मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|श्री विष्णुदासांची कविता|भूपाळी आणि पदे|
जय भवानि

पद - जय भवानि

श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्‍गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.


जय भवानि भवानि बोल । तुझें वचनामृत सुविलोल ॥धृ०॥
भार्गवरामाच्या परि आम्हां । समसमान वजनीं तोल ॥१॥
जननि दिनाची, श्रुति वचनाची । नको करुं प्रतिज्ञा फोल ॥२॥
धीर धरवेना, मज तरवेना । भवसागर खोलचि खोल ॥३॥
काढ मी फसलों, तुडवित बसलों । महापाप चिखोल चिखोल ॥४॥
घडिमधें तोडिसि, मोडिसी जोडिसी । शतकोटी विरंची गोल ॥५॥
ये, माझे आई, तूं रेणुके आई । तुझ्या चढल कीर्तिला मोल ॥६॥
विष्णुदास म्हणें, तरि काय गाणें । तूं जरी न देसिल डोल ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP