संस्कृत सूची|शास्त्रः|आयुर्वेदः|सार्थ माधवनिदान|
शीतपित्तनिदान

माधवनिदान - शीतपित्तनिदान

" शरिरेंद्रिय-सर्वात्मा संयोगधारी जीवितम् " अशी जीवनाची आयुर्वेदीय, व्यापक व्याख्या आहे.


शीतपित्त अथवा उदर्दनिदान

संप्राप्ति .

शीतमारुतसंस्पर्शात्प्रदुष्टौ कफमरुतौ ॥

पित्तेन सह सम्भूय बहिरन्तार्विसर्पत : ॥१॥

रोग्यास गार वारा लागला असता वात व कफ हे दोन दोष प्रकुपित होऊन पित्ताशी मिळतात व त्याच्या शरीराच्या अंतर्भागात रक्तावर व बाहेर त्वचेवर पसरतात . यास शीतपित्त अथवा उदर्द ( पित्त उठणे ) असे म्हणतात .

पूर्वरूप . पिपासाऽरुविहल्लासदेहसादाङ्गगारवैम्‌ ॥

रक्तलोचनता तेषां पूर्वरूपस्य लक्षणम्‌ ॥२॥

शीतपित्त व्हावयाचे असता तहान , अरुचि , तोंडास पाणी सुटणे , अंग गळून जाणे व डोळयास लाली येणे या प्रकारची लक्षणे अगोदर द्दष्टीस पडतात .

लक्षणें .

वरटीदष्टसंस्थान : शोथ : सज्जायते वहि : ॥

सकण्डूस्तोदबहुलश्छर्दिज्वरविदाहवान ॥३॥

उदर्दभिति तं विद्याच्छीतपित्तमथापरे ॥

वाताधिकं शीतपित्तमुदर्दस्तु कफाधिक : ॥४॥

गांधीलमाशी डसल्याप्रमाणे त्वचेवर सूज येणे , कंड सुटणे , वेदना होणे , ओकारी येणे व त्याचप्रमाणे ज्वर आणि दाह होणे ही लक्षणे पाहून या रोगास आपल्यात पित्त उठले असे म्हणतात , व वैद्यकांत त्यास कोणी शीतपित्त व कोणी उदर्द असे म्हणतात . तरी शीतपित्तांत वायूचे प्राधान्य असते व उदर्दांत कफाचे असते . हा या दोहोंतील ठळक भेद नीट लक्षात ठेवावा , ( व त्याचप्रमाणे यांत कंड कफापासून सुटते , वेदना वातापासून उद्भवतात व वांति , संताप आणि दाह हे प्रकार पित्तामुळे होतात असा नियम जाणावा .)

उदर्दात्ता अन्य प्रकार .

सोत्सङ्गैश्च सरागैश्च कण्डूमद्भिश्च मण्डलै : ॥

शैशिर : कफजो व्याधिरूदर्द : परिकीर्तित : ॥५॥

कधी कधी थंडीमुळे कफप्रकोप होऊन रोग्याच्या अंगावर मध्ये खोल व कडेला उंच अशा प्रकारची तांबडी मंडले उद्भवतात तेव्हा त्यासहि उदर्द असे समजून वैद्य त्याची निकित्सा करतात .

कोठ व उत्कोठ म्हणजे काय ?

असम्यग्वमनोर्दार्णपित्तश्लेष्मान्ननिग्रहै : ॥

मण्डलानि सकण्डूनि रागवन्ति बहूनि च ॥

उत्कोठ : सानुबन्धश्च कोठ इत्यभिधीयते ॥६॥

रोग्याने वांती होण्याकरता घेतलेले औषध जर चांगले लागू झाले नाही तर त्यामुळे कफ व पित्त हे दोन दोष व आहार घेण्याचा इच्छा हे वेग बंद केले असता त्याच्या अंगावर तांबडी व खाजणारी अशी पुष्कल मंडले उठतात . ती क्षणात उठून नाहीशी होणे या प्रकारास कोठ म्हणतात ; व नाहीशी होऊन पुन : उद्‌भवणे या प्रकारास उत्कोठ म्हणतात .

N/A

References : N/A
Last Updated : June 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP