संस्कृत सूची|शास्त्रः|आयुर्वेदः|सार्थ माधवनिदान|
मुखरोगनिदान

माधवनिदान - मुखरोगनिदान

" शरिरेंद्रिय-सर्वात्मा संयोगधारी जीवितम् " अशी जीवनाची आयुर्वेदीय, व्यापक व्याख्या आहे.


मुखरोगांची एकंदर , संख्या .

दन्तेष्वष्टावोष्टथोश्च मूलेषु दश पञ्च च ॥

नव तालुनि जिव्हायां पञ्च सप्त दशामया : ॥

कण्ठेत्रय : सर्वसरा एकषष्टिश्चतु : परा : ॥१॥

मनुष्यास तोंडासंबंधी होणारे एकंदर सर्व रोग पासष्ट आहेत ते - आठ दंतरोग , आठ ओष्ठरोग , पंधरा दंतमूलरोग , नऊ तालूचे रोग , पाच जिभेसंबंधी रोग , सतरा कंठरोग , आणि सर्व तोंडभर पसरणारे असे तीन .

मुखरोगांची संप्राप्ति .

आनूपपिशितक्षीरदधिमाषादिसेवनात्‌ ॥

मुखमध्ये गदानकुर्यु : कृद्धा दोषा : कफोत्तरा : ॥२॥

आनूपदेशांतील ( झाडी व पाणी फार असलेल्या प्रदेशांतील ) प्राण्यांचे मांस खाणे व तसेच दही , दूध , उडीद वगैरे पदार्थांचे सेवन करणे या कारणांनी कफप्रधान दोष प्रकोप पावून मुखाचे ठिकाणी रोग उत्पन्न करतात .

आता प्रथम ओठासंबंधी आठ रोगांची नावे व लक्षणे सांगतो ---

वातजन्य ओष्ठरोग ,

कर्कशौ परुषौ स्तब्धौ कृष्णौ तीव्ररूजान्वितौ ॥

दाल्येते परिपाटयेते ओष्ठौ मारूतकोपत : ॥३॥

वातजन्य ओष्ठरोगात वायुच्या प्रकोपामुळे ओठ कठिण , खरखरीत , ताठ व काळया वर्णाचे होऊन शिवाय ते फुटतात , त्यावरची त्वचा फाटते व त्यांच्या ठिकाणी तीन वेदना होऊअ लागते .

पित्तजन्य ओष्ठरोग .

चीयेते पिडकाभिश्च सरुजाभि : समन्तत : ॥

सदाहपाकपिडकौ पीताभासौ च पित्तत : ॥४॥

पित्तजन्य ओष्ठरोगात पित्तप्रकोपामुळे ओठावर समोवार पुटकुळया उद्भवुन त्यापासून वेदना होतात ; त्यांचा ( ओठांचा ) रंग पिवळा झालेला दिसतो व दाह होतो .

कफजन्य ओष्ठरोग ,

सवर्णामिश्च चीयेते पिडकामरवेदनौ ॥

भवतस्तु कफादोष्ठौ पिच्छिलौ शीतलौ गुरु ॥५॥

कफजन्य ओष्ठरोगांत कफप्रकोपामुळे ओठ त्वचेच्याच वर्णाच्या पुटकुळयांनी व्यापले जाऊन ते जड , बुळबुळीत व गार होतात , आणि त्यात वेदना नसतात .

सान्निपातिक ओष्ठरोग .

सकृत्कृष्णौ सकृप्पीतौ सकृच्छवेतौ तथैव च ॥

सन्निपतिन विज्ञेयावनेकपिडकान्वितौ ॥६॥

सान्निपातिक ओष्ठरोगात सर्व दोषांची लक्षणे द्दष्टीस पडतात . ती अशी की , ओठ एकदा काळे , एकदा पिवळे तर एकदा पांढरे असे होतात त्यांवर अन्के पुटकुळच्या उद्भवतात .

रक्तजन्य ओष्ठरोग .

खर्जूरीफलवर्णाभि : पिटिकाभिर्निपीडितौ ॥

रक्रोपसृष्टौ रुधिरं स्नवत : शोणितप्रभौ ॥७॥

रक्तजन्य ओष्ठरोगात दूषित रक्तामुळे ओठ रक्तासारखे लाल होऊन त्यावर खारकेच्या वर्णासारख्या पुटकुळया येतात व त्यांतून रक्तस्रावही होत असतो .

मांसजन्य ओष्ठरोग .

मांसदुष्टौ गुरुरथुलौ मांसपिण्डवदुद्नतौ ॥

जन्तवश्चात्र मूर्च्छन्ति नरस्योभयतोमुखातू ॥८॥

मांसजन्य ओष्ठरोगात दूषित मांसामुळे मांसपिंडाप्रमाणे दोन्ही ओठ वर उचतून घेऊन ते जड व स्थूल होतात आणि त्यांना ( दोन्ही ओठांना ) अथवा ओष्ठप्रांतांतून कृमि पडतात .

मेदोजन्य ओष्ठरोग .

सर्पिर्मण्डप्रतीकाशौ मेदसा कण्डुरौ गुरू ॥

स्वच्छं स्फटिकसंकाशमास्नावं स्नवतो भृशम्‌ ॥

तयोर्व्रणो न संरोहेत्‌ मृदुत्वं च न गच्छति ॥९॥

मेदोजन्य ओष्ठरोगात दूषित मेदामुळे ओठ तुपाच्या निवळीच्या वर्णाचे व जड होऊन त्वाजतात आणि त्यांतून स्फटिकासारखा स्वच्छ असा मेदाचा स्राव होतो ; तसेच त्यावर व्रण पडतो व तो ( कधी ) भरला न जाणारा व मठही न पडणारा असा असतो .

क्षतजन्य ओष्ठरोग .

ओष्ठौ पर्यवदीर्येते पीडयेते चाभिघातत : ॥

ग्रथितौ च तदा स्यातां कण्डुक्लेदसमन्वितौ ॥१०॥

क्षतजन्य ओष्ठरोग हा ओष्ठरोगाचा आठवा अथवा शेवटचा प्रकार आहे . यांत ओठांना आघात झाला असता ते चिरले जातात , टणकतात , त्यांस कंड सुटते व त्यांवर पुटकुळया येऊन त्यांतून लस वाह्ते . येथपर्यंत ओठांचे सर्व रोग व त्यांची लक्षणे झाली . आता दंतमूलरोगाविषयी खाली सांगतो .

शीतादाची लक्षणें .

शोणितं दन्तवेष्टेभ्यो यस्याकत्मात्‌ प्रवर्तते ॥

दुर्गन्धीनि सकृष्णानि प्रक्लेदीनि मृदूनि च ॥११॥

दन्तमांसानि शीर्यन्ते पचन्ति च परस्परम्‌ ॥

शीतादो नाम स व्याधि : कफशोणितसंभव : ॥१२॥

दंतमुलगत रोगापैकी पहिल्या रोगास शीताद म्हणतात व हा कफरक्तापासून उद्भवतो . याची लक्षणे - दाताच्या हिरडयातून अकस्मात्‌ रक्त वाहणे व त्याचे मांस काळे पडणे , मऊ होणे , चिघळून झडणे व त्यास घाण येणे , आणि एका दाताची हिरडी पिकली म्हणजे तिच्या योगाने दुसर्‍या दांताचीही पिकली जाणे ही होत .

दंतपुप्पुटाचीं लक्षणें .

दन्तयोस्त्रिषु वा यस्य श्वयथुजायते महात्‌ ॥

दन्तपुप्पुटको नाम स व्याधि : कफरक्तज : ॥१३॥

दंतमूलगत रोगापैकी दुसस दंतपुप्पुट हा रोग कफ व रक्त यापासूनच होणारा असून यात दोन किंवा तीन दातांच्या मुळाशी मोठीथोरली सजयेते .

दंतवेष्टाचीं लक्षणें .

स्नवन्ति पूयरुधिरं चला दन्ता भवन्ति च ॥

दन्तवेष्ट : स विज्ञेयो दुष्टशोणितसंभव : ॥१४॥

दंतमूलगत रोगाच्या तिसर्‍या प्रकारास दंतवेष्ट असे म्हणतात . हा दूषित रक्तजन्य असून यांत दांत हलतात व त्यावाटे रक्त व पूं यांचा स्राव होतो .

सौषिराचीं लक्षणें .

श्वयथुर्दन्तमूलेवु रूजावान्‌ कफरक्तज : ॥

लालास्नावी स विज्ञेय : सौपिरो नाम नामत : ॥१५॥

कफरक्तापासून दातांच्या मुळाशी सूज येऊन त्यामुळे लाळ गळते व ठणका लागतो . हा दंतमूलगत रोगापैकी सौषिर नावाचा चवथा प्रकार होय .

महासौषिराचीं लक्षणें .

दन्ताश्चलन्ति वेष्टेभ्यस्तालु चाप्यवदीर्यते ॥

यस्मिन्‌ स सर्वजो व्याधिर्महासौषिरसंज्ञक : ॥१६॥

पाचवा प्रकार महासौषिर हा त्रिदोषोत्पन्न असून या रोगामुळे हिरडयांपासून दात हालतात व टाळूला भेगा पडतात . हा त्रिदोषजन्य होय .

परिदराचीं लक्षणें .

दन्तमांसानि शीर्यन्ते यस्मिन्‌ ष्ठीत्र्यति चाप्यसृक ॥

पित्तासृक्कफजो व्याधिर्ज्ञेय : परिदरो हि स : ॥१७॥

सहावा प्रकार परिदर हा पित्त , रक्त व कफ यांपासून होत असतो व यांत दातांचे मांस गळणे व थुंकीवाटे रक्त पडणे ही लक्षणे द्दष्टीम पडतात .

उपकुशाचीं लक्षणें

वेष्टेषु दाह : पाकश्च ताभ्यां दन्ताश्चलन्ति च ॥

आघट्टिता : प्रस्नवन्ति शोणितं मन्दवेदना : ॥

आघ्मायन्ते स्नुत रक्ते मुखे पूतिश्च जायते ॥

यत्मिन्नुपकुशो नाम पित्तरक्तकृतो गद : ॥१८॥

सातवा प्रकार उपकुश हा पित्तरक्तजन्य आहे . याची लक्षणे हिरडयांचा दाह होणे व पिकणे आणि त्या योगाने दात हालणे , दातांस किंचित्‌ कळ लागून दातावर दाबल्यास रक्त गळणे व ते गळून गेल्यावर हिरडया पुन : फुगणे व तोंडास घाण येणे अशा प्रकारची असतात .

वैदर्भाचीं लक्षणें .

घृष्टेषु दन्तमूलेषु संरम्भो जायते महान्‌ ॥

भवन्ति चपला दन्ता : स वैदर्भौऽभिघातज : ॥१९॥

दंतमूलगत रोगाचा आठवा प्रकार वैदर्भ हा अभिवातजन्य असून यांत रोग्याच्या हिरडया रगडून घासल्या गेल्यामुळे पुष्कळ सुजतात व दात खिलखिळे होतात .

खल्लिवर्धनाचीं लक्षणें .

मारूतेनाधिको दन्तो जायते तीव्रवेदन : ॥

खल्लिवर्धनसंज्ञोऽसौ जाते रुक च प्रशाम्यति ॥२०॥

न वा प्रकार खल्लिवर्धन नावाने प्रसिद्व आहे . यात दातांवर वातप्रकोपाने एक नवा दात उगवतो व तो उगवतेवेळेस अत्यत ठणका लागतो व उगवून पुरता वर आल्यावर ( ठणका ) नाहीसा होतो .

करालाचीं लक्षणें .

शनै : शनै : प्रकुरूते वायुर्दन्तसमाश्रित : ॥

करालान्‌ विकटवान्‌ दन्तान्‌ करालो न स सिध्यति ॥२१॥

दहावा प्रकार कराल . यात वायु दातांच्या मुळांचा आश्रय करून हळूहळू दातांस वाकडेतिकडे करतो व हे वाकडेतिकडे झालेले दात पुन : नीट होत नाहीत . हा कराल विकार असाध्य आहे .

अधिमांसकाचीं लक्षणें .

हानव्येपश्चिमे दन्ते महान्‌ शोथो महारुज : ॥

लालास्नावी कफकृतो विज्ञेय : सोऽधिमांसक : ॥२२॥

कफापासून अधिमांसक नावाचा जो अकरावा प्रकार उद्भवतो त्यास शेवटच्या दाताच्या ( दाढेच्या ) मुळाशी भयंकर सूज येऊन तिला ठणका लागतो व मुखावाटे लाळेचा स्राव होतो .

पंचदंत नाडीव्रण .

दन्तमूलगता नाडया : पञ्ज ज्ञेया यथेरिता : ॥

दंतमूलगत रोगाचे अकरा प्रकार वर सांगितले . बाकी जे पांच राहिले ते नाहीव्रण होत ; त्यांची नावे वातजन्य , पित्तजन्य , कफजन्य , सान्निपातिक व आगंतुक याप्रमाणे असून त्यांची लक्षणे मागे ( नाडीव्रणनिदानात ) सांगितलेल्या त्यांच्या त्या त्या पृथक लक्षणाप्रभाणे जाणावी .

आता आठ प्रकारच्या दंतरोगाविषयी सांगतो :---

दालनाचीं लक्षणें .

दीर्यमाणेष्विव रूजा यस्य दन्तेषु जायते ॥

दालनो नाम स व्याधि : सदागतिनिमित्तज : ॥२३॥

दंतरोगाचा पहिला प्रकार दालन हा सदागतिमान असा वातजन्य असून यात दातामध्ये चिरल्यासारख्या वेदना होतात .

कृमिदंतकाचीं लक्षणें .

कृष्णच्छिद्रश्चल : स्रावी ससंरम्भो महारुज : ॥

अनिमित्तरुजो वाताद्विज्ञेय : कृमिदन्तक : ॥२४॥

दुसरा प्रकार कृमिदंतक होय . यात वाय़ूच्या प्रकोपाने दाताला काळसर मोक पडून तो हालतो , त्यातून रक्तस्राव होतो , त्यावर सूज येते , त्यास ठणका लागतो व तो काही निमित्त नसतानाही दुखत असतो .

भंजनकाचीं लक्षणें .

वक्त्रं वक्र भवेद्यस्य दन्तभङ्गश्च जायते ॥

कफवातकृतो व्याधि : स भञ्जनकसंज्ञित : ॥२५॥

तिसर्‍या प्रकारच्या कफवातजन्य अशा भंजनक नामक दंतरोगामुळे रोग्याचे तोंड वाकडेतिकडे होऊन दात फुटतात .

दंतहर्षाचीं लक्षणें .

शीतरूक्षप्रवाताम्लस्पर्शानामसहा द्विजा : ॥

‘ पित्तमारुतकोपने दन्तहर्ष : स नामत : ॥२६॥

पित्त व वात यांच्या प्रकोपाने होणारा दंतहर्षरोग हा चवथा प्रकार जाणावा . यात थंड , आंबट , रूक्ष असे पदार्थ व वारा यांचा स्पर्श दातास असह्म होतो .

दंतशर्करेचीं लक्षणें .

मलो दन्तगतो यस्तु पित्तमारुतशोषित : ॥

शर्करेव खरस्पर्शा सा ज्ञेया दन्तशर्करा ॥२७॥

पित्त , वायु यांच्या योगाने दातावरील मळ शुष्क होऊन तो शर्करे ( वाळू ) प्रमाणे खरखरीत बनणे हा दंतशर्करानामक पांचवा प्रकार आहे .

कपालिकेचीं लक्षणें .

कपालोष्विव दीर्यत्सु दन्तानां सैव शर्करा ॥

कपालिकेति विज्ञेया सदा दन्तविनाशिनी ॥२८॥

वर सांगितलेल्या रेतीच्या पापुद्रयाप्रमाणे दातापासून कपारे निघतात त्याला कपालिका म्हणतात व त्याने दात नष्ट होतात .

श्यावदंताचीं लक्षणें .

योऽसृङमिश्रेण पित्तेन दग्धो दन्तस्त्वशेषत : ॥

श्यावतां नीलतां वापि गत : स श्यावदन्तक : ॥२९॥

दंतरोगाच्या श्यावदंतनामक सातव्या प्रकारात रक्तमिश्रित अशा पित्तामुळे एक दात जळून तो संबंध काळया अथवा निळया वर्णाचा होतो .

दंतविद्रधि .

दन्तमांसे मलै : सास्नै : बाह्यान्त : श्वयथुर्गुरु : ॥

सदाह रुक स्रवेद्भिन्न : पूयास्नं दन्तविद्रधि : ॥३०॥

वातादि दोष व रक्त यांचे योगाने हिरडी सुजून ती , सूज आत बाहेरही पसरते . तिला ठणका , उडत्व व दाह असून फुटल्यावर पू व रक्त वाहते . या रोगास दंतविद्रधि म्हणतात .

जिभेला होणारे रोग वातजन्य , पित्तजन्य , कफजन्य , अलास व उपजिव्हा याप्रमाणे पाच असून त्यांची लक्षणे खाली पृथक पृथक दिली आहेत .

वातजन्य .

जिव्हाऽनिलेन स्फुटिता प्रसुप्ता भवेच्च शाकच्छदनप्रकाशा ॥

वातजन्य जिव्हागत रोगात जीभ फुटते , सागाच्या पानासारखी खरखरीत होते व तिला कोणत्याही रसाची चव समजत नाही . बधिर होते .

पित्तजन्य .

पित्तेन पीता परिदह्यते च दीर्घै : सरक्तैरपि कण्टकैश्व ॥३१॥

पित्तजन्यात पित्तप्रकोपामुळे जीभ पिवळी पडत , तिच्या ठिकाणी दाह होतो व तिजवर मोठमोठे व तांबडया वर्णाचे काटे उद्भवतात .

कफजन्य .

कफेन गुर्वी बहुला चिता च मांसोच्छ्रयै : शाल्मलिकण्टकामै : ॥

कफामुळे होणार्‍या जिव्हागत रोगात जीभ फार जाड , जड व वर सावरीच्या काटयासारखे मांसाचे मोड उगवलेली अशी दिसते .

अलासाचीं लक्षणें .

जिव्हातले य : श्वयथु : प्रगाढ : सोऽलाससंज्ञ : कफरक्तमूर्ति : ॥

जिव्हां स तु स्तम्भयति प्रवृद्धो मूले च जिव्हां भृशमेति पाकम्‌ ॥३२॥

जिव्हागत अलासरोगात कफरक्तामुळे जिभेच्या तळाशी भयंकर सूज उद्भवून ती बाढली असता जीभ अडते ( म्हणजे रोग्यास बोलू देत नाही ) व मुळाशी अत्यंत पिकते .

उपजिव्हा . लालाकर :

जिव्हाग्ररूप : श्वयथु : सजिव्हामुन्नम्य जात : कफरक्तमूर्ति : ॥

कण्डुयुत : सचोष : सा तूपजिव्हा कथिताभिषग्भि : ॥३३॥

जिभेच्या शेंडयासारखी सूज जिभेला वर उचलून उत्पन्न होते . तिच्या ठिकाणी कंड व दाह अतिशय असतो व तिजमुळे लाळ फार गळते . झाला उपजिव्हा म्हणतात .

येथे सर्व जिव्हागत रोग संपले . आता तालुगत नऊ रोगाविषयी खाली सांगावयाचे आहे ---

कुंठशुंडीचीं लक्षणें .

श्लेष्मासृग्भ्यां तालुमूलात्प्रवृद्धो

दीर्घ : शोथो घ्मातबस्तिप्रकाश : ॥

तृष्णाकासश्वासकृत्तं वदन्ति

व्याधिं वैद्या : कण्ठशुण्डीति नाम्ना ॥३४॥

कंठशुंडी अथवा पडजीभ ही संज्ञा वैद्य कफरक्तामुळे टाळूच्या मुळाशी फुगलेल्या वस्तीप्रमाणे जी सूज येऊन तिजमुळे श्वास , तहान व खोकला ही लक्षणे उत्पन्न होतात तिला कंठशुंडी असे वैद्य म्हणतात .

तुण्डीकेरीचीं लक्षणें .

शोथ : शूलस्तोददाहप्रपाकी

प्रागुक्ताभ्यां तुण्डिकेरी मता तु ।

पूर्वी सांगितलेल्याच ( कफ व रक्त या ) दोषांमुळे टाळुला सूज येऊन ती रानकापशीच्या बोंडाप्रमाणे पिकते व तिच्या ठिकाणी ठणक , टोचणी व आग हे प्रकार असतात . या तालुगत रोगास तुंडिकेरी म्हणतात .

अध्रुषाचीं लक्षणें .

शोथ : स्तब्धो लोहितो तालुदेशे

रक्ताज्ज्ञेय : सोऽध्रुषोरुक्‌ ज्वराढय : ॥३५॥

रक्तामुळे टाळूवर तांब्डी व ताठ अशी सूज येऊन तिला ठणका लागतो व रोग्यास ज्वर येतो . या प्रकारास अध्रुष म्हणतात .

कच्छपाचीं लक्षणें .

कूर्मोत्सन्नोऽवेदनोऽशीघ्रजन्मा

रोगो ज्ञेया : कच्छप : श्लेष्मणा वा ॥

कच्छप नावाचा जो तालुगत रोगाचा प्रकार आहे त्यात कफामुळे कासवाच्या पाठीसारखी वर आलेली अशी सूज टाळूवर येते , तिला ठणका नसतो व ती जलद वाढत नाही .

अर्युद .

पद्माकारं तालुमध्ये तु शोथं विद्याद्रक्तादर्बुदं प्रोक्तलिङ्गम्‌ ॥३६॥

तालुगत रोगापैखी अर्बुद रोग हा रक्तापासून उद्भवतो ; यात कमळाच्या वाटीसारखी सूज टाळूच्या मध्यभागी उत्पन्न होते व तिच्या ठिकाणी मागे अर्बुदनिदानांत सागितलेल्या रक्तार्बुदाची सर्व लक्षणे द्दष्टीस पडतात .

मांससंघात .

दुष्टं मांसं नीरूजं तालुमध्ये कफाच्छूनं मांससंघातमाहु : ॥

कफामुळे टाळूमधील मांस नासून वेदनारहित सूज येते , तिला मांससंघात असे नाव आहे .

तालुपुप्पुटाचीं लक्षणें .

नीरूक स्थायी कोलमात्र : कफात्‌ स्यात्‌

मेदोयुक्त : पुप्पुटस्तालुदेशे ॥३७॥

मेदमिश्रित अशा कफामुळे टाळूवर स्थिर , बोराएवढी व वेदना नसलेली अशी सूज उत्पन्न होते तिला तालुपुप्पुट असे म्हणतात .

तालुशोषाचीं लक्षणें .

शोषोऽत्यर्थं दीर्यते चापि तालु :

श्वासश्चोग्रस्तालुशोषोऽनिलाञ्च ॥

वायुमुळे टाळू अगदी कोरडी पडून तिला मेगा पडणे व रोग्यास भयंकर श्वाय लागणे ही लक्षणे तालुशोषाची जाणावी .

तालुपाक .

पित्तं कुर्यात्पाकमत्यर्थघोरं तालुन्येवं तालुपाकं वदन्ति ॥३८॥

तालुपाकांत पित्तप्रकोपामुळे टाळू अगदी पिकून जाऊन स्थिती भयंकर द्दष्टीस पडते . कंठगत रोग सतरा आहेत म्हणून मागे सांगितलेच आहे ; ते रोहिणीचे पाच प्रकार व इतर बारा प्रकार मिळून होत . त्या सर्वांची नावे व लक्षणे खाली क्रमब्बर दिली आहेत .

रोहिणीचीं संप्राप्ति .

गलेऽनिल : पित्तकफौ च मूर्छितौ

प्रदूच्या मांसं च तथैव शोणितम्‌‍ ॥

गलोपसंरोघकरैस्तथाङकरै -

र्निहन्त्यसून्‌ व्याधिरियं हि रोहिणी ॥३९॥

कंठामध्ये वात , पित्त व कफ हे त्रिदोष दुष्ट होऊन त्यांनी रक्त व मांस यांश दूषित केले असता त्या ठिकाणी मोड उत्मन्न होऊन त्यांच्या योगाने कंठ दाटून वातो . या रोगास रोहिणी म्हणतात . हा प्राण घेणारा रोग वातजन्य , पित्तजन्य , कफजन्य , सान्निपातिक व रक्तजन्य अशा पाच प्रकारांनी होतो .

वातजन्य रोहिणी .

जिव्हासमन्तात्‌ भृशवेदनास्तु मांसाङ्कुरा : कण्ठविरोधिनो ये ॥

सा रोहिणी वातकृता प्रदिष्टा वातात्मकोपद्रवगाढयुक्ता ॥४०॥

वातजन्य रोहिणीत जिभेच्या भोवताली अत्यंत वेदना करणारे असे मांसाचे मोड उत्पन्न होऊन त्यांच्या योगाने कंठाचा रोध होतो व रोग्याच्या ठिकाणी कंप , ताठपणा वगैरे वायूचे उपद्रव झालेले द्दष्टीस पडतात .

पित्तजन्य रोहिणी .

क्षिप्रोद्नमा क्षिप्रविदाहपाका

तीव्रज्वरा पित्तनिमित्तजाता ॥

पित्तजन्य रोहिणीत पित्तापासून होणरे मांसाचे मोड लवकर वाढतात व लवकर पिकतात आणि रोग्यास भयंकर ज्वर येतो .

कफजन्य रोहिणी .

स्नोतोनिरोधिन्यपि मन्दपाका

स्थिराङ्कुरा या कफसम्भवा सा ॥४१॥

कफजन्य रोहिणीत कफामुळे उद्भवणारे मांसाचे मोड कठिण असून ते गळयाच्या मार्गाचा रोध करतात व हळूहळू पिकतात .

सान्निपातिक रोहिणी .

गम्भीरपाकिन्यनिवार्यवीर्या

त्रिदोषलिङ्गा त्रितयोत्थिता सा ॥

सान्निपातिक रोहिणीचे मोड त्रिदोषांच्या लक्षणांनी युक्त असून ते पिकले असता पू फार खोल जातो . यावर औषधोपाय चालत नाही म्हणून हे तत्काल रोग्याची वाट लावतात .

रक्तजन्यरो हिणा .

स्फोटैश्चिता पित्तसमानलिङ्गा

साध्या प्रदिष्टा रुधिरात्मका तु ॥४२॥

रक्तजन्य रोहिणीचे मोड पित्तापासून होणार्‍या मोडाच्या सर्व लक्षणांनी युक्त असून शिवाय फोडांनी व्याप्त असतात .

कंठशालूक .

कोलास्थिमात्र : कफसम्भवो यो ग्रन्थिर्गले कण्टकशूकभूत : ॥

खर : स्थिर : शस्रनिपातसाध्यस्तं कण्ठशालूकमिति व्रुवन्ति ॥४३॥

कंठशालुकाची लक्षणे :--- कफामुळे कंठात बोराच्या बीएवढी गाठ उद्भवते , तिचवर बारीक बारीक काटे असतात व ती कठिण आणि खरखरीत असते ; या रोगावर शस्रचिकिस्सा केली असता हा साध्य होतो .

अधि - जिव्हा .

जिव्होग्ररूप : श्वयथु : कफात्तु जिव्होपरिष्टादपि रक्तमिश्रात्‌ ॥

ज्ञेजोऽधिजिव्हा : खलु रोग एष विवर्जयेदागतपाकमेनम्‌ ॥४४॥

अधिजिव्हाची लक्षणे :--- रक्तमिश्रित कफामुळे जिभेच्या टोकासारखी लाल वर्णाची जिभेवर सूज येते व ती पिकली म्हणजे असाध्य होते .

वलय .

बलास एवायतमुन्नतं च ग्रन्थिं करोत्यन्नगतिं निवार्य ॥

तं सर्वथैवा प्रतिवार्यवीर्यं विवर्जनीयं वलयं वदन्ति ॥४५॥

वलयाची लक्षणे :--- कफामुळे लांब व उंच अशी गाठ घशात उत्पन्न होऊन तिच्यामुळे खाल्लेले अन्न घशात उतरत नाही , या रोगास आपल्यास घटसर्प म्हणतात व हा असाध्य आहे .

बलास .

गले तु शोथं कुरुत : प्रवृद्धौ श्लेष्मानिलौ श्वासरुजोपपन्नम्‌ ।

मर्मच्छिदं दुस्तरमेनमाहुर्बलाससंज्ञं निपुणा विकारम्‌ ॥४६॥

बलासाची लक्षणें :--- कफ व वायु हे दोष प्रकोप पावून गळयात सूज उत्पन्न करतात व त्या सुजेमुळे श्वास लागतो , घसा दुखतो व त्याचप्रमाणे मर्मस्थानाचा भेद होतो , हा रोगही बरा होणे कठीण असते असे तज्ज्ञ म्हणतात .

एकवृंद .

वृत्तोन्नतोऽन्त : श्वयथु : सदाह : सकण्डुरोऽपाक्यमृदुर्गुरूश्च ॥

नाम्नैकवृन्द : परिकीर्तितोऽसौ व्याधिर्वलास : क्षतजप्रसूत : ॥

एकवृंदाची लक्षणे :--- कफ व रक्त यामुळे गळयामध्ये वाटोळी वा उंच अशी सूज उत्पन्न होते , ती नरम व जाड अशी असून तिच्या ठिकाणी किंचित्‌ आग असते , कैड सुटते व ती पिकत नाही .

वृंद .

समुन्नतं वृत्तममन्ददाहं तीव्रज्वरं वृन्दमुदाहरन्ति ॥

तं चापि पित्तक्षतजप्रकोपात्‌ विद्यात्‌ सतोदं पवनात्मकं तु ॥४८॥

वृंदाची लक्षणे :--- पित्त व रक्त यांच्या योगाने उंच व वाटोळी अशी सूज गळ्यामध्ये उत्पन्न होते , तिच्या ठिकाणी भयंकर दाह असतो व तिच्यामुळे तीव्र ज्वर येतो ; तसेच तिच्या ठिकाणी वायूचा संबंध असला तर तिला टोचणी लागते .

शतघ्नी .

वर्तिर्घना कण्ठनिरोधिनी या चिताऽतिमात्रं पिशितप्ररोहै : ॥

अनेकरुक प्राणहरी त्रिदोषात्‌ ज्ञेया शतघ्नी च शतघ्निरूपा ॥४९॥

शतघ्नीची लक्षणे :--- लांब काटेरी अशा शतघ्नीनामक शस्त्राप्रमाणे गळ्यामध्ये लांबट सूज येऊन तिजवर अनेक मांसाचे मोड उद्भवतात व त्यामुळे गळा अगदी चोंदला जातो . ( शिवाय टोचणी . आग व कंड वगैरे दुसरे पीडादायक प्रकारही तिजमुळे उत्पन्न होतात व शेवटी ती रोग्याचा प्राण घेते .)

गलायु .

ग्रन्थिर्गले त्वामलकास्थिमात्र : स्थिरोऽतिरुग्य : कफरक्तमूर्ति : ॥

संलक्ष्यते सक्तमिवाशनं च स शस्त्रसाध्यस्तु गलायुसंज्ञं : ॥५०॥

गलायूची लक्षणे :--- कफ व रक्त यांच्या योगाने गळ्यात आवळ्याच्या बीएवढी , कठीण व फार वेदना उत्पन्न करणारी अशी गाठ उत्पन्न होऊन तिजमुळे खाल्लेले अन्न घशात अडकून राहिल्यासारखे वाटते . या गाठीवर शस्त्रचिकित्सा केल्याने ही नाहीशी होते .

गल - विद्रधि .

सर्वं गलं ब्याप्य समुत्थितो य : शोथो रुज : सन्ति च यत्र सर्वा : ॥

स सर्वदोषैर्गलविद्रधिस्तु तस्यैव तुल्य : खलु सर्वजस्य ॥५१॥

गलविद्रधीची लक्षणे :--- सर्व गळाभर सूज उत्पन्न होऊन तिच्या ठिकाणी मागे विद्रधीनिदानात सांगितलेल्या सान्तिपातिक विद्रधीप्रमाणे सर्व प्रकारच्या वेदना असलेल्या द्दष्टीस पडतात .

गलौघ .

शोथो महानन्नजलावरोधी तीव्रज्वरो वायुगतेर्निहन्ता ॥

कफेन जातो रुधिरान्वितेन गले गलौघ : परिकीर्त्यतेऽसौ ॥५२॥

गलौघाची लक्षणे :--- रक्तमिश्रित कफामुळे गळयात मोठी सूज उत्पन्न होऊन तिच्या योगाने उदान वायूचा अवरोध होतो व अन्न - पाणी घशाखाली उतरण्याचे बंद होते .

स्वरघ्न .

यस्ताभ्यमान : श्वसिति प्रसक्तं भिन्नस्वर : शुष्कविमुक्तकण्ठ : ॥

ककोपदिग्धेष्वनिलायनेषु ज्ञेय : स रोग : श्वसनात्‌ स्वरघ्न : ॥

स्वरघ्नाची लक्षणे :--- हा रोग वातजन्य असून यांत गळयांतील वायु वर येण्याचे मार्ग कफामुळे भरले जातात ; तसेच रोग्याचा आवाज बसतो , घसा कोरडा पडतो , खाल्लेले त्यास गिळता येत नाही , त्याच्या डोळयांपुढे अंधेर्‍या येतात व त्यास श्वास लागतो .

मांसतान ,

प्रतानवान्‌ य : श्वयथु : सुकष्टो गलोपरोधं कुरुते क्रमेण ॥

स मांसतान : कथितोऽवलम्बी प्राणप्रणुत्सर्वकृतो विकार : ॥५४॥

मांसतानाची लक्षणे :--- वात , पित्त व कफ या तिन्ही दोषांच्या प्रकोपाने गळयामध्ये सूज उत्पन्न होऊन व ती हळूहळू सर्व गळाभर पसरून त्याचा अवरोध करते ; तिच्या ठिकाणी अत्यंत . वेदना असतात व ती रोग्याचा प्राण घेते .

विदारी .

सदाहतोदं श्वयथु : सुतीव्रमन्तर्गले पुतिविशीर्णमांसम्‌ ॥

पित्तेन विद्याद्वदने विदारा पार्श्वे विशेषात्स तु येन शेते ॥५५॥

विदारीची लक्षणे :--- पित्तप्रकोपामुळे गळयामध्ये सूज येते , तिच्या ठिकाणी आग व सुई टोचल्यासारखी वेदना असते आणि तिच्यातून घाण असे मांस सडून गळते . हा विदारी रोग रोग्यास ज्या बाजूवर निजण्याची सवय झालेली असते त्याच बाजूला गळयातील भागास विशेषेकरून होतो .

येथपर्यंत तोंडाच्या निरनिराळया अवयवांसंबंधी होणार्‍या पृथक्‌ पृथक्‌ रोगांची लक्षणे झाली . आता तोंडाच्या सर्व भागावर उद्भवणार्‍या सर्वसर रोगांविषयी सांगतो . या रोगास आपल्यांत तोंड येणे ( मुखपाक ) अथवा अगरू म्हणतात व हा तिन्ही दोषांपासून पृथक्‌ पृथक्‌ अशा तीन प्रकारांनी होतो .

सर्वसराचे सर्व प्रकार .

स्फोटै : सतोदैर्वदनं समन्तात्‌ यस्याचितं सर्वसर : स वातात्‌ ॥

रक्तै : सदाहै : पिडकै : सपीतैर्यस्याचितं चापि स पित्तकोपात्‌ ॥

अवेदनै : कण्डुयुतै : सवणैंर्यस्याचितं चापि स वै कफेन ॥५६॥

वातजन्य सर्वसरांत वातप्रकोपाने तोंडात सर्वत्र फोड येऊन त्यास टोचणी असते . पित्तजन्यांत पित्तामुळे तोंडात सर्वत्र लाल व पिवळे असे फोड य़ेऊन त्यांची आग होते आणि कफजन्यांत वेदन कमी पण कंड असलेले आणि त्वचेच्या वर्णाचे असे फोड कफापासून तोंडात सर्वत्र उदभवतात .

सर्व प्रकारच्या मुखरोगांपैकीं असाध्य असे मुखरोग .

ओष्ठप्रकोपे वर्ज्यास्तु मांसरक्तत्रिदोषजा : ॥

दन्तमूलेषु वर्जै च त्रिलिङ्गगतिसौषिरौ ॥५७॥

दन्तेषु च न सिध्यन्ति श्यावदालनभञ्जना : ॥

जिव्हातलेष्वलासश्च तालव्येद्यर्बुदं तथा ॥५८॥

स्वरघ्नो वलयो वृन्दो बलासश्च विदारिका ॥

गलौघो मांसतानश्च शतघ्नी रोहिणीगले ॥५९॥

असाध्या : कीर्तिता होते रोगा नव दशैव तु ॥

तेषु चापि क्रियां वैद्य : प्रत्याख्याय समाचरेत्‌ ॥६०॥

सर्व प्रकारच्या मुखरोगापैकी मांसजन्य , रक्तजन्य व सान्निपातिक हे तीन ओष्ठरोग , त्रिदोषजन्य , नाडीव्रण आणि सौषिर हे तीन दंतमूलरोग ; दालन , श्याव आणि भंजनक हे तीन दंतरोग ; अलासनामक जिव्हागतरोग ; व त्याचप्रमाणे अर्बुद नावाचा ताळूरोग आणि स्वरघ्न , वलय , वृंद , बलास , विदारी , गलौढ , मांसतान , शतघ्नी आणि रोहिणी हे कंठमतरोग , याप्रमाणे हे एकंदर एकोणीस रोग असाध्य आहेत . यांवर चिकित्सा करण्याचा वैद्यांवर प्रसंग आल्यास त्याने रोग्यास ‘ मरण हे ठरलेलेच आहे . तरी पण औषध घेऊन जर कदाचित ते टाळता आल्यास उपाय करून बघतो ’ असे सांगून औषध द्यावे म्हणजे त्यावर अभिश्राप येण्याचे भय नाही .

N/A

References : N/A
Last Updated : June 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP