मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद पूर्वार्ध|
श्मश्रुकर्माविषयीं मुहूर्त

तृतीयपरिच्छेद - श्मश्रुकर्माविषयीं मुहूर्त

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


आतां श्मश्रुकर्माविषयीं मुहूर्त सांगतो -

अथश्मश्रुकर्म श्रीपतिः पुष्येपौष्णेचाश्विनीष्वैंदवेचशाक्रेहस्ताद्यत्रिकेभेप्यदित्याः क्षौरंकार्यंवैष्णवादित्रयेचमुक्त्वाभौमादित्यपातंगिवारान् ‍ नस्नातभुक्तोत्कटभूषितानामभ्यक्तयात्रासमरोत्सुकानां क्षौरंविदध्यान्निशिसंध्ययोर्वाजिजीविषूणांनवमेनचाह्नि त्रिस्थलीसेतौवृद्धगार्ग्यः रव्यारसौरवारेषुरात्रौपातेव्रताहनि श्राद्धाहः प्रतिपद्रिक्ताभद्राः क्षौरेषुवर्जयेत् ‍ गार्ग्यः षष्ठ्यमापूर्णिमापातचतुर्दश्यष्टमीतथा आसुसन्निहितंपापंतैलेमांसेभगेक्षुरे राजमार्तंडः देवकार्येपितुः श्राद्धेरवेरंशपरिक्षये क्षौरकर्मनकुर्वीतजन्ममासेचजन्मभे बृहस्पतिः राजकार्येनियुक्तानांनराणांभूपजीविनाम् ‍ श्मश्रुलोमनखच्छेदेनास्तिकालविशोधनम् ‍ तथा क्षौरंनैमित्तिकंकार्यंनिषेधेसत्यपिध्रुवम् ‍ पित्रादिमृतिदीक्षासुप्रायश्चित्तेचतीर्थके केचित्तूत्तरार्धमन्यथा पठंति मुंडनस्यनिषेधेपिकर्तनंतुविधीयतइति नारदः नृपविप्राज्ञयायज्ञेमरणेबंधमोक्षणे उद्वाहेखिलवारर्क्षेतिथिषुक्षौरमिष्टदम् ‍ भारते प्राड्मुखः श्मश्रुकर्माणिकारयेतसमाहितः उदड्मुखोवाथभूत्वातथायुर्विंदतेमहत् ‍ अपरार्के उदड्मुखः प्राड्मुखोवावपनंकारयेत्सुधीः केशश्मश्रुलोमनखान्युदक्संस्थानिवापयेत् ‍ दक्षिणंकर्णमारभ्यधर्मार्थंपापसंक्षये शिखाद्यंनवसंस्कारेशिखाद्यंतंशिरोवपेत् ‍ यतीनांतुविशेषोनिगमे कक्षोपस्थशिखावर्जमृतुसंधिषुवापयेदिति अन्येपिविधिप्रतिषेधाः प्रागुक्ताः ।

श्रीपति - " पुष्य , रेवती , आश्विनी , मृग , ज्येष्ठा , हस्त , चित्रा , स्वाती , पुनर्वसु , श्रवण , धनिष्ठा , शततारका , ह्या नक्षत्रीं श्मश्रुकर्म करावें . मंगळ , रवि , शनि हे वार वर्ज्य करावे . स्नात , भुक्त , उत्तम भूषित , तैलाभ्यंग केलेला , देशांतरीं व युद्धास निघणारा यांनीं श्मश्रुकर्म करुं नये ; आणि रात्रीं , संध्याकाळीं , नवव्या दिवशीं श्मश्रु करुं नये . " त्रिस्थलीसेतूंत - वृद्धगार्ग्य - " रवि , मंगळ , शनि , ह्या वारीं श्मश्रु करुं नये . रात्रीं , व्यतीपातादि दुर्योगाचे ठायीं व व्रतदिवशीं श्मश्रु करुं नये . श्राद्धदिवस , प्रतिपदा , रिक्तातिथि , भद्रा हे दिवस श्मश्रुकर्माविषयीं वर्ज्य करावे . गार्ग्य - " षष्ठी , अमावास्या , पूर्णिमा , व्यतीपात , चतुर्दशी , अष्टमी , ह्या तिथींचे ठायीं तैलाभ्यंग , मांसभक्षण , स्त्रीसेवन , आणि श्मश्रुकर्म हीं करुं नयेत . " राजमार्तंड - " देवकार्य , मातापितरांचा श्राद्धदिवस , ग्रहण , जन्ममास , जन्मनक्षत्र यांचे ठायीं क्षौर करुं नये . " बृहस्पति - " राजकार्याविषयीं नेमलेले राजाचे सेवक यांस श्मश्रुकर्माविषयीं कालविचार नाहीं . तसेंच - वरील निषेध असला तरी नैमित्तिक क्षौर प्राप्त होईल तर तें करावें , तें असें - मातापितर इत्यादिकांचें मरण , दीक्षा , प्रायश्चित्त व तीर्थ यांचेठायीं क्षौर अवश्य करावें . " केचित् ‍ ग्रंथकार ‘ पित्रादिमृतिदीक्षासु प्रायश्चित्ते च तीर्थके ’ ह्या स्थानीं ‘ मुंडनस्य निषेधेपि कर्तनं तु विधीयते ’ असा पाठ करितात . त्याचा अर्थ " मुंडन करुं नये असा जरी निषेध आहे , तथापि केशांचें कर्तन करावें . " नारद - " क्षौराविषयीं राजाची आज्ञा , ब्राह्मणांची आज्ञा , यज्ञ , मरण , बंधांतून मुक्ति , विवाह ह्यांतून कोणतेंही एक निमित्त असतां सर्व तिथि , सारे वार , सारीं नक्षत्रें यांजवर श्मश्रुकर्म करावें . " भारतांत - " पूर्वाभिमुख व सावधान होऊन श्मश्रुकर्म करवावें . अथवा उत्तराभिमुख होऊन श्मश्रुकर्म करवावें ; तसें केलें असतां दीर्घायुष्य प्राप्त होतें . " अपरार्कांत - " श्मश्रुकर्म करविणें तें पुरुषानें उत्तराभिमुख किंवा पूर्वाभिमुख होऊन करवावें . केश , श्मश्रु , लोम आणि नखें यांचा छेद उदक्संस्थ करवावा . धर्मासाठीं कर्तव्य असतां उजव्या कर्णापासून आरंभ करुन श्मश्रुकर्म करवावें . पापनाशाकरितां कर्तव्य असतां शिखाद्य करावें . नवीन संस्कार असतां शिखेस आरंभ व शिखेवर समाप्ती होईल असें करावें . संन्याशांविषयीं विशेष सांगतो निगमांत - ‘ संन्यासी यांनीं ऋतूचे संधिकालीं कक्ष , उपस्थ , शिखा वर्ज्य करुन क्षौर करवावें . " ह्या श्मश्रुकर्माविषयीं इतर विधिप्रतिषेध पूर्वीं चौलप्रसंगीं सांगितले आहेत ते तेथें पाहावे .

आतां काष्ठें , गोवर्‍या इत्यादिकांचे संग्रहाविषयीं मुहूर्त सांगतो -

अथेंधनसंग्रहः ब्रह्मानिलार्कमघमूलत्रिपूर्वरौद्रपौष्णानुराधगुरुविष्णुविशाखयुक्ते वारेकुजार्कभृगुनंदनसोमजानांश्रेष्ठेंधनस्यकरणंभवतिप्रशस्तम् ‍ अथनवान्नम् ‍ श्रीपतिः रेवतीश्रुतिपुनर्वसुहस्तब्राह्मतः पृथगपिद्वितयेच त्र्युत्तरेषुगदितंपृथुकानांप्राशनंनवनवान्नविधानं अथनवभोजनपात्रम् ‍ ज्योतिर्निबंधे भोज्यपात्रंसुधासिंधौघटयेद्वासमाहरेत् ‍ तत्रान्नप्राशनप्रोक्तेकालेभोजनमाचरेत् ‍ अथनवपर्णफलादिभक्षणम् ‍ चंडेश्वरः मूलाश्विमैत्रकरतिष्यहरींद्रभेषुपौष्णोत्तरैंदवपुनर्वसुवासवेषु वारेषुभूमितनयार्कजवारवर्जंतांबूलनूतनफलाद्यशनंहिताय ।

" रोहिणी , स्वाती , हस्त , मघा , मूल , तीन पूर्वा , आर्द्रा , रेवती , अनुराधा , पुष्य , श्रवण , विशाखा ह्या नक्षत्रांवर ; मंगळ , रवि , शुक्र , सोम ह्या वारीं काष्ठें , गोवर्‍या यांचा संग्रह करावा . " आतां नवान्नभक्षणाविषयीं मुहूर्त सांगतो श्रीपति - " रेवती , अश्विनी , श्रवण , धनिष्ठा , पुनर्वसु , पुष्य , हस्त , चित्रा , रोहिणी , मृग , तीन उत्तरा ह्या नक्षत्रीं नवान्न भक्षण करावें . " भोजनपात्राविषयीं मुहूर्त सांगतो ज्योतिर्निबंधांत - " नवें भोजनपात्र सोमवारीं घडावें किंवा विकत घ्यावें . व त्या भोजनपात्रांत भोजन करणें तें अन्नप्राशनाला सांगितलेल्या दिवशीं करावें . " आतां नवीं पानें , सुपार्‍या वगैरे भक्षणाचा मुहूर्त सांगतो . चंडेश्वर - " मूल , अश्विनी , अनुराधा , हस्त , पुष्य , श्रवण , ज्येष्ठा , रेवती , तीन उत्तरा , मृग , पुनर्वसु , धनिष्ठा ह्या नक्षत्रांवर ; मंगळ , शनि हे वार वर्ज्य करुन अन्य वारीं ; नवीन नागवेलीपत्रें , नवीन सुपार्‍या इत्यादि फळें भक्षण करावीं . "

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP