मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद पूर्वार्ध|
विवाहाविषयीं मासनिर्णय

तृतीयपरिच्छेद - विवाहाविषयीं मासनिर्णय

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


आतां विवाहाविषयीं मासनिर्णय सांगतो -

अथमासनिर्णयः तत्रजन्ममासेविशेषः प्रागुक्तः ज्योतिः प्रकाशेव्यासः माघफाल्गुनवैशाखेयद्यूढामार्गशीर्षके ज्येष्ठेवाषाढमासेचसुभगावित्तसंयुता श्रावणेवापिपौषेवाकन्याभाद्रपदेतथा चैत्राश्वयुक्कार्तिकेषुयातिवैधव्यतांलघु नारदः माघफाल्गुनवैशाखज्येष्ठमासाः शुभप्रदाः कार्तिकोमार्गशीर्षश्चमध्यमौनिंदिताः परे वसिष्ठः पौषेपिकुर्यान्मकरस्थितेर्केचैत्रेभवेन्मेषगतोयदास्यात् ‍ प्रशस्तमाषाढकृतंविवाहंवदंतिगर्गामिथुनस्थितेर्के आचार्यचूडामणौज्योतिर्गर्गराजमार्तंडौ मांगल्येषुविवाहेषुकन्यासंवरणेषुच दशमासाः प्रशस्यंतेचैत्रपौषवर्जिताः आपस्तंबः सर्वऋतवोविवाहस्य शैशिरौमासौपरिहाप्योत्तमंचनैदाघम् ‍ अत्रमाघफाल्गुनाषाढवर्जंनवमासामुख्यः कालइति सुदर्शनभाष्येइडबिलायांब्रह्मविद्यातीर्थैश्चोक्तम् ‍ बौधायनसूत्रेपि सर्वेमासाविवाहस्यशुचितपस्तपस्यवर्ज्यमित्येके तेनपूर्वोत्तरौशिशिरसंबंधिनौमासौपौषचैत्रौविहायइति निर्णयामृतव्याख्यानंमौर्ख्यकृतमित्युपेक्ष्यं निशिचेत्सर्वेषुद्वादशस्वपिसासेषूद्वहेदितिकालादर्शः येतुज्योतिषेमाघादिविधयस्तेगृह्यसूत्राणांद्विजपरत्वेनप्राबल्याच्छूद्रादिपराः ज्योतिषे वात्स्योवर्षमनूनमिच्छतितथारैभ्योयनंचोत्तरंश्रीवासंतमृतुंविहायमुनयोमांडव्यशिष्याजगुः चैत्रंप्रोज्झ्यपराशरः परिणयेपौषंचदौर्भाग्यदंह्याषाढादिचतुष्ट्यंनहितदंकैश्चित् ‍ प्रदिष्टंबुधैः चंडेश्वरः मार्गेमासितथा ज्येष्ठेक्षौरंपरिणयंव्रतम् ‍ ज्येष्ठपुत्रदुहित्रोस्तुयत्नेनपरिवर्जयेत् ‍ कृत्तिकास्थंरविंत्यक्त्वाज्येष्ठपुत्रस्यकारयेत् ‍ उत्सवादिषुकार्येषुदिनानिदशवर्जयेत् ‍ रत्नकोशे जन्मर्क्षेजन्मदिवसेजन्ममासेशुभंत्यजेत् ‍ ज्येष्ठेमास्याद्यगर्भस्यशुभंवर्ज्यंस्त्रियाअपि पराशरः अज्येष्ठाकन्यकायत्रज्येष्ठपुत्रोवरोयदि व्यत्ययोवातयोस्तत्रज्येष्ठमासः शुभप्रदः मिहिरः ज्येष्ठस्यज्येष्ठकन्यायाविवाहोनप्रशस्यते तयोरन्यतरेज्येष्ठेज्येष्ठोमासः प्रशस्यते द्वौज्येष्ठौमध्यमौप्रोक्तावेकंज्येष्ठंशुभावहं ज्येष्ठत्रयंनकुर्वीतविवाहेसर्वसंमतम् ‍ यत्तुसार्वकालमेकेविवाहमिति तदासुरादिविवाहविषयम् ‍ धर्म्येषुविवाहेषुकालपरीक्षणंनाधर्म्येष्वितिगृह्यपरिशिष्टात् ‍ रत्नमालायामप्येवं ( तेनासुरादयोमाघचैत्रादिनिषिद्धकालेष्वपिभवंति मासाः सौराः सौरोमासोविवाहादावित्युक्तेः झषोननिंद्योयदिफाल्गुनेस्यादजस्तुवैशाखगतोननिंद्यइतित्वपवादः ॥ )

त्यांत जन्ममासाविषयीं विशेष निर्णय पूर्वीं ( उपनयनप्रकरणीं ) सांगितला आहे . ज्योतिःप्रकाशांत व्यास - " माघ , फाल्गुन , वैशाख , मार्गशीर्ष , ज्येष्ठ आणि आषाढ , या मासांत विवाह केला असतां ती स्त्री सुभगा आणि द्रव्ययुक्त अशी होते . श्रावण , पौष , भाद्रपद , चैत्र , आश्विन आणि कार्तिक या मासांत विवाह केला असतां तिला वैधव्य प्राप्त होतें . " नारद - " माघ , फाल्गुन , वैशाख आणि ज्येष्ठ हे मास विवाहाविषयीं शुभकारक आहेत . कार्तिक आणि मार्गशीर्ष दोन मध्यम आहेत . बाकीचे मास निंदित आहेत . " वसिष्ठ - " मकरराशीस सूर्य असतां पौषांतही विवाह करावा . मेषराशीस सूर्य असतां चैत्रांत विवाह करावा . मिथुनराशीस सूर्य असतां आषाढांत विवाह करावा तो प्रशस्त आहे , असें गर्गमुनि सांगतात . " आचार्यचूडामणींत ज्योतिर्गर्ग आणि राजमार्तंड सांगतात - " मांगलिक विवाह आणि कन्यावरण ह्या कृत्यांविषयीं चैत्र आणि पौष हे दोन मास वर्ज्य करुन बाकीचे दहा मास प्रशस्त आहेत . " आपस्तंब - " शिशिरऋतूचे दोन मास व ग्रीष्मऋतूंतील अंत्य मास हे तीन मास वर्ज्य करुन सारे ऋतु विवाहास सांगितले आहेत . " ह्या आपस्तंबसूत्रावरुन माघ , फाल्गुन , व आषाढ , हे तीन मास वर्ज्य करुन बाकीचे नऊ मास विवाहाचा मुख्यकाल आहे , असें सुदर्शनभाष्यांत आणि इडबिलाग्रंथांत ब्रह्मविद्यातीर्थांनीं सांगितलें आहे . बौधायनसूत्रांतही - " आषाढ आणि फाल्गुन हे दोन मास वर्ज्य करुन बाकीचे सारे मास विवाहाचा काल आहे , असें कितीएक आचार्य सांगतात . " यावरुन ( सुदर्शनभाष्य , इडबिला , बौधायनसूत्र , यांवरुन ) ‘ शैशिरौ मासौ परिहाप्य ’ ह्या आपस्तंबसूत्राचें , ‘ शिशिरऋतुसंबंधी दोन मास वर्ज्य करुन म्हणजे शिशिरऋतूच्या पूर्वींचा एक तो पौष आणि शिशिरऋतूच्या पुढचा एक तो चैत्र हे दोन मास वर्ज्य करुन ’ असें निर्णयामृतकारानें केलेलें व्याख्यान मूर्खत्वानें केलेलें असल्यामुळें तें उपेक्षणीय ( अग्राह्य ) आहे . रात्रीं जर विवाह करावयाचा असेल , तर तो बाराही मासांत करावा , असें कालादर्शकार सांगतो . आपस्तंब - बौधायनसूत्रांवरुन माघ , फाल्गुन , आषाढ हे विवाहास वर्ज्य आहेत , असें झालें . आतां जे ज्योतिषांत माघ , फाल्गुन , आषाढमास विवाहास उक्त आहेत ते शूद्रादिकांना समजावे . कारण , द्विजांचे धर्म सांगण्याकरितां गृह्यसूत्रें प्रवृत्त असल्यामुळें ते धर्म प्रबळ असल्याकारणानें गृह्यसूत्रोक्त विधि द्विजांना समजावे . आणि इतर ग्रंथांत सांगितलेले विधि शूद्रादिकांना समजावे . ज्योतिषांत - " वात्स्यमुनि सारें वर्ष ( बाराही मास ) विवाहाचा काल सांगतो , रैभ्यमुनि उत्तरायण विवाहकाल सांगतो . मांडव्यमुनीचे शिष्य वसंतऋतु वर्ज्य करुन विवाहकाल सांगतात . पराशर मुनि चैत्र वर्ज्य करुन विवाहकाल सांगतो . कितीएक विद्वान् ‍ विवाहाविषयीं पौषमास दुर्भाग्यदायक आहे , आणि आषाढ , श्रावण , भाद्रपद , आश्विन हे चार मास हितकारक नाहींत , असें सांगतात . " चंडेश्वर - " मार्गशीर्ष आणि ज्येष्ठ या मासांत ज्येष्ठ पुत्र व ज्येष्ठ कन्या यांचें चौलादि मुंडन , विवाह व उपनयन हीं यत्नानें वर्ज्य करावीं . कृत्तिका नक्षत्राचा रवि सोडून ज्येष्ठ पुत्राचें उपनयनादिक मंगल करावें . उत्सवादिकार्यांविषयीं , कृत्तिकानक्षत्रास रवि असतां दहा दिवस वर्ज्य करावे . " रत्नकोशांत - " जन्मनक्षत्रावर , जन्मदिवशीं व जन्ममासांत शुभकार्य करुं नये . ज्येष्ठ मासांत ज्येष्ठ पुत्राचें व ज्येष्ठ कन्येचें मंगल कार्य वर्ज्य करावें . " पराशर - " ज्या विवाहांत वधू ज्येष्ठ नाहीं आणि वर ज्येष्ठ आहे किंवा वर ज्येष्ठ नाहीं आणि वधू ज्येष्ठ आहे त्या विवाहांत ज्येष्ठ मांस शुभदायक आहे . " मिहिर - " ज्येष्ठ वर आणि ज्येष्ठ वधू यांच्या विवाहास ज्येष्ठ मास प्रशस्त नाहीं . त्या वधूवरांमध्यें एक ज्येष्ठ असेल तर ज्येष्ठ मास प्रशस्त आहे . दोन ज्येष्ठ मध्यम सांगितले आहेत . एक ज्येष्ठ शुभदायक आहे . विवाहाविषयीं तीन ज्येष्ठ ( वधू ज्येष्ठ , वर ज्येष्ठ , मास ज्येष्ठ ) करुं नयेत , हें मत सर्वांना मान्य आहे . " आतां जें " कितीएक आचार्य सर्वकालीं विवाह करावा , असें सांगतात " असें आश्वलायनगृह्यसूत्राचें वचन आहे , तें आसुर , पैशाच , राक्षस ह्या विवाहांविषयीं समजावें . कारण , " धर्मयुक्त विवाहांविषयीं मुहूर्त पाहावा . अधर्मयुक्त विवाहांविषयीं मुहूर्त पाहण्याचें कारण नाहीं " असें गृह्यपरिशिष्टांत सांगितलें आहे . रत्नमालेंतही असेंच सांगितलें आहे .

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP