मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लावणी|अंधारातील लावणी|
विषय पुरे कर हा, मला सोसे...

लावणी ८६ वी - विषय पुरे कर हा, मला सोसे...

लावणी म्हणजे गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम. लावणी शृंगाराची खाण आणि महाराष्ट्राची शान आहे.


विषय पुरे कर हा, मला सोसेना जाचणी ।
प्रीत नको, जीव घातला काचणीं ॥धृ०॥
मुखीं मुख लावूनी निजतां
पाहाते मनामधिं इथें ज इ सा पुरता ।
लाजते तुम्हांसी कमी कांहीं नसतां ।
भवते फिरोनी जीव घातला काचणीं ॥१॥
तुम्हां विषयाची फारच गोडी ।
वाट मी पाहाते आंगणीं खडी ।
सेज फुलांची केली पलंघडी ।
आवळुनी धरितां, जीव घातला काचणीं ॥२॥
शेज फुलांची केली आसनीं ।
टाकून गेला सखा, शोधला कोणी ? ।
वाट मी पाहाते उभी आगंणीं ।
हार तुरे गजरे घरीं गुंफिती माळणी ॥३॥
आज सख्या लवकरीचा बेत म्हालीं ।
आरास म्या केली तिसरे ताळीं ।
काय पाहिलीस हवा, फुलल्या केळी ।
सगनभाउ गाती, गुणी चाहती रंगणीं ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP