मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीमहालक्ष्मीची पदे|
सत्कवींची पदे भाग २

सत्कवींची पदे भाग २

देवीभागवत महापुराणात करवीर निवासिनी महालक्ष्मीला प्रथम स्थान दिले आहे, तिरूपति बालाजीच्या दर्शनानंतर महालक्ष्मीचे दर्शन भक्त घेतातच.


लावण्याची निधी आणि मंगलमूर्ती जैसी ।
ते अंबा तत्त्वमसि करवीरीं नांदे ॥१॥
त्राहे माते जननिये वो, कृपाळवे निजमाये ।
या मनासि लावी साये, तुझे निजभक्तीसी ॥ध्रु.॥

सुखें मस्तकावरी निजलिंग धरूनि, देवी ।
दाविसी ब्रह्मपदवी निज सेवकासी ॥२॥
श्रीमंत सुलक्षण मुख मंडित मंडण ।
वो, निर्मळ चंद्रवदन कोटि कळा फाके ॥३॥
लल्हाटीं कस्तुरीवरी झळके चंद्ररेखा ।
भृकुटी सुरेखा तळीं रेखियेल्या ॥४॥
लोचन वानूं कैसें? आणि अमृताचें जैसें ।
काळाग्निक्षोभ दशदिशे दैत्यांवरी ॥५॥

सुंदर नासिक, वरी मुक्ताफळ ढळमळी ।
गुरु-शुक्र मंडळीं जेवी उदयो जाहाले ॥६॥
अधर सुरंग, माजी रस रसना सुरस ।
कोटि कंदर्पांसी तेथे उपमा सानी ॥७॥
दंतज्योतिकिरणें फाकती सुलक्षणें ।
मधुरवाणी, वचनें निवविसी संतां ॥८॥
कर्णींची कुंडलें नवरत्नजडित ।
आदित्यप्रभा पाहे तेथे स्थिरावली ॥९॥

सरळ भुजादंड पराक्रमें प्रचंड ।
अरि असुर शतखंड जिहीं करीं केले ॥१०॥
बाह्मे बाह्मेवट तोळबंद्या आणि वज्रचुडे कांकण ।
बालार्क दिनमान जेवीं उदयो केला ॥११॥
संपूर्ण सामुद्रिकें शोभती करकमळें ।
वरी तेज झळफळे दाही मुद्रिकांचे ॥१२॥
नवरत्नांचे हार आणि पदक एकावळी ।
तेणें सिंधुबाळी दिसे अनुपम्य ॥१३॥
नक्षत्रांच्या ओळी जेवीं भासती मंडळीं ।
तेवीं शोभे जाळी कंठीं मणि-मुगतांची ॥१४॥

N/A

References : N/A
Last Updated : March 15, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP