आरती - आरती सहावी

श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्‍गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.


आरती सहावी
जय जय श्रीरेणुके, अंबे, मुळपीठनायके, हो
ओवाळूं आरती अखंडसौभाग्यदायके, हो ॥धृ०॥
प्रसन्न वदन सदा, द्विजराज विराजित राजिवनेत्रे, हो
बहु गंभिर गुणपात्रे, त्रिभुवनपावन परम पवित्रे, हो
रत्नजडित सिंहासन, दंड, मोरचल, चामर, छत्रें, हो
कटक - मुकुट - कुंडलें मौक्तिक - माणिक - मणि - नक्षत्रें हो
सकल भूषणालंकृत सुंदर गुणराजसबालके, हो ॥ जय० ॥१॥
आनंदघन मंडपीं बैसलिस स्वानंदें आनंदें हो
तुजपुढें गीत - प्रबंधें करि तांडव शिव ब्रह्मानंदें हो
शुभ मंगळ नवरात्रीं वाजती पर्वतिं सुस्वर वाद्यें हो
मांडिति नव पल्लव घट सनक - सनंदन सन्मुनि वृंदें हो
घालिति गोंधळ गोंधळी सहस्त्र वदनादिक बोलके हो ॥ जय० ॥२॥
भरजरि - शाल - पितांबर, काजळ, कुंकुम, कंकण, चुडे, हो
चंदन, पुष्पें, तांबुल, नारळ, लिंबें, साखरपुडे, हो
सुरवरगण संभारें ऋद्धि सिद्धि राबती पुढें हो
प्रचंड बळि होमानळिं पडती चंडमुंड बापुडे हो
तुझिया प्रौढ प्रतापें हरिहर डोलविती मस्तकें हो ॥ जय० ॥३॥
होम - हवन- विधि रात्रीं नवमिस पूर्णाहुति पारणें हो
विजयादशमिस झालिस अंबे, विजयी शमी - धारणें हो
कष्ट युगायुगिं सोसुनि केवळ भक्तांच्या कारणें हो
आदिमाये, तुज पडती नानाविधरुप आकारणें हो
विष्णुदास म्हणे, जय जय जय अनाथदिनपालके, हो ॥ जय० ॥४॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:53:50.6700000