श्रीदत्तात्रेयाचीं पदे - संग्रह ५

दत्तात्रेय पूर्ण अवतार असून, ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रीत रूप आहे.
Dattatreya is considered by some Hindus, to be god who is an incarnation of the Divine Trinity Brahma, Vishnu and Mahesh.


४१. क्षितितळगत जल चंचळ ढळता सागरीं वीसांवे रे । नाहीं तया पुनरावृत्ति; कार्यकारणीं सामावे ॥१॥
नवल ! नवल ! रे सुजाण हो ! जिवासि जालें तैसें अवधूतें येकेंवीण लेया कोठेंचि न दीसे ॥छ॥
नाना योनीं भ्रमतां श्रमले साधनें आयासें रे ! दिगंबरीं जाले लीन, ते निवाले ब्रह्मरसें ॥२॥(दासोपंत)

४२.सावळा सुंदरु वो ! देखिला आदिगुरु । मन माझे उतावीळ, कैसें मी करूं । तें मीं केवि सावरूं? ॥१॥
जाईन सवें वो ! चित्त गुंतलें, माये ! ॥छ॥
मन निमालें वो ! बोध नवी तुळलें । दिगंबरें येणें माझें मी पण गोविलें ॥२॥(दासोपंत)

४३. वाट पाहीन वो । ध्यान धरीन माये ! अवधूतेंवीन मन निश्चळ न राहे ॥१॥
वेळ जालो वो ! दत्तु न ये गे ! बाइये ! ॥छ॥
आश लागली वो ! बुद्धि गुंपोनि ठेली । दिगंबरेणीण सैये । निराशा जाली ॥२॥(दासोपंत)

४४. षडभूजमूर्ति सावळी सुंदर । रूपमनोहर देखियली ॥१॥
शंख चक्र हातीं त्रिशूळ डमरू । कासें पीतांबरु कासीयेला ॥२॥
माळा कमंडलू भोभति दों हातीं । गळां वैजयंती रुळतसे ॥३॥
निरंजन म्हणे सद्‌गुरु निधान । हेंचि माझें धन । सर्वांपरी ॥४॥

४५. दत्तात्रया स्वामि सर्वांचा हो दाता । नाहीं ठाव रीता तया वीण ॥१॥
भागीरथी माजी सारूनिया स्नान । करि भिक्षाटन कोल्हापुरीं ॥२॥
पांचाळेश्वरासी भोजनासि जावें । आसन करावें शेषाचळीं ॥३॥
माहुरपर्वंती करूनिया निद्रा । गिरनारीं मुद्रा सारीसते ॥४॥
निरंजनिं वनिं अक्षईं रहातो । धावूनिया येतो आठवितां ॥५॥

४६. येई वो श्रीगुरु स्वामि दत्तात्रया । दयाळा सखया दीनबंधू ॥१॥
अनाथाचा नाथ कृपेचा सागर । बहू तूं उदार सर्वागुणें ॥२॥
भक्तकाजासाठीं धाऊनियां येसी । हेंचि वागवीसी ब्रीद सदा ॥३॥
निरंजन म्हणे धाउनिया यावें । ग्रंथ उठवावे जळाले ते ॥४॥

४७. लवकर देईं भेटी । दिगंबर स्वामी या ॥धृ॥
सावळी सुंदर तनु । उगवले कोटी भानु । लावण्याता किती वानु । शक्ती नाहीं गावया ॥१॥दिंग०॥
कासियला पितांबर । माथां मुगुट सुंदर । गळां मुक्त चामीकर । गुंफियेल्या जाळिया ॥२॥दिंग०॥
षड्‍भुजा सकुमार । षडायुधें सुंदर । आंगीं कस्तुरी केशर । लावुनिया उटीया ॥३॥दिंग०॥
स्वामि त्रैलोक्यविहारी । देखियेला गिरनारीं । निरंजनें डोळेभरी । जीवनन्मुक्त व्हावया ॥४॥दिंग०॥

४८. दत्तात्रेया जय गुरुराया तुझिया पायां नमुं यतिवर्या ॥धृ.॥
दृढ धरिलें म्यां तुझिया पायां तूंची सखया वारिं अपाया । ना तरि वायां हे नरकाया जाईल सदया सद्‌गुरुराया ॥१॥
देव दुरत्यया हे तव माया दे जनि विलया सतत महाभया । आगमगेया जय अनसूया तनया तारीं वारिं अपाया ॥२॥
नेणें मायातरणोपाया यास्तव धरिलें म्यां तव पाया । जय वासुदेवा तारिं वेदगेया तूंच कृपाळ सद्‌गुरुराया ॥३॥
दत्तात्रेया जय गुरुराया तुझिया पायां नमु यतिवर्या ॥

४९. जय करुणाकर जगदुद्धारा । अजि का रुससी परमोद्धारा ॥धृ.॥
तूं मायबाप धरितां कोपा । कोपा माझ्या तापा शमवी बापा । जय करुणाकर० ॥१॥
बालवाक्यापरी स्तव अवधारी । वारी मम चिंता तूंचि भवारी । जय करुणाकर० ॥२॥
तुज शरणागत तेचि कृतार्थ । व्यर्थ की हें मत वेदसंमत । जय करुणाकर० ॥३॥
जो मम भक्त मत्पदीं सक्त । दोषवियुक्त तो सुखयुक्त ॥ जय करुणाकर० ॥४॥
नाश न होई मम भक्ताचा । न करी मिथ्या हे तव वाचा ॥ जय करुणाकर० ॥५॥

५०. मंगलधामा अचिंत्यमहिमा भक्तां भजनी दे प्रेमा । नामा वदउनी कामा पुरवुनी नेतो अक्षयसुखधामा ॥धृ०॥
भजनीं जाउनी संतां वंदुनी दत्तस्वरूपा आठवुनी । चित्तीं चिंतुनी दृष्टी पाहुनी वदावें दत्तनाम वदनीं ॥१॥
तामस भोजन करिती जे जन आळस निद्रा ये नामा । उच्च स्वरांनीं टाळ्या पिटुनी घेतां न मिळे वाव तमा । मंगलधामा० ॥२॥
भजन समाप्ति होतां प्रणती करूनि स्मरावें आत्मारामा । मधुनि ऊठतां गोष्टी करितां जाति अधोगती दुर्जन्मा । मंगलधामा० ॥३॥
चिन्मय जाणुनि तन्मय होवुनि भजतां दत्तचि दे शर्मा । नर्मा सोडा कर्मा उलंडा तोडा भजनें भवमर्मा ॥ मंगलधामा० ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : September 27, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP