श्री वेंकटेश्वर - पदे २०१ ते २१०

श्री वेंकटेश्वराचे दर्शन घेतल्याने अथवा पाठ केल्याने मनुष्यांस जन्म-मृत्युच्या फेर्‍यातून मुक्ति मिळते.


२०१
काळहस्तीश्वरा, जेवी साचार । शपथ, करितो स्वामी, सादर ।
मजवरी दया करी लवकर । संतोषभरें न जेविशी जरी ॥
तरी न जेवीन मीही निश्चित । ना तरी मदानें थबथबीत ।
मांसघास देऊ काय मुखात । बरे, हर्षयुक्त तसे करीन ॥
या प्रकारें बोलून सादर । त्याच्या वदनीं मांस मधुर ।
अर्पिता जाहला भक्तशेखर । दयाळू थोर काळहस्तीश ॥

२०२
गंधोदकाच्या अभिषेकापरी । गंडूषजलसेचन अंतरीं ।
मानिता जाहला भक्तकैवारी । कालाचा अरी सांबमूर्ती ॥
सपादत्राण पादप्रहार । मस्तकीं जो करी व्याधकुमार ।
त्यातें मानी तो परमेश्वर । शिशु सुंदर ऐशा स्कंदाने ॥
लीलेने ठेविल्या चरणापरी । भक्तीने परीक्षून गोड भारी ।
वन्यमांस जे अर्पिले निर्धारी । जे परोपरी मदाने युक्त ॥

२०३
ईश्वरप्रसादाहून इतर । काही न इच्छिले त्याने साचार ।
त्या नीलाशी समेत महेश्वर । कैलासीं सत्वर येऊन पावला ॥
ज्यास देऊन स्वमांसनयन । शबरही काळभय दारुण ।
दूर करिता जाहला भक्तीने । जो परिपूर्ण दयासमुद्र ॥

२०४
मग त्या तीरमार्गाहुनी । नृप आला जंबुकेशायतनीं ।
तेथे देव जंबुकेश्वर धणी । देवी जननी अखिलांडेश्वरी ॥
जललिंग असे जो महेश्वर । जेथे येउनि ब्रह्मादिक सुर ।
नित्य करिती जयजयकार । महिमा थोर ज्याची असे ॥
कल्पवृक्षपुष्पें ज्यांच्या कबरीं । स्वर्गीं असती ज्या देवकुमरी ।
त्यांनी सेविजेली जे गौरी । अखिलांडेश्वरी तेचि हे ॥

२०५
पूर्वी विश्वावसु चित्रसेन । दोघे गंधर्व असती गर्वाने ।
देवाने शापिले तयांकरणे । ‘गज कोष्टी होणे तुम्ही’ मणूनी ॥
त्यांनी करूनी क्षमापन ( क्षमायाचन ) । उस्राप मागितला परतून
देव बोले तेव्हा वचन । ‘गजवन आहे भूमीवरी ॥
ते क्षेत्र माझे प्रीतिकर । तेथे तुम्ही कित्तेक वासर ( संवत्सर ) ।
जाउनी वास करा निरंतर । मग शंकर दया करील’ ॥

२०६
ऐशी ऐकूनी देवाची वाणी । गंधर्व येऊनी तया स्थानीं ।
गज कोष्टी देह धरूनी । वास करून असतां ॥
कोष्टयाने स्वतंतुगुणें । त्या जललिंगासी केले आयतन ।
नित्यही करिती त्याचे पूजन । मुक्तिकारणें भकियुक्त ॥
प्रतिनित्य ते भंगूनी गजाने । आपणाही करणे अर्हण ।
ऐसे असतां बहुत दिन । गोप्त होऊनी कोष्टयाने पाहिले ॥
येक्या दिनीं पुन्हा तो हत्ती । तैसेचि करितां तयाप्रती ।
कोष्टयासी क्रोध आला चित्तीं । शिरला अतिवेगें पुष्करीं ॥
महाशरीरही गजनायक । तेणें मृत जाहला सम्यक ।
कोष्टीही तैसाचि निर्जीवक । शिवें स्वलोक गजासी दिला ॥
कोष्टी मणाला देवासी । पुरली नाही पूजेची असोसी ।
करावे म्यां नीट देउळासी । मग कैलासासी मी येयीन ॥

२०७
मृगया - यात्रा - विधि:
चतुर्दश्यां आचार्यो नित्यकर्मानुष्ठानादिंक कृत्वा,
शयनमंदिरं प्रविशय, देवमुत्थाप्य,
ब्रह्म्कलशादिपंचकलशान्‍ धान्योपरि निधाय,
हिरण्यशृंगमित्यादिवारुणयंत्रणोदकपूरितान्‍ पंचकलशान्‍
गायत्र्याभिमंत्र्य देवं नित्यार्चनक्रमेणाभ्यर्च्य,
पुरुषसूक्तेनाभिषिच्य, नित्यहोमं कृत्वा,
देवस्य समीपं गत्वा, प्रणम्य -
मृगयात्रा त्वया देव श्व: कर्तव्यं सुरेश्वर ।
तत्र प्रतिसरारंभमनुज्ञां दातुमर्हसि ॥
जितंते इति कंकणं बद्‍ध्वा -
जितंते पुंडरीकाक्ष, नमस्ते विश्वभावन ।
सुब्रह्मण्य, नमस्तेस्तु महापुरुष पूर्वज ॥

२०८
यत्र बाणा: संपतन्ति कुमारविशिखा इव ।
इंद्रो नस्तत्र वृत्रहा विश्वहा शर्म यच्छतु ॥

२०९
शा. ए वेदंबु पठिंचे लूत भुजंगंबे शास्त्रमुल्चुचें
दा ने विद्याभ्यसनंबोनर्चे गरि चेंचे मंत्रमूहिंचे
बोधाविर्भाव निधानमुलू चदुवुळय्या!
कावु मी पादसंसेवासक्तिये काक जंतु ततिकिन्‍ श्रीकाळहस्तीश्वरा!
२१०

मार्गावर्तितपादुका पशुपतेरंगस्य कृर्चायते
गंडूषांबुनिषेचनं पुररिपोर्दिव्याभिषेकायते ।
किंचित् भक्षितमांसशेषकवलं नव्योपहारायते
भक्ति: किं न करोत्यहो वनचरो भक्तावतंसायते ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 14, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP