अभंग - माझी रेणुका माउली

श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्‍गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.


माझी रेणुका माउली । कल्पवृक्षांची साउली ॥१॥
जैसी वत्सालागी गाय । तैसी अनाथासी माय ॥२॥
हाके सरशी घाइघाई । वेगें धांवतची पायीं ॥३॥
आली तापल्या उन्हांत । नाहीं आळस मनांत ॥४॥
खालीं बैस घे आराम । मुखावरती आला घाम ॥५॥
विष्णुदास आदरानें । वारा घाली पदरानें ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP