मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद पूर्वार्ध|
विवाह

तृतीयपरिच्छेद - विवाह

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .

आतां विवाह सांगतो -

अथविवाहः याज्ञवल्क्यः अविप्लुतब्रह्मचर्योलक्षण्यांस्त्रियमुद्वहेत् ‍ अनन्यपूर्विकांकांतामसपिंडांयवीयसीम् ‍ आरोगिणींभ्रातृमतीमसमानार्षगोत्रजाम् ‍ लक्षण्यांबाह्याभ्यंतरलक्षणैर्युक्ताम् ‍ बाह्यानि काशीखंडादौप्रसिद्धानि आंतराण्याश्वलायनोक्तान्यष्टौपिंडान् ‍ कृत्वेत्यादीनि मनुः असपिंडाचयामातुरस गोत्राचयापितुः साप्रशस्ताद्विजातीनांदारकर्मणिमैथुने दत्रिममातुर्गृहीताअसपिंडासगोत्रा तत् ‍ कुलनिवृत्तयेचकारान्मातुरसगोत्रा दत्तस्यपितुर्जनककुलेपितुरसगोत्रापिसपिंडत्वान्निषिद्धेत्यन्यश्चकारः असपिंडांसापिंड्यरहिताम् ‍ तच्चैकशरीरावयवान्वयेनभवति एकस्यहिपितुर्मातुर्वाशरीरस्यावयवाः पुत्रपौत्रादिषुसाक्षात्परंपरयावाशुक्रशोणितादिरुपेणानुस्यूताः यद्यपिपत्न्याः पत्यासहभ्रातृपत्नीनांचपरस्परंनैतत्संभवति तथापिआधारत्वेनैकशरीरावयवान्वयोस्त्येव अस्थिभिरस्थीनीतिमंत्रलिंगात् ‍ एकस्यहिपितृशरीरस्यावयवाः पुत्रद्वारातास्वाहिताइतिमदनरत्नपारिजातविज्ञानेश्वरादयः वाचस्पतिशुद्धिविवेकशूलपाण्यादि गौडमैथिलादयोप्येवम् ‍ श्रुतावपि एतत् ‍ षाट् ‍ कौशिकंशरीरं त्रीणिपितृतस्त्रीणिमातृतोऽस्थिस्नायुमज्जानः पितृतस्त्वड्मांसरुधिराणिमातृत इति प्रजामनुप्रजायसेइतिच ।

याज्ञवल्क्य - " ज्याचें ब्रह्मचर्य अस्खलित आहे अशा पुरुषानें समावर्तन केल्यावर चांगल्या लक्षणांनीं युक्त अशी स्त्री वरावी . ती स्त्री कशी असावी ती सांगतो - जिला पूर्वीं कोणी वरलेली नाहीं अशी , आपल्याला आवडणारी , आपल्या सपिंडांतील नसलेली , वयानें व शरीरानें धाकटी , रोगरहित , जीचा भ्राता आहे अशी , जिचा प्रवर व गोत्र पतीच्या प्रवर व गोत्राहून भिन्न आहेत अशा प्रकारची स्त्री वरावी . " येथें लक्षणांनीं युक्त स्त्री वरावी , असें सांगितलें , तीं लक्षणें दोन प्रकारचीं - बाह्य लक्षणें आणि आभ्यंतर लक्षणें . बाह्य लक्षणें ( शारीर लक्षणें ) काशीखंडादिकांत प्रसिद्ध आहेत . आभ्यंतर लक्षणें म्हणजे शरीरावरुन न समजणारीं पुढील शुभाशुभसूचक चिह्नें आश्वलायनांनीं सूत्रांत सांगितलीं तीं अशीं - चहूंकडे शेत असलेल्या मधल्या क्षेत्रांतील मातीचा एक पिंड , गोठ्यांतील मातीचा एक पिंड , अग्निहोत्राच्या शाळेंतील भस्माचा एक पिंड , पाणी न आटणार्‍या डोहांतील मातीचा एक पिंड , जुगार खेळण्याच्या जाग्यावरील मातीचा एक पिंड , चवाठ्यावरील मातीचा एक पिंड , गवत व शेत न रुजणार्‍या जागेच्या मातीचा एक पिंड , आणि स्मशानांतील मातीचा एक पिंड , असे आठ पिंड ( गोळे ) करुन " ऋतमग्रे प्रथमं जज्ञ ऋते सत्यं प्रतिष्ठितं ॥ यदियं कुमार्यभिजाता तदियमिह प्रतिपद्यतां यत्सत्यं तद्दृश्यतां " या मंत्रेंकरुन पिंडांचें अभिमंत्रण करुन , कन्येला सांगावें कीं , ‘ या आठ पिंडांतून एक पिंड तूं घे . ’ त्या

कन्येनें क्षेत्राच्या मातीचा पिंड घेतला तर तिची प्रजा अन्नवती ( अन्नसमृद्ध ) होईल असें समजावें . गोठ्यांतील मातीचा घेईल तर गाई , महिषी इत्यादि पशूंनीं समृद्ध होईल . अग्निहोत्राच्या भस्माचा घेईल तर वेदाध्ययनसंपन्न होईल . डोहाच्या मातीचा घेईल तर पूर्वोक्त सर्व संपन्न होईल . जुगार खेळण्याच्या भूमीच्या मातीचा घेईल तर कपटी होईल . चवाठ्यावरील मातीचा घेईल तर दोन्ही कुलांतून बाहेर ( व्यभिचारिणी ) होईल . ईरिणस्थानच्या ( गवत शेत न होणार्‍या स्थलाच्या ) मातीचा घेईल तर अभाग्या होईल . आणि स्मशानांतील मातीचा घेईल तर पतिघातकी होईल . मनु - " मातेच्या सपिंडांतील नसलेली व पित्याच्या गोत्रांतील नसलेली अशी जी कन्या ती द्विजातींना ( ब्राह्मण , क्षत्रिय , वैश्य , यांना ) दारकर्माविषयीं ( स्त्रीत्वप्रयुक्त श्रौतस्मार्तकर्माविषयीं ) आणि मैथुनाविषयीं प्रशस्त आहे . " या मनुवचनांत दोन चकार आहेत त्यावरुन दत्तकाच्या मातेच्या कुलांतील घेतली तर ती असपिंडा व सगोत्रा होते त्या कुलांतील कन्येचा निषेध करण्याकरितां पहिला चकार आहे . आणि दत्तकाला जनककुलांतील कन्या पित्याची असगोत्रा होते तिचा सपिंडत्वानें निषेध करण्याकरितां दुसरा चकार आहे . वरील दोन्ही वचनांत ‘ असपिंडा ’ असें पद आहे त्याचा अर्थ - समान म्हणजे एक आहे पिंड म्हणजे देह ( देहाचे अवयव ) जीचा ती सपिंडा होय . सपिंडा नव्हे ती असपिंडा होय . असपिंडा म्हणजे सापिंड्यरहित . तें सापिंड्य एक शरीराचे अवयव असल्यानें होतें तें असें - एक पिता किंवा एक माता यांच्या शरीराचे अवयव पुत्र कन्या इत्यादिकांचे ठायीं साक्षात् ‍ शुक्र - शोणित इत्यादिरुपानें अनुगत ( आलेले ) असतात . पौत्र - दौहित्र इत्यादिकांचे ठायीं परंपरासंबंधानें म्हणजे यांचे शुक्र - शोणितादि अवयव पुत्र - कन्यांचे ठायीं व पुत्र - कन्यांचे शुक्र - शोणितादि अवयव पौत्र - दौहित्र यांचे ठायीं असें परंपरेनें असतात . हें एकशरीरावयवरुप सापिंड्य जरी पतीसह पत्नीला येत नाहीं . म्हणजे पतीच्या शरीराचे शुक्र - शोणितादि अवयव भिन्न आणि पत्नीच्या शरीराचे शुक्र - शोणितादि अवयव भिन्न असल्यामुळें दोघांना ( पतिपत्नीला ) परस्पर सापिंड्य संभवत नाहीं . तसेंच अनेक भ्रात्यांच्या पत्नीला परस्पर सापिंड्य संभवत नाहीं . तथापि एक शरीराच्या शुक्रशोणितादि अवयवांना त्या स्त्रिया आधार असल्यामुळें आधारत्वेंकरुन सापिंड्य संबंध आहेच . " पित्याच्या अस्थींनीं पुत्राचे अस्थि उत्पन्न झाले " असें मंत्रांत सांगितलें आहे . यावरुन एका पितृशरीराचे अस्थ्यादि अवयव पुत्राच्या द्वारानें त्या भ्रातृपत्न्यादिकांचे ठायीं स्थापित आहेत , असें मदनरत्न - पारिजात - विज्ञानेश्वर इत्यादि ग्रंथकार सांगतात . वाचस्पति - शुद्धिविवेक - शूलपाणि - इत्यादि गौड - मैथिलादि ग्रंथकारही असेंच सांगतात . श्रुतींतही - " ह्या शरीरांत सहा कोश ( अंश ) आहेत . मातेचे तीन अंश व पित्याचे तीन अंश . अस्थि , स्नायू , मज्जा , हे तीन पित्याचे अंश . त्वचा , मांस , रुधिर , हे तीन मातेचे अंश होत . " असें सांगितलें आहे . " हे भगवंता ! प्रजेला अनुसरुन तूं उत्पन्न होतोस . " असेंही श्रुतींत आहे . ह्या वरील प्रमाणावरुन एकशरीरावयवरुप सापिंड्य सिद्ध होतें .

चंद्रिकापरार्कमेधातिथिमाधवादयस्तु एकपिंडदानक्रियान्वयित्वंसापिंड्यम् ‍ लेपभाजश्चतुर्थाव्द्याः पित्राद्याः पिंडभागिनः पिंडदः सप्तमस्तेषांसापिंड्यंसाप्तपौरुषमितिमात्स्योक्तेः । नचपितृव्यादिष्वेतम्नास्तीतिवाच्यम् ‍ तत्कर्तृकश्राद्धेदैवतैक्येनतत्सत्त्वात् ‍ देवदत्तकर्तृश्राद्धेहियेदेवताभूतास्तेषांमध्येयः कश्चिदन्यकर्तृकश्राद्धेऽनुप्रविशतितेषांसापिंड्यं तद्भार्याणामपिभर्तृकर्तृकश्राद्धेसहाधिकारित्वेनतदन्वयात् ‍ एकत्वंसागताभर्तुः पिंडेगोत्रेचसूतकेइतिस्मृतेश्च श्रुतीनांचवैराग्यार्थत्वात्तस्य सापिंड्यनिमित्तत्वेमानाभावात् ‍ नचमातुलादिष्वेतन्नास्तीतिवाच्यम् ‍ मातामहरुपदैवतैक्यात् ‍ ननुगुरुशिष्यादेरपिश्राद्धदेवतात्वात्सपिंडत्वंस्यात् ‍ किंबहुना सर्वाभावेतुनृपतिः कारयेत्तस्यरिक्थतइतिमार्कंडेयपुराणाद्राज्ञोपिश्राद्धकर्तृत्वात्सापिंड्यप्रसंगः सत्यम् ‍ पंचमात्सप्तमादूर्ध्वंमातृतः पितृतस्तथेतियाज्ञवल्क्यवचनेनमातापितृसंबंधएवतत्सत्त्वात् ‍ ऊर्ध्वंसापिंड्यंनिवर्ततइतिशेषः ननुपंचमत्वाद्यत्रनियम्यतेनमातृतइत्यादि वाक्यभेदात् ‍ मैवं मातृकुलेपंचमत्वस्यपितृकुलेसप्तमत्वस्यचबोधनेतुल्यत्वात् ‍ पौरुषेयत्वाददोषइतिचेततुल्यमन्यत्रापि अन्यकर्तृकेराज्ञस्तत्पितृणांवादेवतात्वाभावाच्च किंच अवयवान्वयपक्षेयथायोगरुढ्यापरिहारस्तथेहापि तेनमातृकुलेपितृकुलेचैकपिंडदानक्रियान्वयित्वंसापिंड्यमित्याहुः तेनैकस्यपित्रादयः षट् ‍ पुत्रादयश्चषट्‍सपिंडाभवंति ।

चंद्रिका - अपरार्क - मेधातिथि - माधव - इत्यादि ग्रंथकार तर - सापिंड्य म्हणजे एकपिंडदानक्रियान्वयित्व होय . समान म्हणजे एक आहे पिंड म्हणजे पिंडदानक्रियासंबंध ज्यास तो सपिंड . त्याचा धर्म सापिंड्य होय . हें सापिंड्य सात पुरुषांपर्यंत येतें तें असें - एकानें केलेल्या पिंडदानक्रियेमध्यें एक दाता , पित्रादि तिघे पिंडभागी , आणि वृद्धप्रपितामहादिक तिघे लेपभागी आहेत म्हणून त्या पिंडदानक्रियेचा संबंध सातांना आहे . कारण , " चवथ्यापासून ( वृद्धप्रपितामहापासून ) पुढचे तिघे लेपभागी व पित्रादिक तिघे पिंडभागी आहेत . आणि पिंड देणारा सातवा आहे , म्हणून सात पुरुषांपर्यंत सापिंड्य आहे . " असें मात्स्यवचन आहे . आतां हें एकपिंडदानक्रियान्वयित्वरुप सापिंड्य चुलता , चुलतबंधु इत्यादिकांचे ठायीं येत नाहीं , असें म्हणूं नये . कारण , चुलता इत्यादिकांनीं करावयाचे श्राद्धांत जी देवता ती देवता आपले पितामहादिक असल्यामुळें आपण केलेली जी पिंडदानक्रिया तिचा संबंध पितामहाला आहे , व चुलत्यानें केलेल्याचाही संबंध त्याला आहे , म्हणून एकपिंडदानक्रियासंबंधरुप सापिंड्य येतें . यावरुन असें होतें कीं , देवदत्तानें - ( अ ) मनुष्यानें - करावयाच्या श्राद्धांत जे पितर देवता झालेले आहेत त्यांपैकीं कोणी तरी ( क ) मनुष्यानें करावयाचे श्राद्धांत प्रविष्ट असेल तर त्या ( अ ) चें व ( क ) चें परस्पर सापिंड्य येतें . त्या श्राद्धकर्त्यांच्या पत्नींना देखील भर्त्यानें करावयाच्या श्राद्धांत सहाधिकार असल्यामुळें त्या सापिंड्याचा संबंध आहे . आणि " जीचा विवाह झाला ती स्त्री पिंडाविषयीं , गोत्राविषयीं , व सूतकाविषयीं भर्त्याशीं एकत्व पावली , म्हणजे भर्त्याचा पिंड , गोत्र , सूतक , तींच तिचीं झालीं . " या स्मृतीवरुनही स्त्रियांना तेंच सापिंड्य आहे . वर सांगितलेल्या ‘ ह्या शरीराचे सहा कोश आहेत इत्यादिक ’ श्रुति वैराग्य उत्पन्न करण्याकरितां असल्यामुळें ती श्रुती एकशरीरावयवरुप सापिंड्य मानण्याविषयीं प्रमाण आहे , असें म्हणतां येत नाहीं . आतां हें ( एकपिंडदानक्रियान्वयित्व ) सापिंड्य मातुल इत्यादिकांचे ठायीं येणार नाहीं , असें म्हणूं नये . कारण , आपण करावयाच्या श्राद्धांत मातामहरुप जी देवता तीच मातुलकर्तृक श्राद्धांत देवता असल्यामुळें वर सांगितलेल्या रीतीनें एकपिंडदानक्रियान्वयित्वरुप सापिंड्य मावळ्याचें व भाच्याचें येत आहे . शंका - गुरु , शिष्य , आप्त , हे देखील श्राद्धांत देवता असल्यामुळें त्यांचें ( गुरु , शिष्यादिकांचें ) सापिंड्य येईल . फार काय सांगावें कीं , " सर्व अधिकार्‍यांच्या अभावीं राजानें मृताची जिंदगी घेऊन श्राद्धादि क्रिया करावी . " ह्या मार्कंडेय पुराणावरुन राजा देखील श्राद्धकर्ता झाल्यामुळें त्याचेंही सापिंड्य प्राप्त होईल . शंका खरी आहे . समाधान - " मातेकडून पांचांपलीकडे आणि पित्याकडून सातांपलीकडे सापिंड्य निवृत्त होतें " ह्या याज्ञवल्क्यवचनावरुन मातेचा किंवा पित्याचा संबंध असतांच सापिंड्य आहे , अन्यथा नाहीं , असें होतें . अर्थात् ‍ गुरुशिष्यांदिकांना माता - पितृसंबंध नसल्यामुळें त्यांचें सापिंड्य नाहीं . शंका - ह्या याज्ञवल्क्यवचनांत पंचमत्वादिकांचा नियम करितों , म्हणजे मातेकडे पांचव्यानंतरच आणि पित्याकडे सातव्या नंतरच सापिंड्यनिवृत्ति , अर्थात् ‍ पूर्वीं सापिंड्यनिवृत्ति नाहीं , असें याज्ञवल्क्यवचनानें बोधन केलें आहे . माता - पितृसंबंध असतांच सापिंड्य आहे , अन्यथा नाहीं . असें बोधन केलें नाहीं . कारण , नियम न करितां वर लिहिल्याप्रमाणें यथाश्रुत अर्थ केला तर वाक्यभेद ( मातेकडून पांचांपलीकडे सापिंड्य निवृत्त होतें आणि पित्याकडून सातांपलीकडे सापिंड्य निवृत्त होतें - अशीं दोन वाक्यें रुप दोष ) होतो . असें म्हणूं नये . कारण , नियम केला असतांही मातृकुलांत पंचमत्व आणि पितृकुलांत सप्तमत्व यांचा बोध होण्याकरितां भिन्नवाक्यें होत असल्यामुळें वाक्यभेदरुप दोष नियमपक्षीं व यथाश्रुतपक्षींही समान आहे . हें याज्ञवल्क्यवचन पौरुषेय असल्यामुळें वाक्यभेद हा दोष नाहीं , असें नियमपक्षीं म्हटलें तर यथाश्रुतपक्षींही तो दोष नाहीं . तस्मात् ‍ यथाश्रुत अर्थावरुन माता - पितृसंबंध असतांच सापिंड्य आहे , अन्यथा नाहीं , असें झालें आहे . आणि राजाला श्राद्धाला अधिकार असल्यामुळें राजाला सापिंड्यप्रसंग येईल असें म्हटलें तो प्रसंग येत नाहीं . कारण , अन्यानें करावयाच्या श्राद्धांत राजा किंवा राजाचे पितर देवता होत नाहींत . आणखी असें आहे कीं , प्रथम सांगितलेलें एकशरीरावयवान्वयित्वरुप सापिंड्य मानलें तर शंभर पुरुष झाले तरी एकशरीरावयवांचा संबंध असल्यामुळें निवृत्त न झाल्याकारणानें जसा योगरुढीनें त्याचा परिहार केला पाहिजे आहे , तसा येथेंही योगरुढीनें गुरुशिष्यादिकांच्या सापिंड्याचा परिहार करावा . तेणेंकरुन मातृकुलांत व पितृकुलांत एकपिंडदानक्रियान्वयित्वरुप सापिंड्य आहे , असें सांगतात . तेणेंकरुन ( सात पुरुषांपर्यंत सापिंड्य सांगितल्यावरुन ) एकाचे पिता इत्यादिक सहा आणि पुत्र इत्यादिक सहा हे सपिंड होतात .

अत्रकेचिदुभयतः सापिंड्यनिवृत्तावेवोद्वाहोनान्यथेत्याहुः शुद्धिचिंतामणिवाचस्पतिहरदत्तादयस्तु सगोत्रत्ववत्सापिंड्यस्यसप्रतियोगिकत्वेनसंयोगवदुभयनिरुप्यत्वात् ‍ एकतोनिवृत्तावन्यतोनिवृत्तेरावश्यकत्वान्मूलपुरुषमारभ्याष्टमोवरोमूलपुरुषमारभ्यद्वितीयातृतीयादिकांकन्यामुद्वहेदित्याहुः शिष्टास्तु नवधूवरयोः स्वतः सापिंड्यं किंतु कूटस्थसंततित्वात्तत्सापिंड्येनैव अतोष्टमवरंप्रतिकन्यायाअसापिंड्येपिकन्यायाः कूटस्थेनसापिंड्यात्तत्संततित्वाद्वरस्तांप्रतिसपिंडएवेत्यविवाहः सापिंड्यासापिंड्ययोः प्रतियोगिभेदेनाविरोधादित्याहुः इदमेवचयुक्तं आशौचेप्येवंसापिंड्यंज्ञेयम् ‍ यत्रतुमध्येविच्छिन्नमपिसापिंड्यंमंडूकप्लुतिवत्पुनरनुवर्तते यथा कूटस्थात्पंचम्योः कन्ययोः पुत्रौतत्रनिवृत्तिः तदपत्ययोस्त्वनुवृत्तिस्तत्रापिनसापिंड्यासापिंड्ययोर्दोषः संबंधिभेदात् ‍ तेनतत्रनविवाहः ।

येथें कोणी पंडित - दोघांकडून ( वधूकडून व वराकडून ) सापिंड्यनिवृत्ति असतांच विवाह होतो , अन्यथा होत नाहीं , असें सांगतात . शुद्धिचिंतामणि - वाचस्पति - हरदत्त - इत्यादिक तर - जसें - सगोत्रत्व सप्रतियोगिक आहे तसें सापिंड्य सप्रतियोगिक आहे . म्हणजे ज्याचें सगोत्रत्व येतें त्याच्यावर त्याचें प्रतियोगित्व असतें . एकावर सगोत्रत्व आणि तत्प्रतियोगित्व हे दोन्ही धर्म येत असतात . जसें - देवदत्ताचें व यज्ञदत्ताचें गोत्र एक असतां देवदत्ताचें सगोत्रत्व यज्ञदत्तावर आणि यज्ञदत्ताचें देवदत्तावर आलें म्हणजे यज्ञदत्तावर देवदत्ताचें सगोत्रत्व आलें व यज्ञदत्ताचें सगोत्रत्व देवदत्तावर असल्यामुळें त्याचें प्रतियोगत्वही यज्ञदत्तावर आलें . तसेंच सापिंड्य सप्रतियोगिक असल्यामुळें संयोगरुप धर्म जसा दोषांवर राहतो , तसें सापिंड्य दोघांवर राहतें . दोन पदार्थांवर संयोग राहतो . याचा संयोग त्याच्यावर नाहीं तर त्याचा संयोग याच्यावर नाहीं . त्याप्रमाणें - देवदत्ताचा सपिंड यज्ञदत्त होईल तर यज्ञदत्ताचा सपिंड देवदत्त होईल . ह्याचा तो सपिंड नाहीं तर त्याचा हा सपिंड नाहीं . म्हणून एकीकडून ( वराकडून किंवा वधूकडून ) सापिंड्यनिवृत्ति असतां दुसरीकडून निवृत्ति अवश्य असल्यामुळें मूळपुरुषापासून आठव्या वरानें मूलपुरुषापासून दुसरी , तिसरी , इत्यादिक कन्या वरावी , असें सांगतात . शिष्ट तर - वधूवरांचें स्वतः सापिंड्य नाहीं तर - वधूवर हे कूटस्था ( मूलपुरुषा ) ची संतति असल्यामुळें कूटस्थ पुरुषाच्या सापिंड्यानेंच त्या वधूवरांना सापिंड्य आहे . म्हणून आठव्या वराला द्वितीया - तृतीयादि कन्येचें असापिंड्य असलें तरी कन्येला कूटस्थाशीं सापिंड्य असल्याकारणानें त्या कूटस्थाच्या संततींतील वर असल्यामुळें तो त्या कन्येला सपिंड होतच आहे , म्हणून त्यांचा विवाह होत नाहीं . सापिंड्याच्या प्रतियोगि भिन्न आणि असापिंड्याचा प्रतियोगि भिन्न असल्यामुळें विरोध नाहीं , असें सांगतात . हेंच मत युक्त आहे . आशौचाविषयींही असेंच सापिंड्य जाणावें . आतां ज्या ठिकाणीं मध्यें निवृत्त झालेलेंही सापिंड्य मंडूकाच्या ( बेडकाच्या ) उड्डाणाप्रमाणें पुनः अनुवृत्त होतें . जसें - मूलपुरुषापासून पांचव्या कन्येच्या पुत्राचें व दुसर्‍या पांचव्या कन्येच्या पुत्राचें सापिंड्य निवृत्त होतें . त्या पुत्रांच्या अपत्यांचें सापिंड्य अनुवृत्त होतें . म्हणजे पुत्रांच्या मातेकडून मूळ पुरुष पांचवा असल्यामुळें सापिंड्य निवृत्त होतें . आणि पुत्राच्या अपत्याचें म्हटलें तर पित्याकडून मूल पुरुष सहावा झाल्यामुळें सापिंड्य अनुवृत्त होतें , त्या ठिकाणीं देखील सापिंड्य व असापिंड्य यांचा दोष ( विरोध ) नाहीं . कारण , सापिंड्य व असापिंड्य यांचा संबंधि भिन्न ( कन्यापुत्र व पुत्रापत्य असा ) आहे . तेणेंकरुन त्या ठिकाणीं विवाह होत नाहीं .

अत्रकूटस्थमारभ्यगणनाकार्या तदुक्तं वध्वावरस्यवातातः कूटस्थाद्यदिसप्तमः पंचमीचेत्तयोर्मातातत्सापिंड्यंनिवर्ततइति कूटस्थोमूलपुरुषः विश्वरुपनिबंधे एवमुक्तप्रकारेणपितृबंधुषुसप्तमात् ‍ ऊर्ध्वमेवविवाह्यत्वंपंचमान् ‍ मातृबंधुतः संतानोभिद्यतेयस्मात् ‍ पूर्वजादुभयत्रच तमादायगणेद्धीमान् ‍ वरंयावच्चकन्यकाम् ‍ स्मृतितत्त्वेनारदः आसप्तमात् ‍ पंचमाच्चबंधुभ्यः पितृमातृतः अविवाह्यासगोत्राचसमानप्रवरातथा अत्रबंधुभ्यइतिपंचमीनिर्देशात् ‍ पितः पितृष्वसृपुत्रात्सप्तमीं मातुः पितृष्वसृपुत्राच्चपंचमीमपित्यजेत् ‍ एवमन्यबंधुषुज्ञेयम् ‍ तत्रापि त्रिगोत्रात्ययेर्वागपिविवाहंकुर्यात् ‍ वक्ष्यमाणवचनात् ‍ त्रिगोत्रगणनाचमातामहगोत्रापेक्षया नतुस्वापेक्षया अन्यथा पितुः पितामहदुहितुर्दौहित्रीपुत्रीपरिणेयास्याद्वध्वाः मातामहगोत्रापेक्षयातुत्रिगोत्रांतर्गतेनविवाहप्रसंगइतिसंबंधतत्त्वादयोगौडग्रंथाः संबंधविवेकेशूलपाणिरप्याह पंचमात्सप्तमाच्चार्वागपित्रिगोत्रांतरिताविवाह्या असंबद्धाभवेन्मातुः पिंडेनैवोदकेनवा साविवाह्याद्विजातीनांत्रिगोत्रांतरिताचयेतिबृहन्मनूक्तेः सन्निकर्षेपिकर्तव्यंत्रिगोत्रात् ‍ परतोयदीतिदेवलोक्तेश्चेति एतच्चदाक्षिणात्यानमन्यंते यत्तुवसिष्ठः पंचमींसप्तमींचैवमातृतः पितृतस्तथेति यच्चविष्णुपुराणम् ‍ पंचमींमातृपक्षाच्चपितृपक्षाच्चसप्तमीं गृहस्थउद्वहेत्कन्यांन्याय्येनविधिनानृपेतितत्पंचमींसप्तमीमतीत्येतिव्याख्येयम् ‍ पंचमेसप्तमेचैवयेषांवैवाहिकीक्रिया क्रियापराअपिहितेपतिताः शूद्रतांगताइत्यपरार्केमरीचिवचनात् ‍ हारलतायां शंखलिखितौ सपिंडतातुसर्वेषांगोत्रतः साप्तपौरुषी पिंडश्चोदकदानंचआशौचंचतदानुगं गोत्रंसंतानं आशौचंतानभिव्याप्यगच्छतीत्यर्थः ।

ह्या सापिंड्याविषयीं पिढ्यांची गणना करावयाची ती कूटस्थ ( मूलपुरुष ) धरुन गणना करावी . तें सांगतो - " वधूचा व वराचा पिता जर मूल पुरुषापासून सातवा होईल तर त्यांचें सापिंड्य निवृत्त होतें . आणि वधूवरांची माता जर मूलपुरुषापासून पांचवी होईल तर त्यांचें सापिंड्य निवृत्त होतें . " विश्वरुपनिबंधांत - " याप्रमाणें पूर्वोक्त प्रकारेंकरुन वधूवरांच्या पित्याकडून मोजून सप्तमाच्या पुढेंच ( अष्टमादिकालाच ) विवाहाला योग्यत्व येतें , आणि मातेकडून मोजून पंचमापुढेंच ( षष्ठालाच ) विवाहयोग्यत्व येतें . ज्या पूर्वजापासून संतति भिन्न होते त्याला घेऊन दोहींकडे वरापर्यंत आणि वधूपर्यंत पिढ्यांची गणना करावी . " स्मृतितत्त्वांत नारद - " पित्याकडून सप्तमापर्यंत आणि मातेकडून पंचमापर्यंत जी कन्या तिच्याशीं विवाह करुं नये . आणि सगोत्रा व सप्रवरा तिच्याशींही विवाह करुं नये " या वचनांत ‘ बंधुभ्यः ’ असा पंचमी विभक्तीचा निर्देश केल्यामुळें पित्याच्या आतेच्या पुत्रापासून सातवी आणि मातेच्या मातेच्या पुत्रापासून पांचवी ह्या देखील टाकाव्या . याप्रमाणें इतर बंधूंविषयीं जाणावें . त्यांतही असें आहे कीं , पुढें सांगावयाच्या बृहन्मनु - देवल वचनावरुन तीन गोत्रांच्या पलीकडची कन्या असेल तर पांचांच्या आंतल्याही कन्येशीं विवाह करावा . त्रिगोत्रगणना करावयाची ती वराचें मातामहगोत्र धरुन करावी . वराचें गोत्र धरुन करुं नये . कारण , वराचें गोत्र धरुन केली तर वराला पित्याच्या पितामहकन्येच्या दौहित्रीच्या कन्येशीं विवाह प्राप्त होईल . तो अनिष्ट आहे . आणि वधूच्या मातामहाचें गोत्र धरुन गणना केली तर तीन गोत्रांच्या आंत विवाहप्रसंग येईल . असें संबंधतत्त्व इत्यादि गौडग्रंथ सांगतात . संबंधविवेकांत शूलपाणिही सांगतो - मातेकडून पंचम व पित्याकडून सप्तम यांच्या आंतली असली तरी तीन गोत्रांतून पलीकडची असली तर विवाह करावा . कारण , " जी कन्या मातृकुलांत पिंडानें किंवा उदकक्रियेनें संबद्ध नसेल तिच्याशीं द्विजांनीं विवाह करावा . आणि पिंडादिसंबद्ध असली तरी जी त्रिगोत्रान्तरित असेल तिच्याशीं विवाह करावा . " असें बृहन्मनुवचन आहे . आणि " जर तीन गोत्रांच्या पलीकडची असेल तर जवळची असली तरी विवाह करावा " असें देवलवचनही आहे . हें मत दाक्षिणात्य मानीत नाहींत . आतां जें वसिष्ठ - " मातेकडून पांचवी आणि पित्याकडून सातवी कन्या वरावी . " आणि जें विष्णुपुराण - " मातृपक्षाकडून पांचवी आणि पितृपक्षाकडून सातवी कन्या गृहस्थानें योग्य विधीनें वरावी " असें आहे तेथें पांचवी व सातवी टाकून वरावी असें व्याख्यान करावें . कारण , " पांचव्या आणि सातव्या पुरुषांत ज्यांचा विवाह होतो , ते मनुष्य श्रुतिस्मृतिकर्मै करणारे असले तरी पतित होऊन शूद्रत्वाला पावतात " असें अपरार्कांत मरीचिवचन आहे . हारलतेंत शंख लिखित - " सर्वांचें सापिंड्य संततीनें सात पुरुषांपर्यंत आहे . पिंड व उदकदान हें सात पुरुषांपर्यंत प्राप्त होतें . आशौच हें संततीला सात पुरुषांपर्यंत व्यापून राहतें . "

शुद्धिविवेके शुद्धिचिंतामणौचब्राह्मे सर्वेषामेववर्णानांविज्ञेयासाप्तपौरुषी सपिंडताततः पश्चात्समानोदकधर्मता ततः कालवशात्तत्रविस्मृतौनामगोत्रतः समानोदकसंज्ञातुतावन्मात्रापिनश्यति सप्तोर्ध्वंत्रयः सोदकास्ततोगोत्रजाः तत्रैवब्राह्मे अविभक्तधनास्त्वेतेसपिंडाः परिकीर्तिताः तेनाविभक्तधनाभावेविभक्तः सपिंडोधनहारी नान्यथेत्यर्थः तेनविवाहेआशौचेधनग्रहणेचत्रिधासापिंड्यंसिद्धं यत्तु पंचमींमातृतः परिहरेत्सप्तमींपितृतस्त्रीन्मातृतः पंचपितृतोवेतिपैठीनसिस्मृतौ त्रीनित्यनुकल्पइतिमाधवोक्तेः पंचमींसप्तमींचैवमातृतः पितृतस्तथा दशभिः पुरुषैः ख्याताच्छ्रोत्रियाणांमहाकुलात् ‍ उद्वहेत्सप्तमादूर्ध्वंतदभावेतुसप्तमीम् ‍ पंचमींतदभावेतुपितृपक्षेप्ययंविधिः सप्तमींचतथाषष्ठींपंचमींचतथैवच एवमुद्वाहयेत्कन्यांनदोषः शाकटायनः तृतीयांवाचतुर्थींवापक्षयोरुभयोरपि विवाहयेन्मनुः प्राहपाराशर्योंगिरायमः यस्तुदेशानुरुपेणकुलमार्गेणचोद्वहेत् ‍ नित्यंसव्यवहार्यः स्याद्वेदाच्चैतत्प्रदृश्यतइतिचतुर्विंशतिमतात् ‍ चतुर्थीमुद्वहेत्कन्यांचतुर्थः पंचमोपिवा पराशरमतेषष्ठींपंचमोनतुपंचमीमितिपराशरोक्तेश्चानुकल्पत्वेनापदिपंचम्यादिपरिणयनंकार्यमितिप्रतीयते अत्रहितदभावेइतिस्पष्टमेवानुकल्पत्वमुक्तम् ‍ तन्नयथाश्रुतंज्ञेयम् ‍ पूर्वोक्तमरीचिवचोविरोधात् ‍ वस्तुनिविकल्पासंभवात् ‍ पंचमात्सप्तमाद्धीनांयः कन्यामुद्वहेद्दिजः गुरुतल्पीसविज्ञेयः सगोत्रांचैवमुद्वहन्नितिविष्णूक्तेः पराशरस्यमूलाभावाच्च तस्मान्मदनपारिजाताद्युक्तदिशादत्तकसापत्नसंबंधाद्यनुप्रवेशेब्राह्मणादीनांक्षत्रियादिसपिंडविषयेवापूर्वोक्तानिनेयानि नत्वनुकल्पइतिभ्रमितव्यं ।

शुद्धिविवेकांत व शुद्धिचिंतामणींत ब्राह्मांत - " सार्‍या वर्णांना सापिंड्य सात पुरुषांपर्यंत जाणावें . सातांपुढें समानोदकत्व जाणावें . तदनंतर कांहीं कालानें नांवांची व गोत्रांची विस्मृति झाली असतां तेथपर्यंत असलेलें समानोदकत्वही नष्ट होतें . " म्हणजे सातांपुढें तीन पुरुषांपर्यंत समानोदक होतात . पुढें गोत्रज समजावे . " तेथेंच ब्राह्मांत - " हे सपिंड अविभक्तधन म्हटले आहेत . म्हणजे सपिंडांच्या धनाचा विभाग झाला तरी ते विभक्त समजूं नयेत " यावरुन मृताचे जिंदगीचा वारस अविभक्त नसेल तर विभक्त झालेला सपिंड वारस होतो . सपिंडावांचून दुसरा होत नाहीं , असा भाव . तेणेंकरुन विवाहाविषयीं , आशौचाविषयीं आणि धनग्रहणाविषयीं असें तीन प्रकारचें सापिंड्य सिद्ध झालें . आतां जें " मातेकडून पांचवी वर्ज्य करावी आणि पित्याकडून सातवी वर्ज्य करावी , अथवा मातेकडून तीन आणि पित्याकडून पांच पुरुष वर्ज्य करावे " ह्या पैठीनसिस्मृतींत तीन पुरुष वर्ज्य करावे , हा अनुकल्प आहे , अशा माधवाच्या सांगण्यावरुन ; " मातेकडून पांचवी आणि पित्याकडून सातवी वरावी . दहा पुरुषांनीं प्रख्यात असलेल्या श्रोत्रियांच्या मोठ्या अशा कुलांतून सातव्या पुरुषांपलीकडची कन्या वरावी . तिच्या अभावीं सातवी वरावी . तिच्या अभावीं पांचवी वरावी . पितृपक्षीं देखील हाच विधि समजावा . सातवी , सहावी व पांचवी कन्या वरावी , याविषयीं दोष नाहीं , असें शाकटायन ऋषि सांगतो . दोन्ही पक्षीं ( मातृपक्षीं व पितृपक्षीं ) तिसरी किंवा चवथी कन्या वरावी , असें मनु , व्यास , यम , अंगिरा हे सांगतात . जो मनुष्य देशाच्या अनुरोधानें व कुलपरंपरागत चालीप्रमाणें विवाह करील त्या मनुष्याशीं व्यवहार सतत करावा . वेदावरुनही असा आचार दिसत आहे . " ह्या चतुर्विंशतिमतावरुन ; आणि ‘‘ चतुर्थ किंवा पंचम वरानें चवथी कन्या वरावी . पराशरमतीं सहावी वरावी . पंचमानें पांचवी वरुं नये " ह्या पराशरवचनावरुनही अनुकल्प म्हणून समजून आपत्कालीं पांचवी इत्यादिं कन्येशीं विवाह करावा , असें समजतें . ह्या वरील चतुर्विंशतिमतांत सातव्या पलीकडच्या अभावीं सातवी , तिच्या अभावीं पांचवी , असें सांगितल्यावरुन स्पष्टपणानेंच हा अनुकल्प असें सांगितल्यासारखें होत आहे . तें तसेंच समजूं नये . कारण , वर सांगितलेल्या ‘ पंचमे सप्तमे चैव० ’ ह्या मरीचिवचनाशीं विरोध येतो . वस्तूविषयीं विकल्प संभवत नाहीं . आणि " मातेकडून पांचव्या व पित्याकडून सातव्या पुरुषांतील कन्या जो ब्राह्मण वरील तो , आणि सगोत्रा वरील तो , गुरुपत्निगामी समजावा " असें विष्णुवचनही आहे . आणि वर सांगितलेल्या ‘ चतुर्थीमुद्वहेत्कन्यां० ’ ह्या पराशरवचनास मूलही नाहीं . तस्मात् ‍ मदनपारिजातादिकांनीं सांगितलेल्या रीतीनें दत्तकसंबंध - सापत्नसंबंध वगैरे असतां किंवा ब्राह्मणादिकांना क्षत्रियादिकांचा सापिंड्यसंबंध असतां त्याविषयीं वर सांगितलेलीं वचनें समजावीं . हा पंचम्यादि कन्याविवाह अनुकल्प आहे , अशा भ्रमांत पडूं नये . अर्थात् ‍ पंचम्यादि कन्याविवाह अनुकल्प देखील नाहीं .

यत्तुस्मृतिचन्द्रिकामाधवादयआहुः तृतीयेसंगच्छावहैचतुर्थेसंगच्छावहाइतिशतपथश्रुतेः तृप्तांजहुर्मातुलस्येवयोषाभागस्तेपैतृष्वसेयीवपामिवेति गर्भेनुनौजनितादंपतीकरितिचमंत्रवर्णात् ‍ मातृष्वसृसुतांकेचित्पितृष्वसृसुतांतथा विवहंतिक्कचिद्देशेसंकोच्यापिसपिंडतामितिशातातपोक्तेश्चमातुलकन्योद्वाहः कार्यः । यद्यपिपितृष्वसृकन्योद्वाहोपिप्राप्तस्तथाप्यस्वर्ग्यंलोकविद्विष्टंधर्म्यमप्याचरेन्नत्वितिनिषेधाद्वचनांतरेणतदुद्वाहस्याविधानाच्चनकार्यः अयंतुदाक्षिणात्यशिष्टाचारात् ‍ कार्यइति नचपूर्वोक्तश्रुतीनामर्थवादमात्रता मानांतरेणासिद्धौ उपरिहिदेवेभ्योधारयतीतिवदनुवादानुपपत्त्याविधिकल्पनात् ‍ यत्तुशातातपः मातुलस्यसुतामूढ्वामातृगोत्रांतथैवच समानप्रवरांचैवत्यक्त्वाचांद्रायणंचरेत् ‍ यच्चमनुः पैतृष्वसेयीभगिनींस्वस्त्रीयांमातुरेवच मातुश्चभ्रातुराप्तस्यगत्वाचांद्रायणंचरेत् ‍ एतास्तिस्त्रस्तुभार्यार्थेनोपयच्छेतबुद्धिमान् ‍ यच्चव्यासः मातुः सपिंडायत्नेनवर्जनीयाद्विजातिभिरिति तद्गांधर्वादिविवाहोढमातृविषयम् ‍ तत्रपितृगोत्रानिवृत्तेः अतएवमार्कंडेयपुराणं गांधर्वादिविवाहेषुपितृगोत्रेणधर्मविदिति ब्राह्मादिविवाहेतुपरिणेयैवेति भट्टसोमेश्वरोपि तृतीयेध्याये वाक्यपादेमातुलकन्योद्वाहमुदाह्रत्यस्मृतिविरोधेनाचारप्राप्तस्यास्यवार्तिकेबाधोक्तावपिपूर्वोक्तश्रौतलिंगबलीयस्त्वादस्यकर्तव्यतामाह तदेतद्दत्तकस्यपालकदत्रिममातृसोदरकन्याविषयत्वेनासवर्णमातुलकन्याविषयत्वेनयुगांतरपरत्वेनचोपपन्नमपिअविचारितरमणीयंयथातथास्तु तथापिकलौतावन्निषिद्धमेव गोत्रान्मातुः सपिंडाच्चविवाहोगोवधस्तथेत्यादिपुराणात् ‍ माधवीये बौधायनोप्यस्यनिंदामाह पंचधाविप्रतिपत्तिर्दक्षिणतस्तथोत्तरतऊर्णाविक्रयोनुपेतेनस्त्रियाचसहभोजनंपर्युषितभोजनंमातुलपितृष्वसृदुहितृपरिणयनमिति अथोत्तरतस्सीधुपानादिकमुक्त्वाइतरइतरस्मिन् ‍ कुर्वन् ‍ दुष्यतिइतरइतरस्मिन्निति भट्टसोमेश्वरेणापिस्मृतिविरुद्धानांमातुलकन्योद्वाहादीनामस्माद्वचनादप्रामाण्यमित्युक्तम् ‍ बृहस्पतिरपि उदूह्यतेदाक्षिणात्यैर्मातुलस्यसुताद्विजैः मत्स्यादाश्चनराः पूर्वेव्यभिचाररताः स्त्रियः उत्तरेमद्यपाश्चैवस्पृश्यानृणांरजस्वलाइत्यनाचारत्वमाह अतएवहेमाद्रौमात्स्ये कर्नाटकादीनांतत्कारिणांश्राद्धेनिषेधः बोपदेवेनापिलिखितंब्राह्मम् ‍ यत्रमातुलजोद्वाहीयत्रवैवृषलीपतिः श्राद्धंनगच्छेत्तद्विप्राः कृतंयच्चनिरामिषमिति तस्मान्मातृतः पंच पितृतः सप्तत्यक्त्वोद्वहेदितिसिद्धम् ‍ ।

आतां जें स्मृतिचंद्रिका माधव - " इत्यादिक सांगतात कीं , तिसर्‍या पिढींत आम्हीं उभयतां ( वधूवर ) संगत होतों . चवथ्या पिढींत आम्हीं उभयतां संगत होतों " ह्या शतपथश्रुतीवरुन ; आणि " मातुलाची कन्या आत्याच्या पुत्राचा जसा भाग आहे , तसा हे इंद्रा ! ही पशूची वपा तुझा भाग आहे , तो तूं ग्रहण कर " ह्या मंत्रार्थावरुन ; आणि " गर्भे नु नौ जनिता दंपतीकः० " अर्थ - " यमी यमास म्हणते - सर्वांचें शुभाशुभप्रेरक असा सर्वात्मक देव गर्भावस्थेचेठायींच आम्हांला दंपती करिता झाला . म्हणजे एका उदरांत दोघांचा सहवास झाल्यामुळें दंपती झालों . ह्या प्रजापतीचीं कर्मैं कोणीही लोपवीत नाहींत , या कारणास्तव गर्भावस्थेचे ठायींच प्रजापतीनें दांपत्य केलें असतां संभोग कर ! आणखी - आमचें हें मातेच्या उदरांत सहवासपणानें झालेलें दंपतित्व पृथिवी जाणते . आणि द्युलोकही जाणतो . " ह्या मंत्रार्थावरुन ; आणि " माता आहे स्वसा म्हणजे भगिनी ज्याची तो ( अर्थात् ‍ मातुल ) त्याची कन्या आणि आत्याची कन्या यांच्याशीं क्कचित् ‍ देशांत कोणी सापिंड्याचा संकोच करुन विवाह करितात " ह्या शातातपवचनावरुन मातुलकन्येशीं विवाह करावा . आतां जरी ह्या वचनावरुन आत्याच्या कन्येशीं देखील विवाह प्राप्त झाला , तथापि " जें कर्म अस्वर्ग्य ( स्वर्गप्रतिबंधक ) व ज्या कर्माचा लोक द्वेष करितात , तें कर्म धर्माला हितकारक असें समजलें तरी आचरण करुं नये . " असा निषेध असल्यावरुन ; व इतर वचनानें आत्याच्या कन्येशीं विवाह सांगितला नसल्याकारणानेंही तो करुं नये . हा मातुलकन्योद्वाह दाक्षिणात्य लोकांच्या आचारावरुन करावा . आतां पूर्वीं सांगितलेल्या मातुलकन्याविवाहबोधक श्रुति अर्थवादमात्र ( स्तुतिमात्रबोधक ) आहेत . मातुलकन्याविवाहविधायक नाहींत , असें म्हणूं नये ; कारण , दुसर्‍य़ा प्रमाणानें सिद्ध न झालेल्या अर्थाविषयीं अनुवाद ( अर्थवाद ) अनुपपन्न ( असंगत ) असल्यामुळें ‘ उपरि हि देवेभ्यो धारयति ’ या श्रुतिवाक्याप्रमाणें वरील श्रुतींचे ठायीं " मातुलकन्योद्वाहः कार्यः " असा विधि कल्पित होतो . आतां जें शातातप - " मातुलाची कन्या , तशीच मातेच्या गोत्रांतील कन्या , आणि सप्रवरकन्या , ह्यांच्याशीं विवाह केला असतां त्यांचा त्याग करुन चांद्रायण प्रायश्चित्त करावें , " आणि जें मनु - " आत्याची कन्या , मावशीची कन्या , मातुलाची कन्या यांच्या ठिकाणीं गमन केलें असतां चांद्रायण प्रायश्चित्त करावें . ह्या तीन भगिनी आहेत , शाहाण्या मनुष्यानें ह्या तिघांचा भार्येकरितां स्वीकार करुं नये , " आणि जें व्यास - " ब्राह्मणादिकांनीं मातेच्या सपिंडांतील कन्या प्रयत्नानें वर्ज्य करावी " असें सांगतात , तीं वचनें गांधर्वादिक विवाहविधीनें विवाह केलेल्या मातृविषयक आहेत . कारण , गांधर्वादि विवाहानें विवाहित स्त्रियांचे ठायीं

पित्याच्या गोत्राची निवृत्ति होत नाहीं . म्हणूनच मार्केडेयपुराण - " गांधर्वादि विवाहांचे ठायीं पितृगोत्रानें धर्मवेत्त्यानें व्यवहार करावा . " ब्राह्म , दैव इत्यादि विवाह झालेल्या मातृगोत्रांतील वरावीच . भट्टसोमेश्वरही तिसर्‍या अध्यायांत वाक्यपादांत मातुलकन्याविवाहाचें उदाहरण देऊन स्मृतीला विरुद्ध असून आचारानें प्राप्त झालेल्या ह्या मातुलकन्याविवाहाचा वार्तिकांत निषेध सांगितला तरी पूर्वीं सांगितलेल्या व स्मृतीपेक्षां बलिष्ठ अशा श्रुत्यर्थावरुन हा मातुलकन्याविवाह करावा , असें सांगतों . तें हें मत दत्तकाची पालक जी माता तिच्या सहोदर भ्रात्याच्या कन्याविषयक , किंवा असवर्ण मातुलकन्याविषयक अथवा इतर युगविषयक म्हणून उपपन्न असलें तरी अविचारानें जसें तसें रमणीय असो . तरी पण कलियुगांत तर निषिद्ध आहे . कारण , " मातेच्या गोत्रांतील व सपिंडांतील कन्येशीं विवाह , आणि मधुपर्कांत गोवध हे कलियुगांत करुं नयेत " असें आदिपुराणवचन आहे . माधवीयांत बौधायनही ह्याची निंदा सांगतो - " पांच प्रकारचा अनाचार दक्षिणेकडे आहे . तसाच उत्तरेकडेही आहे . दक्षिणेकडे अनाचार असा - ऊर्णावस्त्राचा विक्रय , अनुपनीतमुलासह व स्त्रीसह भोजन , शिळ्या अन्नाचें भोजन , मातुलकन्येशीं विवाह , आणि आतेच्या कन्येशीं विवाह . आतां उत्तरेकडे आसवपान " इत्यादिक सांगून पुढें सांगतो - " इतर ( दक्षिणेकडचा ) मनुष्य उत्तर देशांत तसें करील तर तो दोषी होईल . आणि उत्तरेकडचा मनुष्य दक्षिण देशांत तसें करील तर तो दोषी होईल . " भट्ट सोमेश्वरानें देखील - स्मृतिविरुद्ध अशा मातुलकन्याविवाहादिकांना ह्या ( बौधायन ) वचनावरुन अप्रामाण्य , असें सांगितलें आहे . बृहस्पतिही - " दाक्षिणात्य ब्राह्मण मातुलकन्येशीं विवाह करितात . पूर्व देशांत मनुष्य मासे खातात , आणि स्त्रिया व्यभिचार करितात . उत्तर देशांत मद्यपान करितात , आणि पुरुषाला रजस्वला स्पर्श करितात " असा हा अनाचार आहे असें सांगतो . हा मातुलकन्याविवाह अनाचार आहे , म्हणूनच हेमाद्रींत मात्स्यांत मातुलकन्योद्वाह करणार्‍या कर्नाटकादि ब्राह्मणांचा श्राद्धांत निषेध केला आहे . बोपदेवानेंही ब्रह्मपुराणांतील वचन लिहिलें आहे , तें असें - " ज्या ठिकाणीं मातुलकन्याविवाह केलेला ब्राह्मण असेल , व जेथें वृषली ( शूद्रा ) पति ब्राह्मण असेल त्या श्राद्धांत भोजनाला जाऊं नये . आणि जें आमिषरहित श्राद्ध तेथें भोजनास जाऊं नये . " तस्मात् ‍ मातेकडून पांच आणि पित्याकडून सात पुरुष टाकून विवाह करावा , असें सिद्ध झालें .

संबंधविवेके सुमंतुः ब्राह्मणानामेकपिंडस्वधानामादशमाद्धर्मविच्छित्तिर्भवति आसप्तमाद्रिक्थविच्छित्तिर्भवति आतृतीयात्पिंडविच्छित्तिरन्यथा पिंडशौचक्रियाविच्छेदाद्ब्रह्महतुल्योभवति अस्यार्थमाह शूलपाणिः जीवत्पित्रादित्रिकस्यवृद्धप्रपितामहादयस्त्रयः श्राद्धदेवतात्वात्पिंडभाजोभवंति तदूर्ध्वंत्रयोनवपुरुषपर्यंतालेपभाजः श्राद्धकर्ताचदशमइतिदशमादूर्ध्वंसापिंड्यनिवृत्तिः दशमादित्युपलक्षणं तेनपितृपितामहजीवनेनवपुरुषपर्यंतंपितृजीवनेचाष्टपुरुषपर्यंतंसापिंड्यमितिज्ञेयम् ‍ अपुत्रधनग्रहणेसन्निहिताभावेसप्तपुरुषपर्यंतमधिकारः धनग्राहिणमारभ्यतृतीयः पौत्रः तदूर्ध्वंश्राद्धविच्छेदः अन्यथाधनहारित्वेऽपुत्रश्राद्धाद्यकरणेब्रह्महेत्यर्थः आतृतीयादित्यनूढकन्याविषयं अप्रत्तानांतुस्त्रीणांत्रिपुरुषीविज्ञायतइतिवसिष्ठोक्तेः एतच्चाशौचविषयंसापिंड्यं नतुविवाहादौ तत्रपूर्वोक्तवचनैः पंचमत्वसप्तमत्वनियमादितिमेधातिथिप्रमुखादाक्षिणात्याः वाग्दानोत्तरमेतदितिशुद्धिविवेकः मातृकुलविषयंकानीनकन्यकाविषयंचैतत् ‍ अन्यथा अप्रत्तानांतथास्त्रीणांसापिंड्यंसाप्तपौरुषं प्रत्तानांभर्तृसापिंड्यंप्राहदेवः प्रजापतिरितिकौर्मेणविरोधः स्यादिति रत्नाकरस्मृतितत्त्वादिगौडग्रंथाः युक्तंचैतत् ‍ अन्यथाकन्योत्पत्तौपुरुषत्रयपर्यंतमेवसूतकंस्यान्नोर्ध्वम् ‍ ।

संबंधविवेकांत सुमंतु - " एक आहे पिंडदान व श्राद्धक्रिया ज्यांस अशा ब्राह्मणांचे दहाव्या पुरुषापलीकडे धर्मविच्छेद ( पिंडादि निवृत्ति ) होतो . सातव्या पुरुषापलीकडे जिंदगीवरचा वारसा नष्ट होतो . तिसर्‍या पुरुषापलीकडे पिंडविच्छेद होतो . अन्यथा पिंड , शौच , क्रिया यांचा विच्छेद केल्यानें ब्रह्मघातकीतुल्य होतो " ह्या सुमंतुवचनाचा अर्थं सांगतो शूलपाणि - " ज्या पुरुषाचे पिता , पितामह , प्रपितामह , हे तिघे जीवंत आहेत त्याला , वृद्धप्रपितामहादिक तिघे श्राद्धदेवता असल्यामुळें ते वृद्धप्रपितामहादिक तिघे पिंडभागी होतात . त्यांच्या पूर्वींचे तिघे नव पुरुषपर्यंत लेपभागी होतात . आणि श्राद्धकर्ता दहावा . त्याच्यापुढें सापिंड्यनिवृत्ति होते . दहाव्या पुरुषापलीकडे हें उपलक्षण आहे . तेणेंकरुन ज्याचे पिता व पितामह दोघे जीवंत आहेत त्याचें नऊ पुरुषांपर्यंत सापिंड्य . पिता जीवंत असेल त्याचें आठ पुरुषांपर्यंत सापिंड्य असें जाणावें . निपुत्रकाच्या धनग्रहणाविषयीं जवळचा वारस नसेल तर सात पुरुषांपर्यंत अधिकार आहे . निपुत्रकाची जिंदगी ग्रहण करणारा धरुन त्यापासून तिसरा म्हणजे त्याचा पौत्र तेथपर्यंत निपुत्रकाचें श्राद्ध करावें . त्या पौत्राच्यापुढें म्हणजे चवथ्यास त्या निपुत्रकाचें श्राद्ध करावयास नको . अन्यथा म्हणजे धनग्रहण करुन त्या निपुत्रकाचें श्राद्ध न करील तर तो ब्रह्मघातकी होतो , असा इत्यर्थ समजावा . ह्या सुमंतवचनांत ‘ आतृतीयात् ‍ ’ म्हणजे तृतीय पुरुषापलीकडे सापिंड्य नाहीं , असें सांगितलें तें अविवाहितकन्याविषयक समजावें . कारण , " अविवाहित स्त्रियांना त्रिपुरुषसापिंड्य जाणावें " असें वसिष्ठवचन आहे . हें त्रिपुरुषसापिंड्य आशौचाविषयीं समजावें . विवाहादिकांविषयीं समजूं नये . कारण , विवाहादिकांविषयीं पूर्वीं सांगितलेल्या वचनांनीं मातेकडून पंचमत्व व पित्याकडून सप्तमत्व यांचा नियम केला आहे , असें मेधातिथिप्रमुख दाक्षिणात्य ( दक्षिणेकडील पंडित ) सांगतात . हें त्रिपुरुषसापिंड्य वाग्दानोत्तर कन्याविषयक समजावें , असें शुद्धिविवेक सांगतो . हें त्रिपुरुषसापिंड्य मातृकुलाविषयीं व अविवाहित स्त्रियेचे कन्येविषयीं समजावें . असें न समजतां अविवाहित कन्याविषयक समजलें तर " दान न केलेल्या स्त्रियांना सात पुरुषांपर्यंत सापिंड्य . आणि दान केलेल्या स्त्रियांना भर्त्याचें सापिंड्य आहे , असें देव प्रजापति सांगतो . " ह्या कूर्मपुराणवचनाशीं विरोध येईल , असें रत्नाकर - स्मृतितत्त्व इत्यादि गौड ग्रंथकार सांगतात . हें मत युक्त आहे . अन्यथा ( अविवाहित कन्यांना त्रिपुरुषसापिंड्य मानलें तर ) कन्या उत्पन्न झाली असतां तीन पुरुषांपर्यंतच जननाशौच होईल . तीन पुरुषांपुढें ( सात पुरुषांपर्यंत ) होणार नाहीं .

सापत्नमातामहकुलेत्वाह मिताक्षरायां शंखः यद्येकजाताबहवः पृथक् ‍ क्षेत्राः पृथक् ‍ जनाः एकपिंडाः

पृथक् ‍ शौचाः पिंडस्त्वावर्ततेत्रिषु पृथक् ‍ क्षेत्राः भिन्नजातीयस्त्रीषुजाताः पृथक्जनाः सजातीयभिन्नमातृषुजाताः अत्रत्रिपुरुषंसापिंड्यमितिविज्ञानेश्वरोव्याचख्यौ पृथ्वीचंद्रोदये सापिंड्यदीपिकायांचैवम् ‍ मदनपारिजातेतु पृथक् ‍ क्षेत्रजाः भिन्नमातृजाः पृथग्जनाः भिन्नजातीयाः एतद्विजातीयसापत्नमातृकुलविषयम् ‍ सवर्णसापत्नमातृकुलेचतुः पुरुषंसापिंड्यं पंचमींसप्तमींचैवमातृतः पितृतस्तथेति वसिष्ठोक्तेः सप्तमीमिति ब्राह्मणादीनांक्षत्रियादिदारोत्पन्नपितृकुलविषयंचेत्युक्तं तत्स्वकपोलकल्पितत्वाद्ग्रंथांतरविरोधाच्चनिर्मूलम् ‍ पितृपत्न्यः सर्वामातरइत्युक्त्वासुमंतुनातदपत्यानिभागिनेयानीतिपृथडनिषेधाच्च अन्यथासपिंडत्वेननिषेधात् ‍ सापत्नमातुलत्वादिनिर्देशोव्यर्थः अतएवतेनस्मृतिकौमुद्यांसवर्णसापत्नमातामहकुलपरत्वेनतथैवशंखवचनंव्याख्यातम् ‍ तेनवासिष्ठंपंचमींसप्तमीमतीत्येतिव्याख्येयम् ‍ तस्मात्प्राच्येवव्याख्यायुक्ता प्रयोगरत्नेभट्टैः स्मृतितत्त्वादिगौडग्रंथेषुचसापत्नमातामहकुलेयावदुक्तंवाचनिकमेवसापिंड्यमुक्तम् ‍ यथाहसुमंतुः मातृपितृसंबद्धाआसप्तमादविवाह्याभवंति आपंचमादन्येषां पितृपत्न्यः सर्वामातरस्तद्भ्रातरोमातुलास्तद्भगिन्योमातृष्वसारस्तद्दुहितरश्चभगिन्यस्तदपत्यानिभागिनेयानि अन्यथासंकरकारिणः स्युस्तथाध्यापयितुरेतदेवेति आपंचमादितिमातृकुलेत्रिगोत्रांतरितविषयंवेतिप्राच्याः मात्स्ये समानप्रवराचैवशिष्यसंततिरेवच ब्रह्मदातुर्गुरोश्चैवसंततिः प्रतिषिध्यते तद्भगिन्योमातृष्वसारइतितुआकरेनपठितम् ‍ क्कचिद्वचनादविवाहः यथागृह्यपरिशिष्टे अविरुद्धसंबंधामुपयच्छेतेत्युक्त्वाविरुद्धसंबंधः स्वयमेवोक्तः यथाभार्यास्वसुर्दुहितापितृव्यपत्नीस्वसाचेति बौधायनः मातुः सपत्न्याभगिनींतत्सुतांचविवर्जयेत् ‍ पितृव्यपत्न्याभगिनींतत्सुतांचविवर्जयेत् ‍ अतोमातृष्वसुः सापत्नपुत्रकन्याप्यविवाह्या सापत्नमातृकुलजातमितिमदनपारिजातोक्तेरितिकेचित् ‍ ।

सापत्नमातामहाच्या कुलांत तर सांगतो मिताक्षरेंत शंख - " यद्येकजाता बहवः पृथक् ‍ क्षेत्राः पृथग्जनाः ॥ एकपिंडाः पृथक् ‍ शौचाः पिंडस्त्वावर्तते त्रिषु " याचा अर्थ - एका ब्राह्मणादिकापासून बहुत उत्पन्न झाले ते असे - ‘ पृथक् ‍ क्षेत्र ’ म्हणजे भिन्न जातींच्या स्त्रियांचे ठायीं उत्पन्न झाले , आणि ‘ पृथग् ‍ जन ’ म्हणजे समानजातीच्या भिन्न भिन्न स्त्रियांचे ठायीं झाले ते सारे सपिंड होतात . पण त्यांचें आशौच वेगवेगळें आहे , तें आशौचप्रकरणीं पाहावें . आणि त्यांचें सापिंड्य त्रिपुरुषपर्यंतच आहे . अशी विज्ञानेश्वरानें व्याख्या केली आहे . पृथ्वीचंद्रोदयांत सापिंड्यदीपिकेंतही असेंच आहे . मदनपारिजातांत तर - ‘ पृथक् ‍ क्षेत्र ’ म्हणजे भिन्न मातांचे ठायीं झालेले . ‘ पृथक् ‍ जन ’ म्हणजे भिन्न जातीचे होत . हें त्रिपुरुषसापिंड्य विजातीय सापत्नमातेच्या कुलविषयक आहे . समान जातीच्या सापत्नमातेच्या कुलांत चार पुरुषांपर्यंत सापिंड्य आहे . कारण , " मातेकडून पांचवी आणि पित्याकडून सातवी कन्या वरावी " असें वसिष्ठवचन आहे . पांचवी सांगितली ही सापत्नमातेकडून समजावी . सातवी असें सांगितलें तें ब्राह्मणादिकांना क्षत्रियादिस्त्रियांचे ठायीं उत्पन्न पितृकुलविषयक समजावें , असेंही सांगितलें आहे . तें मदनपारिजातानें स्वकपोलकल्पित सांगितल्यामुळें व इतर ग्रंथांचा विरोध येत असल्यामुळें निर्मूल आहे . आणि " पितृपत्न्यः सर्वा मातरः " असें सांगून " तदपत्यानि भागिनेयानि " असा सुमंतूनें भागिनेयांचा वेगळा निषेध केलेलाही आहे . जर सापत्नमातृकुलांत चतुः पुरुषपर्यंत सापिंड्य असेल तर सापिंड्यानेंच भागिनेयांचा निषेध सिद्ध असल्यानें सापत्नमातुलत्वादि निर्देश व्यर्थ होईल . सापत्नमातृकुलांत चतुः पुरुषसापिंड्य नाहीं म्हणूनच त्यानें स्मृतिकौमुदींत समाज जातीच्या सापत्नमातामहकुलविषयक तें शंखवचन असें म्हणून त्या वचनाची तशीच ( विज्ञानेश्वरासारखीच ) व्याख्या केली आहे . तेणेंकरुन ‘ पंचमीं सप्तमीं चैव० ’ ह्या वसिष्ठवचनाची ‘ पांचवी ’ व ‘ सातवी ’ टाकून वरावी , अशी व्याख्या करावी . तस्मात् ‍ त्या शंखवचनाची पूर्वीचीच ( विज्ञानेश्वरानें केलेलीच ) व्याख्या युक्त आहे . प्रयोगरत्नांत नारायणभट्ट - आणि स्मृतितत्त्वादि गौडग्रंथांत ते ते ग्रंथकार - सापत्नमातामहकुलांत जितकें सांगितलें तितकें वाचनिकच ( वचनानें उक्तच ) सापिंड्य समजावें , असें सांगतात . तें वाचनिक सापिंड्य सुमंतु सांगतो , तें असें - " मातृसंबंधी आणि पितृसंबंधी कन्या सात पुरुषांपर्यंत अविवाह्य होतात . अन्यांच्या मतीं पांच पुरुषांपर्यंत अविवाह्य होतात . पित्याच्या सार्‍या पत्नी आपल्या माता होतात . त्यांचे भ्राते ते आपुले मातुल होतात . त्यांच्या भगिनी त्या आपल्या मावशी होतात . त्यांच्या ( मातुलांच्या व मावशींच्या ) कन्या त्या आपल्या भगिनी होतात . व त्या भगिनींचीं मुलें तीं आपलीं भागिनेय होतात . असें मानलें नाहीं तर विवाहादि संबंध करुन संकरकारी होतील . तसेंच वेदादिक पढविणारा जो गुरु त्याचें हेंच सापिंड्य समजावें . " या सुमंतुवचनांत ‘ आपंचमात् ‍ ’ असें पद आहे त्याचा अर्थ - अन्याच्या मतीं पांचपर्यंत अविवाह्य होतात , पुढें विवाह्य आहेत . अथवा मातृकुलसंबंधी तीन गोत्रांतून चवथ्या गोत्रांत उत्पन्न झालेली कन्या पांचांच्या पुढची करावी , अशाविषयीं ‘ आपंचमात् ‍ ’ हें पद आहे , असें प्राच्य सांगतात . मात्स्यांत - " सप्रवर , शिष्यांची संतति , आणि वेदाध्ययन सांगणार्‍या गुरुची संतति विवाहाविषयीं निषिद्ध केली आहे . " ह्या वरील सुमंतुवचनांत ‘ तद्भगिन्यो मातृष्वसारः ’ हें वाक्य आकरांत ( हेमाद्यादिकांत ) पठित नाहीं . क्कचित्स्थलीं ( सापिंड्य नसलें तरी ) वचनावरुन अविवाह ( विवाहनिषेध ) आहे . जसें गृह्यपरिशिष्ठांत - " जीचा विरुद्ध संबंध होईल तिला वरुं नये . " असें सांगून विरुद्ध संबंध कसा तो स्वतःच परिशिष्टकारांनीं सांगितला आहे . जशी भार्येच्या बहिणीची कन्या . आणि चुलत्याच्या पत्नीची बहीण . पहिल्या उदाहरणांत कनिष्ठपणाचें ( कन्येचें ) नातें येतें . आणि दुसर्‍या उदाहरणांत चुलत्याची मेहुणी म्हणजे वरिष्ठ नातें येतें . बौधायन - " मातेच्या सवतीची भगिनी आणि तिची कन्या वर्ज्य करावी . पितृव्यपत्नीची भगिनी आणि तिची कन्या वर्ज्य करावी " यावरुन मावशीच्या सापत्न पुत्रांची कन्या देखील अविवाह्य आहे . कारण , " सापत्नमातेच्या कुलांतील कन्या वर्ज्य करावी " असें मदनपारिजातांत उक्त आहे , असें केचित् ‍ सांगतात .

केचित्तुज्येष्ठोभ्रातापितुः समइतिमनूक्तेस्तत्पत्न्याः मातृत्वात्तत्पितुर्मातामहत्वात् ‍ ज्येष्ठभ्रातृपत्नीभगिनीनविवाह्या तथा उत्पादकब्रह्मदात्रोर्गरीयान् ‍ ब्रह्मदः पितेतिमनूक्तेर्गुरुणात्रिपुरुषंसापिंड्यंसखापिनिर्वाप्यः अतस्तेषांकन्यानोद्वाह्याः गायत्र्याउपदेष्टुश्चकन्यांनैवोद्वहेद्दिजः गुरोश्चकन्यांशिष्योवातत्संतत्यापिनेष्यते पुरुषत्रयपर्यंतंभ्रात्रादेर्नैतदिष्यते वाक् ‍ संबंधकृतानांतुस्नेहसंबंधभागिनां विवाहोत्रनकर्तव्योलोकगर्हाप्रसज्यतइतिवचनाच्चेत्याहुः तत्रमूलंचिंत्यम् ‍ ।

केचित् ‍ विद्वान् ‍ तर - " ज्येष्ठ भ्राता पित्यासमान आहे " ह्या मनुवचनावरुन त्या ज्येष्ठ भ्रात्याची पत्नी माता झाल्यामुळें तिचा पिता मातामह असल्यामुळें ज्येष्ठ भ्रात्याच्या पत्नीची भगिनी विवाहाला योग्य नाहीं . तसेंच " जनक पिता आणि ब्रह्म ( वेद ) दाता पिता ( गुरु ) ह्या दोघांमध्यें ब्रह्मदाता पिता श्रेष्ठ आहे " ह्या मनुवचनावरुन गुरुसहवर्तमान त्रिपुरुषसापिंड्य आहे . आणि सख्यालाही पिंडनिर्वपण असल्यामुळें निर्वाप्यलक्षण सापिंड्य आहे , म्हणून त्यांच्या कन्या विवाहाला योग्य नाहींत . " गायत्रीचा उपदेश करणाराची कन्या द्विजानें वरुं नये . गुरुची कन्या शिष्यानें वरुं नये . गुरुच्या संततीबरोबरही विवाह इष्ट नाहीं . तीन पुरुषांपर्यंत भ्राता इत्यादिकांना गुरुसंततीशीं संबंध इष्ट नाहीं . वाक् ‍ संबंध झालेले व स्नेहसंबंधी याम्चा विवाहसंबंध करुं नये . कारण , केला असतां लोकांत निंदा होते " असें वचनही आहे , असें सांगतात . या केचिन्मताविषयीं मूल चिंत्य ( अनुपलब्ध ) आहे .

दत्तकविषयेतूच्यते तत्रगौतमः ऊर्ध्वंसप्तमात्पितृबंधुभ्योबीजिनश्चमातृबंधुभ्यः पंचमादिति बंधुग्रहणान्नदत्तकमात्रपरमिदम् ‍ किंतुसंतानेपिएतत् ‍ क्षेत्रजादिसर्वद्व्यामुष्यायणपरमितिहरदत्तः अत्रस्मृतिचंद्रिका नियोगात् ‍ यउत्पादयतितस्माद्बीजिनोप्यूर्ध्वंसप्तमादित्यर्थइति दत्तकस्यजनकविषयमेतदितिसापिंड्यमीमांसायाम् ‍ तेनदत्तकस्यजनककुलेसाप्तपौरुषंजननीकुलेपांचपौरुषंसापिंड्यं दत्तक्रीतादिपुत्राणांबीजवप्तुः सपिंडता सप्तमीपंचमीचैवगोत्रित्वंपालकस्यचेतिबृहन्मनूक्तेः बीजिनश्चेतिगौतमोक्तेश्च पालकपितृकुलेतुपंचपुरुषं पालकमातृकुलेत्रिपुरुषं तथाचापरार्केपैठीनसिः त्रीन्मातृतः पंचपितृतः पुरुषानतीत्योद्वहेदिति एतत्सएवव्याचख्यौदत्तकादीन्पुत्रान्पितृपक्षतोनिवृत्तपिंडगोत्रार्षेयान्प्रत्येतदुच्यतेपंचपितृतइतिनान्यान्प्रतीति यत्तुवृद्धगौतमः स्वगोत्रेषुकृतायेस्युर्दत्तक्रीतादयः सुताः विधिनागोत्रमायांतिनसापिंड्यंविधीयते यच्चवसिष्ठः अन्यशाखोद्भवोदत्तः पुत्रश्चैवोपनायितः स्वगोत्रेणस्वशाखोक्तविधिनास्यात्स्वशाखभागिति यच्चनारदः धर्मार्थंवर्धिताः पुत्रास्तत्तद्गोत्रेणपुत्रवत् ‍ अंशपिंडविभागित्वंतेषुकेवलमीरितमिति तत्पालककुलेसाप्तपौरुषंसापिंड्यंनेत्येवंपरं नतुसर्वथासापिंड्यनिषेधपरमितिसापिंड्यमीमांसायाम् ‍ मदनपारिजातादपिदत्तकानुप्रवेशेऽल्पंसापिंड्यंप्रतिभाति तथाहि तेनत्रीनतीत्येत्युदाह्रत्ययस्यमातादत्तपुत्रीप्रतिग्रहीत्रापुत्रीकृतातस्याः प्रतिग्रहीतृकुलेत्रीनतीत्येति पंचपितृतइतियस्यदत्तपुत्रः पितातस्यदत्तस्ययज्जनककुलंतद्विषयमित्युक्तम् ‍ वस्तुतस्तुपूर्ववचसांमहानिबंधेषुक्काप्यनुपलंभादपरार्कादिलिखनाभावात् ‍ पूर्वोक्तव्यवस्थायाश्चप्रातिभज्ञानतुल्यत्वाद्यैरेतल्लिखितंतेषामेवशोभते ।

दत्तकाविषयीं तर सापिंड्य सांगतो - गौतम - " पितृबंधु व बीजी ( जनक ) यांच्याकडून सातव्या पुरुषापलीकडे सापिंड्य निवृत्त होतें . मातृबंधूकडून पांचव्या पुरुषापलीकडे सापिंड्य निवृत्त होतें . " ह्या वचनांत ‘ बंधु ’ ह्या पदाचें ग्रहण केल्यावरुन हें वचन केवळ दत्तकाविषयींच समजूं नये ; तर त्याच्या संततीविषयींही समजावें . व्द्यामुष्यायण ( दोन पित्यांचे पुत्र ) जे क्षेत्रज , दत्तक इत्यादिक पुत्र त्या सर्वांविषयीं सापिंड्यबोधक हें वचन आहे , असें हरदत्त सांगतो . येथें ‘ ऊर्ध्वं सप्तमात् ‍ ० ’ ह्या गौतमवचनाचा अर्थ स्मृतिचंद्रिकाकार सांगतो कीं , परस्त्रियेचे ठायीं नियोगानें जो उत्पन्न करितो त्या बीजी ( जनक ) पित्याकडे देखील सातव्या पुरुषापलीकडे विवाहयोग्यत्व आहे , असा अर्थ समजावा . दत्तकाच्या जनकविषयक हें गौतमवचन आहे , असें सापिंड्यमीमांसेंत सांगितलें आहे . तेणेंकरुन दत्तकाच्या जनककुलांत सात पुरुषांपर्यंत सापिंड्य . आणि जननीकुलांत पांच पुरुषांपर्यंत सापिंड्य . कारण , " दत्त , क्रीत , इत्यादि पुत्रांना जनक पित्याचें सात पुरुषांपर्यंत सापिंड्य . जननी मातेचें पांच पुरुषांपर्यंत सापिंड्य . आणि गोत्रित्व पालक पित्याचेंच आहे " असें बृहन्मनुवचन आहे . आणि " बीजी ( जनक ) पित्याच्या कुलांत सात पुरुषांपलीकडे सापिंड्य निवृत्त होतें " असें गौतमाचेंही वचन आहे . पालक पित्याच्या कुलांत तर पांच पुरुषपर्यंत आणि पालक मातृकुलांत त्रिपुरुषपर्यंत सापिंड्य समजावें . तसेंच सांगतो अपरार्कांत पैठीनसि - " मातेकडून तीन आणि पित्याकडून पांच पुरुष सोडून विवाह करावा " ह्या पैठीनसिवचनाची व्याख्या त्याच अपरार्कानें केली आहे , ती अशी - पितृपक्षाकडून सापिंड्य सगोत्र सप्रवररहित कुलांत जे दत्तकादिक पुत्र झाले असतील त्यांना पितृकुलांत पांच पुरुष सापिंड्य , असें सांगितलें आहे . इतरांना हें सांगितलें नाहीं . अर्थात् ‍ जनकपितृकुलसंबंधी सात पुरुषपर्यंत आहेच . आतां जें वृद्धगौतम - " परगोत्रांतील दत्तक - क्रीत इत्यादिक पुत्र जे स्वगोत्रांत केले असतील ते दत्तकादि विधीनें गोत्र पावतात , त्यांना सापिंड्य येत नाहीं . " आणि जें वसिष्ठ - " अन्य शाखेंत उत्पन्न झालेला पुत्र दत्तक घेऊन त्याचें स्वगोत्रानें स्वशाखोक्त विधीकरुन उपनयन केलें असतां स्वशाखाभागी होतो . " आणि जें नारद - " जे धर्मार्थ त्या त्या गोत्रानें वाढविलेले पुत्र ते जिंदगीचे वारस व पिंडविभागी केवळ होतात . अर्थात् ‍ सपिंड होत नाहींत . " ह्या वचनावरुन पालककुलांत सापिंड्य नाहीं असें दिसतें , पण तीं वचनें सर्वथा सापिंड्यनिषेधक नाहींत , तर पालककुलांत साप्तपुरुष सापिंड्य नाहीं , इतक्याच अर्थाचीं बोधक आहेत ; असें सापिंड्यमीमांसेंत सांगितलें आहे . मदनपारिजातावरुनही दत्तकाचा संबंध असतां अल्प सापिंड्य भासतें . तेंच उपपादन करितो - त्या ग्रंथकारानें - " मातेकडून तीन पुरुष टाकून कन्या वरावी " हें उदाहरण देऊन ज्याची माता दत्तकपुत्री घेणारानें पुत्री केली असेल तिचे तीन पुरुष टाकून कन्या प्रतिग्रहीत्याच्या कुलांत वरावी , असा अर्थ होय . ‘ पंच पितृतः पुरुषान् ‍ अतीत्योद्वहेत् ‍ ’ हें वचन - ज्याचा पिता दत्तक असेल त्या दत्तकाचें जें जनककुल तद्विषयक आहे , असें सांगितलें आहे . वास्तविक म्हटलें तर पूर्वीं सांगितलेलीं वृद्धगौतमादि वचनें महानिबंधांत ( हेमाद्यादिकांत ) कोठेंही अनुपलब्ध असल्यामुळें व अपरार्कांदिकांनीं न लिहिल्यामुळें पूर्वोक्त जी ( पालककुलांत साप्तपुरुष सापिंड्य नाहीं इतकाच अर्थ इत्यादि ) व्यवस्था ती प्रातिभ ज्ञान ( बुद्धितरंग ज्ञान ) - तुल्य असल्याकारणानें ज्यांनीं हें असें लिहिलें त्यांनाच तें शोभतें .

ममतुपालककुले एकपिंडदानक्रियान्वयित्वरुपंसाप्तपौरुषमेवसापिंड्यं बीजिनश्चेतिगौतमोक्तेर्जनककुलेपितावदेव त्रीन्मातृतइत्यादितुसवर्णसापत्नमातृकुलपरं यद्येकजाताबहवइतिशांखैकवाक्यत्वादितियुक्तंप्रतिभाति अतएवास्यव्द्यामुष्यायणत्वंहेमाद्रिप्रवरमंजरीवृत्तिकृन्नारायणादिभिरुक्तम् ‍ भट्टसोमेश्वरेणापिपृथायाः कुंतिभोजस्यपालककन्यात्वेपि ऊर्ध्वंसप्तमात्पितृबंधुभ्योबीजिनश्चेतिगौतमोक्तेर्दत्रिमायाः पृथायाः जनकस्यशूरसेनस्यकुलेपिसाप्तपौरुषंपालककुलेपितावदेवसापिंड्यमुक्तमपिवाकारणाग्रहणेइत्यत्र सापिंड्यदीपिकायांतुदत्तक्रीतादीनांजनकगोत्रेणोपनयनेकृतेजनककुलेसाप्तपौरुषंसापिंड्यम् ‍ पालकमातापितृकुलेत्रिपुरुषं पिंडनिर्वापान्निर्वाप्यलक्षणंत्रिपुरुषंसापिंड्यम् ‍ पालकगोत्रेणोपनयनेतत्कुलेसाप्तपौरुषमित्युक्तम् ‍ तन्न चूडोपायनसंस्कारानिजगोत्रेणवैकृताः दत्ताद्यास्तनयास्तेस्युरन्यथादासउच्यतइतिकालिकापुराणादुपनयनोत्तरंदत्तकनिषेधात् ‍ त्रिपुरुषमित्यत्रापिमूलंमृग्यमित्यलंबहुना ।

मला तर - पालककुलांत एक पिंडदान क्रिया संबंधरुप सात पुरुषपर्यंतच सापिंड्य आहे . ‘ बीजिनश्च ’ ह्या गौतमाच्या उक्तीवरुन जनक पित्याच्या कुलांतही तितकेंच ( सात पुरुषपर्यंतच ) सापिंड्य आहे . ‘ त्रीन् ‍ मातृतः० ’ इत्यादि पैठीनसिवचन तस सवर्ण ( सजातीय ) जी सापत्न माता तिच्या कुलाविषयीं आहे . कारण , असें म्हटलें असतां " यद्येकजाता बहवः पृथक . क्षेत्राः पृथग् ‍ जनाः ॥ एकपिंडाः पृथक् ‍ शौचाः पिंडस्त्वावर्तते त्रिषु " ह्या शंखवचनांत ‘ पृथक् ‍ क्षेत्र ’ म्हणजे सजातीय भिन्न मातांचे ठायीं झालेले , त्यांचें त्रिपुरुष सापिंड्य , असें सांगितलें आहे , त्याच्याशीं एकवाक्यता होते ; हें युक्त आहे , असें भासतें . म्हणूनच हेमाद्रि - प्रवरमंजरीकार - वृत्तिकार नारायण इत्यादिकांनीं हा दत्तकादिक व्द्यामुष्यायण ( दोन पित्यांचा पुत्र ) आहे असें सांगितलें आहे . भट्टसोमेश्वरानें देखील - ‘ अपिवाकारणाग्रहणे० ’ ह्या जैमिनीच्या सूत्रावर - पृथा ( कुंती ) ही कुंतिभोजराजाची पालककन्या असली तरी ‘ ऊर्ध्वं सप्तमात् ‍ पितृबंधुभ्यो बीजिनश्च ’ ह्या गौतमाच्या उक्तीवरुन त्या दत्तक कुंतीचा जनकपिता जो शूरसेन त्याच्या कुलांत साप्तपौरुष सापिंड्य , आणि पालक कुलांतही तितकेंच ( साप्तपौरुषच ) सापिंड्य असें सांगितलें आहे . सापिंड्यदीपिकेंत तर - दत्त - क्रीत इत्यादिकांचें जनक गोत्रानें उपनयन केलें असतां जनककुलांत साप्तपौरुष सापिंड्य . आणि पालक मातापितृकुलांत पिंडनिर्वपण असल्यामुळें निर्वाप्यरुपी त्रिपुरुष सापिंड्य आहे . दत्तकादिकांचें पालक गोत्रानें उपनयन केलें असेल तर पालककुलांत साप्तपौरुष सापिंड्य आहे , असें सांगितलें आहे . तें बरोबर नाहीं . कारण , " चौल , उपनयन हे संस्कार आपल्या ( पालकाच्या ) गोत्रानें ज्यांचे केले असतील ते दत्तकादिक पुत्र होतात . अन्यथा ( पालकगोत्रानें संस्कार झाले नसतील तर ) ते दास म्हटले आहेत " ह्या कालिकापुराणवचनावरुन उपनयनोत्तर दत्तकाचा निषेध आहे . आणि पालककुलांत त्रिपुरुष सापिंड्य , असें जें सांगितलें त्याविषयीं देखील मूल शोधावें . आतां बहुत सांगणें पुरे करितों .

मातापितृद्वारकसापिंड्यवतीनांकन्यानामियंसंख्यारामवाजपेयिनोक्ता उद्वोढुः पितरौपितुश्चपितरौतज्जन्मकृद्दंपतीद्वंद्वंतस्यचतुष्कमष्टचततोप्यस्यक्रमात् ‍ षोडश वंशारंभकदंपतीप्रमितिरित्यासप्तकक्षंरदाएकैकान्वयकन्यकाः पितृकुलेत्वासप्तकक्षंब्रुवे यद्यप्येकस्यबहवः सुताः स्युस्तदपीहतु संबंधसाम्यादेकैवगणितेत्यवधार्यताम् ‍ एकस्मान्मिथुनात्सुतोथदुहिताद्वंद्वद्वयंतद्दूयातस्माद्दूंद्वचतुष्कमष्टचततोतः षोडशाऽतोरदाः यावत्सप्तमकक्षमग्निऋतवः कन्याइहैकान्वयेतादंतैर्गुणितारसैकखदृशोवंशेसपिंडाः पितुः मातुर्जन्मददंपतीचमिथुनद्वंद्वंतयोः सागरास्तस्याः पंचमकक्षमष्टमितिरित्येकान्वयः पुंसुते द्वंद्वाद्दूंद्वयुगंभतोब्धयइतोऽष्टौपंचकक्षंशरक्षोण्यः सप्तगुणाः शराभ्रविधवोमातुः सपिंडाः कुले कुलद्वयस्यकन्यकायुतामिथः सपिंडकाः हिमांशुदृग्धरादृशोविवाहकर्मवर्जिताइति एतच्चसर्ववर्नसाधारणं सर्वत्रसापिंड्यसद्भावादितिविज्ञानेश्वरोक्तेः पंचमात्सप्तमादूर्ध्वंमातृतः पितृतः क्रमात् ‍ सपिंडतानिवर्तेतसर्ववर्णेष्वयंविधिरितिहरनाथधृतदेवलवचनाच्च संबंधतत्त्वे सुमंतुः पितृष्वसृसुतांमातृष्वसृसुतांमातुलसुतांमातृसगोत्रांसमानार्षेयींविवाह्यचांद्रायणंचरेत्परित्यज्ज्यैनांमातउवद्बिभृयादितिदिक् ‍ ।

मातापितृद्वारकसापिंड्यवतीनांकन्यानामियंसंख्यारामवाजपेयिनोक्ता उद्वोढुः पितरौपितुश्चपितरौतज्जन्मकृद्दंपतीद्वंद्वंतस्यचतुष्कमष्टचततोप्यस्यक्रमात् ‍ षोडश वंशारंभकदंपतीप्रमितिरित्यासप्तकक्षंरदाएकैकान्वयकन्यकाः पितृकुलेत्वासप्तकक्षंब्रुवे यद्यप्येकस्यबहवः सुताः स्युस्तदपीहतु संबंधसाम्यादेकैवगणितेत्यवधार्यताम् ‍ एकस्मान्मिथुनात्सुतोथदुहिताद्वंद्वद्वयंतद्दूयातस्माद्दूंद्वचतुष्कमष्टचततोतः षोडशाऽतोरदाः यावत्सप्तमकक्षमग्निऋतवः कन्याइहैकान्वयेतादंतैर्गुणितारसैकखदृशोवंशेसपिंडाः पितुः मातुर्जन्मददंपतीचमिथुनद्वंद्वंतयोः सागरास्तस्याः पंचमकक्षमष्टमितिरित्येकान्वयः पुंसुते द्वंद्वाद्दूंद्वयुगंभतोब्धयइतोऽष्टौपंचकक्षंशरक्षोण्यः सप्तगुणाः शराभ्रविधवोमातुः सपिंडाः कुले कुलद्वयस्यकन्यकायुतामिथः सपिंडकाः हिमांशुदृग्धरादृशोविवाहकर्मवर्जिताइति एतच्चसर्ववर्नसाधारणं सर्वत्रसापिंड्यसद्भावादितिविज्ञानेश्वरोक्तेः पंचमात्सप्तमादूर्ध्वंमातृतः पितृतः क्रमात् ‍ सपिंडतानिवर्तेतसर्ववर्णेष्वयंविधिरितिहरनाथधृतदेवलवचनाच्च संबंधतत्त्वे सुमंतुः पितृष्वसृसुतांमातृष्वसृसुतांमातुलसुतांमातृसगोत्रांसमानार्षेयींविवाह्यचांद्रायणंचरेत्परित्यज्यैनांमातृवद्बिभृयादितिदिक् ‍ ।

रामवाजपेयीनें , मातृ - पितृद्वारक सापिंड्यवती कन्यांची संख्या सांगितली आहे , ती अशी - " उद्वोढा ( वर ) त्याचे मातापितर दोन . त्यांपैकीं पित्याचें जनकदांपत्य १ , त्यांचे जनक दंपती २ , त्यांचे जनकदंपती ४ , त्यांचे जनकदंपती ८ , त्यांचे जनकदंपती १६ , आणि त्यांचे जनकदंपती ३२ याप्रमाणें पितृकुलांत सात पुरुषांपर्यंत कन्या होतात , त्या सांगतों . जरी एका पुरुषाचे बहुत पुत्र असतात , तरी त्या बहुतांचा संबंध सारखा असल्यामुळें एक एकच धरुन येथें गणना करितो , असें समजावें . ह्या बत्तीस दांपत्यांपैकीं एका दांपत्यापासून एक पुत्र व एक कन्या अशीं दोन झालीं . त्या दोघांपासून ४ म्हणजे दोन द्वंद्वें झालीं . त्या दोन द्वंद्वांपासून ४ द्वंद्वें झालीं . त्या चार द्वंद्वांपासून ८ द्वंद्वें झालीं . त्या आठ द्वंद्वांपासून १६ द्वंद्वें . व त्या सोळा द्वंद्वांपासून ३२ द्वंद्वें झालीं . ह्यांची गणना केली असतां वर सांगितलेल्या बत्तीस दांपत्यांपैकीं एका दांपत्याच्या कन्या त्या मूळ दांपत्यास धरुन सातव्या पिढीपर्यंत ६३ होतात . त्यांस बत्तीसांनीं गुणिलें असतां २०१६ इतक्या कन्या पितृवंशांत सपिंड होतात . हा प्रकार पित्याकडे समजावा . आतां मातेचें उत्पादक दांपत्य १ , त्या दांपत्यांचीं जनक दांपत्यें २ , त्या दोन दांपत्यांचीं जनकदांपत्यें ४ , त्या चार दांपत्यांचीं जनकदांपत्यें ८ , याप्रमाणें मातृकुलांत पांच पुरुषांपर्यंत कन्या होतात , त्या सांगतो - त्या आठ दांपत्यांपैकीं एका दांपत्यापासून एक पुत्र व एक कन्या अशीं दोन झालीं . त्या दोघांपासून २ द्वंद्वें झालीं . त्यांपासून ४ द्वंद्वें आणि त्यांपासून ८ द्वंद्वें झालीं . मिळून माता धरुन पांच पिढीपर्यंत एका मूळ दांपत्याच्या ह्या सार्‍या कन्यांची गणना केली असतां १५ कन्या होतात . त्यांस सातांनीं गुणिलें असतां १०५ इतक्या कन्या मातेच्या कुलांत सपिंड होतात . पितृकुलांतील व मातृकुलांतील सपिंड कन्या एकत्र मिळविल्या असतां २१२१ इतक्या होतात . ह्या विवाहकर्माविषयीं वर्ज्य आहेत . हें सापिंड्य ब्राह्मण , क्षत्रिय , वैश्य , शूद्र , ह्या सर्व वर्णांना साधारण सांगितलें आहे . कारण , ‘ सर्वांचे ठायीं सापिंड्य आहे ’ असें विज्ञानेश्वराचें सांगणें आहे . आणि " मातेकडून पांचव्या पिढीपुढें व पित्याकडून सातव्या पिढीपुढें सापिंड्य निवृत्त होतें ; हा प्रकार सार्‍या वर्णांविषयीं समजावा " असें हरनाथानें धरलेलें देवलवचनही आहे . संबंधतत्त्वांत सुमंतु - " आत्याची कन्या , मावशीची कन्या , मातुलाची कन्या , मातृगोत्रांतील कन्या , सप्रवर कन्या , यांच्याशीं विवाह केला असतां चांद्रायण प्रायश्चित्त करावें . आणि तिचा भोगाविषयीं त्याग करुन तिचें मातेप्रमाणें पालन करावें . " याप्रमाणें ही दिशा दाखविली आहे .

ऋषेरिदमार्षंप्रवरः गोत्रंप्रसिद्धं समानेआर्षगोत्रेयस्यतस्माज्जातायानभवतिताम् ‍ ।

विवाहप्रकरणाच्या आरंभीं दिलेल्या याज्ञवल्क्यवचनांत सापिंड्यरहित कन्या वरावी , असें आहे , त्या सापिंड्याचा निर्णय सांगितला . आतां ‘ असमानार्षगोत्रजां ’ ह्या पदाचा अर्थ - ऋषीचें हें तें आर्ष म्हणजे प्रवर होय . समान ( एक ) आहे आर्ष ( प्रवर ) व गोत्र ज्याचें त्यापासून झालेली नसेल ती कन्या वरावी , असा आहे .

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP