मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|श्री विष्णुदासांची कविता|अष्टक| पहिलें अष्टक पहिलें दुसरे तिसरे चवथे पांचवे सहावें सातवे आठवें नववें दहावें अकरावें बारावें तेरावें चौदावें पंधरावें सोळावें अष्टक महाकालीचें रेणुकास्तव अंबाबाईचें तुकाबाईचें श्रीरेणुकेचें प्रदीर्घ अष्टक प्रदीर्घ अष्टक प्रदीर्घ अष्टक प्रदीर्घ अष्टक अष्टक चिन्मयानंदाचें रेणुकेचें अष्टक - पहिलें श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा. Tags : ashtakpoemvishnudasअष्टककवितापदमराठीविष्णुदास पहिलें Translation - भाषांतर ( वृत्त : दिंडी )अखिल पतितांची, दुरित कृती केलीपतितपावन ही, कीर्ति आयकेलीम्हणुनि पडलों येउनी तुझ्या दारींलाज याची रेणुके, तुला सारी ॥१॥मूळपीठ स्वस्थानिं वास केलासतत जपलों मी नाममालिकेलाबहुत दिन गे, घातली तुझी वारीलाज याची रेणुके, तुला सारी ॥२॥जरी आहे मी स्वार्थ - काम - साधूतरी लोकांनीं मानियलें साधूतुझ्या नांवाची दाखवितों थोरीलाज याची रेणुके तुला सारी ॥३॥नसे ब्रह्मांडीं तुझ्यावीण कोणीअतां वेगें उडि घालि सुनिर्वाणींत्रिविध तापें तापलों असे भारीलाज याची रेणुके, तुला सारी ॥४॥गृहीं व्यालेली कामधेनु मायग्रामलोकांसी ताक मागुं कायकृपण म्हणतिल निर्दैवि हा भिकारीलाज याची रेणुके, तुला सारी ॥५॥जन्मतां गाजे सिंहिणिचें तोकग्रामसिंहाचे संगे करी शोकजंबुकाचें भय कंप घे शिकारीलाज याची रेणुके, तुला सारी ॥६॥होय सर्पाची दासि गरुड - मातागलंडानें वैद्याचि रडे कांतासमर्थाचा आश्रीत करी चोरीलाज याची रेणुके, तुला सारी ॥७॥तुझ्या नामीं विश्वास अल्प नाहींम्हणुनि धांवे दुष्कीर्ति कल्पना हीपतित पापी मी परम दुराचारीलाज याची रेणुके, तुला सारी ॥८॥तुझ्या चरणाची भेट घ्यावि वाटेपरी नेते प्रारब्ध आडवाटेंगळां पडली दृढ संचिताचि दोरीलाज याची रेणुके, तुला सारी ॥९॥अहा ! दारिद्र्यें पीडित गृह - दाराकर्जदारहि धावोनि येति दारात्यात रोगाची दाटली उभारीलाज याची रेणुके, तुला सारी ॥१०॥ चलित दिवसाची साथि काकि मामीपरी निर्वाणीं कुणि न ये कामींनिर्धनाची मानिती ते शिसारीलाज याची रेणुके, तुला सारी ॥११॥पहा बुडतों मी दुःखसागरांतकशी बसलिस तूं स्वस्थची घरांतकृपावंते ही विनती अवधारीलाज याची रेणुके, तुला सारी ॥१२॥सर्व माझे अजि हारले उपायम्हणुनि अंबे धरियले तुझे पायविष्णुदासाची दीनजननी, तारीलाज याची रेणुके, तुला सारी ॥१३॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP