मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद पूर्वार्ध|
औपासनाग्नीचें आधान

तृतीयपरिच्छेद - औपासनाग्नीचें आधान

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


आतां औपासनाग्नीचें आधान सांगतो -

अथावसथ्याधानम् ‍ पारस्करः आवसथ्याधानंदारकालेदायाद्यकालएकेषामिति दायाद्यकालोविभागकालः मदनरत्नेव्यासः अग्निर्वैवाहिकोयेननगृहीतः प्रमादिना पितर्युपरतेतेनगृहीतव्यः प्रयत्नतः योऽगृहीत्वाविवाहाग्निंगृहस्थइतिमन्यते अन्नंतस्यनभोक्तव्यंवृथापाकोहिसस्मृतः ज्येष्ठभ्रातरिपितरिवासाग्नौकनिष्ठस्यपुत्रस्यवाऽग्न्यभावेपिनदोषः तदाहतत्रैवगार्ग्यः पितृपाकोपजीवीवाभ्रातृपाकोपजीविकः ज्ञानाध्ययननिष्ठोवानदुष्येताग्निनाविना गृहस्थस्याप्यध्ययनमाहसत्यव्रतः अनधीत्यद्विजोवेदंस्नात्वोद्वाह्ययथातथा अधीतेब्रह्मचर्येणसांगंवेदंगुरोर्गृहे इदंचाधानंज्येष्ठेऽकृताधानेनकार्यम् ‍ दाराग्निहोत्रसंयोगंकुरुतेयोग्रजेस्थिते परिवेत्तासविज्ञेयः परिवित्तिस्तुपूर्वजइतिमनुशातातपोक्तेः स्मार्तेप्येवम् ‍ सोदर्येतिष्ठतिज्येष्ठेनकुर्याद्दारसंग्रहम् ‍ आवसथ्यंतथाधानंपतितस्तुतथाभवेदितितत्रैवगार्ग्योक्तेः आज्ञायांत्वदोषमाहसुमंतुः ज्येष्ठोभ्रातायदातिष्ठेदाधानंनैवचाश्रयेत् ‍ अनुज्ञातस्तुकुर्वीतशंखस्यवचनंयथा वृद्धवसिष्ठः अग्रजस्तुयदाऽनग्निरादध्यादनुजः कथम् ‍ अग्रजानुमतः कुर्यादग्निहोत्रंयथाविधि हारीतः सोदराणांतुसर्वेषांपरिवेत्ताकथंभवेत् ‍ दारैस्तुपरिविद्यंतेनाग्निहोत्रेणनेज्यया अधिकारिणोपिभ्रातुरनुज्ञयाकुर्यादितिमदनपारिजातः विवाहस्त्वनुज्ञयापिनेत्यर्थः सोदरोक्तेरसोदराणांसापत्नदत्तकादीनांनदोषः तदाहहेमादौ वसिष्ठः पितृव्यपुत्रान् ‍ सापत्नान् ‍ परनारीसुतांस्तथा दाराग्निहोत्रसंयोगेनदोषः परिवेदने परनारीसुतादत्तकादयः देशांतरेविशेषमाहसएव अष्टौदशद्वादशवर्षाणिवाज्येष्ठभ्रातरमनिविष्टमप्रतीक्षमाणः प्रायश्चित्तीभवतीति ॥

पारस्कर - " औपासनाग्नीचें आधान विवाहकालीं होतें . कितीएकांच्या मतीं दायविभागकालीं होतें . " मदनरत्नांत व्यास - " ज्या पुरुषानें प्रमादाच्या योगानें विवाहाग्नि धारण केला नसेल त्यानें पिता मृत झाल्यावर मोठ्या प्रयत्नानें घ्यावा . जो मनुष्य विवाहाग्नि ग्रहण केल्यावांचून आपण गृहस्थ असें मानितो त्याचें अन्न भक्षण करुं नये ; कारण , तो वृथापाक म्हटला आहे . " ज्येष्ठ भ्राता किंवा पिता हे साग्निक असतील तर कनिष्ठ भ्राता किंवा पुत्र यांचा अग्नि नसला तरी दोष नाहीं . तें सांगतो तेथेंच गार्ग्य - " पित्याच्या पाकानें उपजीवन करणारा अथवा भ्रात्याच्या पाकानें उपजीवन करणारा किंवा ज्ञान व अध्ययन यांविषयीं तत्पर असलेला पुरुष विवाहाग्नि नसला तरी दूषित होत नाहीं . " गृहस्थाश्रम्यालाही अध्ययन सांगतो सत्यव्रत - " द्विजाचें समावर्तनाच्या पूर्वीं वेदाध्ययन झालें नसेल तर जसें तसें समावर्तन करुन विवाह करुन नंतर गुरुच्या घरीं ब्रह्मचर्य धारण करुन सांगवेदाचें अध्ययन करावें . " हें वर सांगितलेलें श्रौताग्नीचें आधान ज्येष्ठ भ्रात्यानें आधान केलें नसेल तर कनिष्ठानें करुं नये . कारण , " ज्येष्ठ भ्राता अनाहिताग्नि असतां जो कनिष्ठ भ्राता पत्नी आणि अग्निहोत्र यांचा संयोग करितो तो परिवेत्ता जाणावा . आणि ज्येष्ठ भ्राता परिवित्ति होय . " असें मनु , शातातप यांचें वचन आहे . स्मार्ताधानाविषयींही असेंच समजावें . कारण , " सहोदर ज्येष्ठ भ्राता अविवाहित असतां कनिष्ठानें पत्नीसंग्रह आणि आवसथ्याग्नीचें ( स्मार्ताग्नीचें ) आधान करुं नये . करील तर पतित होईल . " असें तेथेंच ( मदनरत्नांतच ) गार्ग्यवचन आहे . ज्येष्ठाची आज्ञा असेल तर दोष नाहीं , असें सांगतो सुमंतु - " जेव्हां ज्येष्ठ भ्राता असेल आणि आधान करणार नाहीं तेव्हां त्याची आज्ञा घेऊन कनिष्ठानें आधान करावें , असें शंखाचें वचन आहे . " वृद्धवसिष्ठ - " जेव्हां ज्येष्ठ भ्राता अनग्निक असेल तेव्हां कनिष्ठानें कसें करावें ? अग्रजाची आज्ञा घेऊन कनिष्ठानें यथाविधि अग्निहोत्र करावें . " हारीत - " सर्व सहोदर भ्रात्यांमध्यें परिवेत्ता कसा होईल ? ज्येष्ठाला सोडून कनिष्ठ विवाह करील तर तो परिवेत्ता होईल . अग्निहोत्र किंवा यज्ञ केल्यानें परिवेत्ता होत नाहीं . " ज्येष्ठ भ्राता अधिकारी असला तरी त्याच्या अनुज्ञेनें कनिष्ठानें आधान करावें , असें मदनपारिजात सांगतो . विवाह तर अनुज्ञेनें देखील करुं नये , असें तात्पर्य . वरील हारीतवचनांत ‘ सोदराणां ’ म्हणजे सोदरांना दोष , असें सांगितल्यावरुन असहोदारांना दोष नाहीं . तेंच सांगतो हेमाद्रींत वसिष्ठ - " पितृव्याचे पुत्र , सापत्न भ्राते , परनारीसुत ( दत्तकादिक ), यांना सोडून भार्या आणि अग्निहोत्र यांचा संयोग केला असतां परिवेदनाचा दोष नाहीं . " देशांतरीं असेल तर तोच विशेष सांगतो - " देशांतरीं गेलेल्या ज्येष्ठ भ्रात्याची आठ , दहा , किंवा बारा वर्षैपर्यंत प्रतीक्षा न करणारा ( म्ह० तितक्या वर्षांच्या आंत विवाह करणारा ) प्रायश्चित्ताला योग्य होतो .

क्लीबादावप्यदोषमाहकात्यायनः देशांतरस्थक्लीबैकवृषणानसहोदरान् ‍ वेश्यानिष्ठांश्चपतितशूद्रतुल्यातिरोगिणः जडमूकांधबधिरकुब्जवामनखंजकान् ‍ अतिवृद्धानभार्यांश्चकृषिसक्तान्नृपस्यच धनवृद्धिप्रसक्तांश्चकामतोकारिणस्तथा कुटिलोन्मत्तचोरांश्चपरिविंदन्नदुष्यति आशार्केपि उन्मत्तः किल्बिषीकुष्ठीपतितः क्लीबएववा राजयक्ष्मामयावीचनन्याय्यः स्यात्प्रतीक्षितुम् ‍ एवंज्येष्ठेछिन्नहस्तादावपिनपरिवेत्तृत्वम् ‍ तदाहत्रिकांडमंडनः दर्शेष्टिंपौर्णमासेष्टिंसोमेज्यामग्निसंग्रहम् ‍ अग्निहोत्रंविवाहंचप्रयोगेप्रथमेस्थितम् ‍ नकुर्याज्जनकेज्येष्ठेसोदरेचाप्यकुर्वति क्षेत्रजादावनीजानेविद्यमानेपिसोदरे नाधिकारविघातोस्तिभिन्नोदर्येपिचौरसे पंग्वंधमूकबधिरपतितोन्माददूषणे संन्यस्तेच्छिन्नहस्तादौयद्वाषंढादिदूषणे जनकेसोदरेज्येष्ठेकुर्यादेवेतरः क्रियामिति आरोहतंदशतंशक्करीर्ममेत्याधानेमंत्रवर्णाच्च शक्करीरंगुलीः तंत्ररत्नेप्युक्तम् ‍ अंगवैकल्यात्पूर्वमाहिताग्नित्वेऽधिक्रियेतैवनित्येषु आधानंतुनकुर्यात्तस्यनैमित्तिकत्वादिति एवंचतुरंगुलेपि षडंगुलकाणविवर्णादेस्त्वस्त्येवाधिकारः एकादशसुदशांतर्गतेः शरीरकार्श्यंवाविप्रतिषिद्धमितिहिरण्यकेशिसूत्रेकर्माशक्तिहेतोरेवांगवैकल्यस्यनिषेधात् ‍ अतएवकात्यायनसूत्रेयाज्यश्चप्रथमैस्त्रिभिर्गुणैरितिन्यूनांगस्याप्यधिकारउक्तः अपरार्केउशनाः पितापितामहोयस्य अग्रजोवाथकस्यचित् ‍ तपोग्निहोत्रमंत्रेषुनदोषः परिवेदने पितुराज्ञायामप्यदोषमाहमदनरत्नेसुमंतुः पित्रायस्यतुनाधातंकथंपुत्रस्तुकारयेत् ‍ अग्निहोत्रेधिकारोस्तिशंखस्यवचनंयथेति नाधातंनाधानंकृतमित्यर्थः एतदाज्ञायामेवेतिहेमाद्रिः यत्तु पितुः सत्यप्यनुज्ञानेनादधीतकदाचनेति तत्सत्यधिकारेज्ञेयम् ‍ ॥

ज्येष्ठभ्राता षंढ वगैरे असतांही दोष नाहीं , असें सांगतो कात्यायन - " देशांतरीं गेलेला , षंढ , एकवृषण , सहोदरभिन्न , वेश्यासक्त , पतित , शूद्रतुल्य , अतिरोगी , मूर्ख , मुका , आंधळा , बहिरा , कुबडा , खुजा , लंगडा , अतिवृद्ध , मृतपत्नीक , कृषिकर्माविषयीं आसक्त , राजाच्या द्रव्यवृद्धीविषयीं आसक्त , स्वेच्छेनें विवाह न करणारा , कुटिल , उन्मत्त , चोर , अशी प्रकारच्या ज्येष्ठास सोडून कनिष्ठ विवाह करील तर तो दोषी होणार नाहीं . " आशार्कांतही - " उन्मत्त , पापी , कुष्ठी , पतित , षंढ , आणि राजयक्ष्मी ( क्षयी ) अशा प्रकारच्या ज्येष्ठाची प्रतीक्षा करणें न्याय्य होणार नाहीं . " याप्रमाणें ज्येष्ठ हात तुटलेला वगैरे असतांही परिवेत्तृत्व दोष होत नाहीं . तें सांगतो त्रिकांडमंडन - " दर्शेष्टि , पौर्णमासेष्टि , सोमयाग , अग्न्याधान , अग्निहोत्र , विवाह , यांचा प्रथम प्रयोग जनकपिता व सहोदर ज्येष्ठभ्राता करीत नसतां कनिष्ठानें करुं नये . सहोदर क्षेत्रजादि भ्राता विद्यमान असून तो अग्निहोत्रादि होम करीत नसेल अथवा सापत्न भ्राता असून तो करीत नसेल तर कनिष्ठाला अधिकार नाहीं , असें नाहीं . पांगळा , आंधळा , मुका , बहिरा , पतित , उन्मादरोगी , संन्यास घेतलेला , हात वगैरे तुटलेला अथवा षंढत्व इत्यादि दूषणानें युक्त असा जनक पिता किंवा सहोदर भ्राता असतां कनिष्ठादिकानें अग्निहोत्रादि कर्म करावेंच . " आणि आधानाच्या मंत्रांत ‘ माझ्या दहा अंगुलींप्रत ’ असेंही सांगितलें आहे , यावरुन आधानकालीं दहा अंगुली अवश्य असल्या पाहिजेत असेंही होतें . तंत्ररत्नांतही सांगतो - " अंग विकल ( छिन्नादि ) होण्याच्या पूर्वीं अग्नीचें आधान केलेलें असेल तर पुढें अंग विकल झालें तरी नित्यकर्माविषयीं अधिकारी होईलच . आधान तर अंगवैकल्य असतां करुं नये . कारण , आधान हें नैमित्तिक आहे . याप्रमाणें छिन्न हस्त असतां जसें आधान होत नाहीं . तसेंच एका हातास चार अंगुलि असतांही आधान होत नाहीं . एका हातास सहा अंगुलि असलेला , काणा , वर्णरहित इत्यादिकांना तर अधिकार आहेच . कारण , अकरा अंगुलींत दहा अंगुलि आहेत . " अथवा शरीरकार्श्य हें प्रतिषिद्ध सांगितलें आहे . " ह्या हिरण्यकेशिसूत्रांत ज्या अंगाच्या विकलत्वानें ( राहित्यानें ) त्या कर्माविषयीं असमर्थ होईल त्याच अंगविकलत्वाचा निषेध केलेला आहे . म्हणूनच कात्यायनसूत्रांत - " पहिल्या तीन गुणांनीं जो युक्त त्याच्याकडून यजन करावें . " असा अंगन्यून असलेल्या पुरुषासही अधिकार सांगितला आहे . अपरार्कांत उशना - " ज्याचा पिता , पितामह , आणि ज्येष्ठ भ्राता यांनीं केलेलें नसून जर कोणीं तप , अग्निहोत्र , आणि वेदाध्ययन करील तर त्याला परिवेदनरुप दोष प्राप्त होत नाहीं . " पित्याची आज्ञा असतांही दोष नाहीं , असें सांगतो मदनरत्नांत सुमंतु - " ज्याच्या पित्यानें आधान केलें नसेल त्याचा पुत्र आधान कसें करील ? त्याला अग्निहोत्राविषयीं अधिकार आहे , असें शंखाचें वचन आहे . " हा पुत्राला अग्निहोत्राविषयीं अधिकार पित्याची आज्ञा असतांच आहे , असें हेमाद्रि सांगतो . आतां जें " पित्याची आज्ञा असली तरी पुत्रानें कधींही आधान करुं नये " असें सांगितलें आहे , तें पित्याला अधिकार असतां समजावें .

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP