगे अयोध्याभूपा ॥६॥
वहिले सिंधू तरोनि टाकी सूवेळा ठाव ।
वधिला रावण सहपरिवारीं विजयी राघव ।
वधूसि अंकीं घेउनि स्थानीं स्थापीले देव ।
वचन खरें  करुनी  आले अयोध्ये  सर्व ॥७॥
नाना सोहळे रामराज्या आनंदघना ।
नागर चवघे बंधू माता सुख जालें जना ।
नायकसहीत गौख केला बोळविली सेना ।
नाना महोत्छाव जाला आनंद त्रिभुवना ॥८॥
नाहीं संशय पाहातां रामदासाच्या दासा ।
कृपाळू कल्याण जाणे भावें कोंवसा ।
येश कीर्ती प्रताप महिमा प्रत्ययो ऐसा ।
पूर्ण वर दीधला स्वामी रामदासा ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : March 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP