मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद पूर्वार्ध|
गुरु व रवि यांचें बल

तृतीयपरिच्छेद - गुरु व रवि यांचें बल

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


आतां गुरु व रवि यांचें बल सांगतो -

अथगुर्वर्कबलं ज्योतिर्निबंधेगर्गः स्त्रीणांगुरुबलंश्रेष्ठंपुरुषाणांरवेर्बलम् ‍ तयोश्चंद्रबलंश्रेष्ठमितिगर्गेणभाषितम् ‍ जन्मत्रिदशमारिस्थः पूजयाशुभदोगुरुः विवाहेऽथचतुर्थाष्टद्वादशस्थोमृतिप्रदः देवलः नष्टात्मजाधनवतीविधवाकुशीलापुत्रान्विताहतधवासुभगाविपुत्रा स्वामिप्रियाविगतपुत्रधवाधनाढ्यावंध्याभवेत्सुरगुरौक्रमशोभिजन्मा बृहस्पतिः झषचापकुलीरस्थोजीवोप्यशुभगोचरः अतिशोभनतांदद्याद्विवाहोपनयादिषु लल्लः द्वादशदशमचतुर्थेजन्मनिषष्ठाष्टमेतृतीयेच प्राप्तेपाणिग्रहणेजीवेवैधव्यमाप्नोति गर्गः सर्वत्रापिशुभंदद्याद्दादशाब्दात् ‍ परंगुरुः पंचषष्ठाब्दयोरेवशुभगोचरतामता सप्तमात्पंचवर्षेषुस्वोच्चस्वर्क्षगतोयदि अशुभोपिशुभंदद्याच्छुभऋक्षेषुकिंपुनः रजस्वलायाः कन्यायागुरुशुद्धिंनचिंतयेत् ‍ अष्टमेपिप्रकर्तव्योविवाहस्त्रिगुणार्चनात् ‍ अर्कगुर्वोर्बलंगौर्यारोहिण्यर्कबलास्मृता कन्याचंद्रबलप्रोक्तावृषलीलग्नतोबला अष्टवर्षाभवेद्गौरीनववर्षाचरोहिणी दशवर्षाभवेत्कन्याअतऊर्ध्वंरजस्वला ।

ज्योतिर्निबंधांत गर्ग - " स्त्रियांना गुरुबळ श्रेष्ठ आणि पुरुषाला रविबळ श्रेष्ठ . स्त्रिया व पुरुष या दोघांना चंद्रबळ श्रेष्ठ आहे , असें गर्गानें सांगितलें आहे . विवाहकालीं गोचरींचा जन्मस्थ , तिसरा , दहावा , आणि सहावा गुरु असतां पूजेनें ( बृहस्पतिशांति केल्यानें ) शुभकारक होतो . आणि चवथा , आठवा , व बारावा असला म्हणजे तो मृत्युदायक आहे . " देवल - " स्त्रियेच्या विवाहकालीं गुरु जन्मराशीस असतां नष्टपुत्रा , दुसरा असतां धनयुता , तिसरा असतां विधवा , चवथा असतां निंद्यशीला , पांचवा असतां पुत्रयुता , सहावा असतां मृतभर्तृका , सातवा असतां सुभगा , आठवा असतां पुत्ररहिता , नववा असतां पतिप्रिया , दहावा असतां पतिपुत्ररहिता , अकरावा असतां धनाढ्य , आणि बारावा असतां वंध्या अशी स्त्री होते . " बृहस्पति - " मीन , धनु आणि कर्क या स्थानींचा गुरु जन्मराशीस अशुभ असला तरी विवाह ,

उपनयन इत्यादि मंगलकार्यांचे ठायीं तो अति शुभकारक होईल . " लल्ल - " स्त्रियेच्या पाणिग्रहण ( विवाह ) समयीं बारावा , दहावा , चवथा , जन्मराशिस्थ , सहावा , आठवा , व तिसरा गुरु प्राप्त . झाला असतां त्या स्त्रियेला वैधव्य प्राप्त होतें . " गर्ग - " कन्येचा विवाह बारा वर्षांच्या पुढें करावयाचा असतां कोणत्याही ठिकाणीं गुरु असला तरी तो शुभदायक होतो . पांचव्या व सहाव्या दोन वर्षांत विवाह कर्तव्य असतां गोचरींचा गुरु शुभस्थानीं असावा , असें सांगितलें आहे . सात वर्षांपासून बाराव्या वर्षापर्यंत पांच वर्षांत विवाह कर्तव्य असतां जर खोच्चींचा किंवा स्वस्थानींचा गुरु असेल तर मग तो गोचरीं अशुभस्थानीं असला तरी शुभदायक होईल , मग शुभस्थानीं असला म्हणजे शुभदायक होईल हें काय सांगावें ? ऋतु प्राप्त झालेल्या कन्येचा विवाह कर्तव्य असतां गुरुबलाचा विचार करुं नये . गोचरीं आठवा गुरु असला तरी तीन वेळां गुरुपूजा ( बृहस्पतिशांति ) करुन विवाह करावा . गौरीला रविगुरुंचें बळ पाहावें . रोहिणीला रवीचें बळ पाहावें . कन्येला चंद्रबळ पाहावें . आणि वृषलीला ( ऋतुमतीला ) लग्नबळ पाहावें . आठ वर्षांची कन्या गौरी म्हटली आहे , नऊ

वर्षांची रोहिणी , दहा वर्षांची ती कन्या म्हटली आहे . याच्यापुढें रजस्वला म्हटली आहे . "

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP