संस्कृत सूची|शास्त्रः|आयुर्वेदः|सार्थ माधवनिदान|
श्लीपदरोगनिदान

माधवनिदान - श्लीपदरोगनिदान

" शरिरेंद्रिय-सर्वात्मा संयोगधारी जीवितम् " अशी जीवनाची आयुर्वेदीय, व्यापक व्याख्या आहे.


श्लीपद रोग .

य : सज्वरो वङक्षणजो भृशार्ति : शोथो नृणां पादगत : क्रमेण ॥

तच्छ्रलीपदं स्यात्करकर्णनेत्रशिश्नौष्ठनासास्वपि केचिदाहु : ॥१॥

ज्वर येऊन चांगडात प्रथम उत्पन्न झालेली व मग हळूहळू पायावर पसरणारी व अतिशय पीडा उत्पन्न करणारी अशी जै सूज असते तिला श्लीपद रोग ( वारूळ ) असे म्हणतात . हे श्लीपद कित्येक वैद्य म्हणताता . त्याप्रमाणे कधी कधी रोग्याचे हात , कान , डोळे , ओठ व तसेच शिश्न व कान यावरहि उद्भवते . ( याचे तिन्ही दोषांपासून पृथक्‌ पृथक्‌ होणारे तीन व सान्निपातिक एक असे चार प्रकार सांगितलेले आहेत .)

सर्व प्रकारच्या वातजं कृष्णरूक्षं च स्फुटितं तीव्रवेदनम्‌ ॥

अनिमित्तरूजं तस्य बहुशो ज्वर एव च ॥२॥

पित्तजं पीतसंकाशं दाहज्वरयुतं मृदु ॥

श्लैष्मिकं स्निग्धवर्णं च श्वेतं पाण्डुगुरूस्थिरम्‌ ॥३॥

वल्मीकमिव सज्जातं कण्टकैरूपचीयते : ॥

सर्वात्मकं महत्तच्च वर्जनीयं विशेषत : ॥४॥

वातजन्य श्लीपद रोगात श्लीपद काळे , भेगा पडलेले , खरखरीत , कारणावाचून दुखणारे च तीव्र वेदना उत्पन्न करणारे असे असून हे झाले असता रोग्यास बहुधा ज्वर येतो ; पित्तजन्यातील ( श्लीपद ) पिवळे , दाहयुक्त व मृदू असून त्यामुळेही रोगी ज्वरयुक्त असतो . कफजन्यात ते ( श्लीपद ) पांढरे , तुकतुकीत , जड व कठीण असे असते ; आणि सान्निपातिक ( श्लीपद ) वारुळासारखे ऊंच वाढलेले , खालून काटयांनी व्यापलेले व तिन्ही दोषांच्या ( आता सांगितलेल्या ) लक्षणांनी युक्त व मोठे असे द्दष्टीस पडते . सर्व श्लीपदात विशेषेकरून हे असाध्य समजून वैद्यांनी याची चिकित्सा करू नये .

पुराणोदकभूयिष्ठा : सर्वर्तुषु च शीतला : ॥

ये देशास्तेषु जायन्ते श्लीपदानि विशेषत : ॥५॥

त्रीण्यप्येतानि जानीयाच्छलीपदानि कफोच्छ्रयात्‌ ॥

गुरुत्वं च महत्वं च यस्मान्नास्ति विना कफात्‌ ॥६॥

वर सांगितलेले , सर्व प्रकारचे श्लीपद रोग जेथील जमिनीवर खळगे असल्यामुळे पावसाचे पाणी नेहमी साचून राहते व त्यामुळे सर्व ऋतूमध्ये ज्यांतील हवा थंड असते अशा प्रदेशातील लोकांस बहुतकरून होतात व त्याच्या त्या सर्व प्रकारात ( जरी वर सर्वांची लक्षणे निरनिराळी सांगितलेली आहेत तरी ) कफधिक्य असलेले द्दष्टीस पडते . कारण , जडपणा व मोठेपणा हे गुण कफावाचून ( रोगाचे ठिकणी ) उत्पन्नर होत नसतात .

असाध्य श्लीपदरोग .

यच्छ्‌लेष्मलाहारविहारजातं पुंस : प्रकृत्या च कफात्मकस्य ॥

सास्नावमत्युन्नतसर्वलिङ्गं सकण्डुरं श्लेष्मयुतं विवर्ज्यम्‌ ॥७॥

कफकारख आहारविहारामुळे जे श्लीपद कफप्रकृतीच्या रोग्याच्या ठिकाणी उत्पन्न होते ; तसेच कफस्त्राव व तीव्र कडू यांनी युक्त व खूप उंच असे असून ज्यांत ज्या दोषामुळे ते झाले असते . त्याची लक्षणे अतिप्रवल असतात असे जे श्लीपद तें असाध्य म्हणून चिकित्सा करण्यास वर्ज्य आहे .

N/A

References : N/A
Last Updated : June 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP