मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|श्री विष्णुदासांची कविता|भूपाळी आणि पदे|
राहुन गेलि मनांत

पद - राहुन गेलि मनांत

श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्‍गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.


( चाल : थोर तुझे उपकार. )
राहुन गेलि मनांत । मनाची ॥धृ०॥
दुर्दैवयोगें मोहमायेनें - लाविलि आडवि कनात । मनाची ॥१॥
समदृष्टीनें तुज पाहावें - तुझे गुण गावे भजनांत । मनाची ॥२॥
तुजकडे येतां मार्ग दिसेना - धुळ पडली नयनांत । मनाची ॥३॥
या षड्रिपु - निष्ठुर - यवनांनीं - गांठिलि गाय वनांत । मनाची ॥४॥
काळ जिवाच्या सुखसदनाच्या - शिरला चोर धनांत । मनाची ॥५॥
विष्णुदास म्हणे तुजविण हें मुख । दाखवुं काय जनांत । मनाची ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP