संस्कृत सूची|शास्त्रः|आयुर्वेदः|सार्थ माधवनिदान|
गंडमालानिदान

माधवनिदान - गंडमालानिदान

" शरिरेंद्रिय-सर्वात्मा संयोगधारी जीवितम् " अशी जीवनाची आयुर्वेदीय, व्यापक व्याख्या आहे.


गंडमालानिदान

गंडमालानिदान.
कर्करधुकोलामलकप्रमाणै: कक्षांसमन्यागलवङक्षणेषु ॥
मेद:कफाभ्यां चिरमन्दपाकै: स्याद्नण्डमाला बहुभिस्तु गण्डै: ॥

रोगाच्या शरीरांत मेद आणि कफ हे वाढले असता त्यापासून त्याची मान, गळा, खांदे, काखा व जांगाडे यांच्या ठिकाणी बोर अथवा आवळा यांच्या एवढया ज्या लहान मोठया गांठी उत्पन्न होतात व फार दिवसांनी हळूहळू पिकतात त्या गांठींच्या समूहाला गंडमाला असे म्हणतात.

लक्षणें.
ते ग्रन्यय: केचिदवाप्तपाका: स्नवन्ति नश्यन्ति भवन्ति चान्ये ॥
कालानुबन्धं चिरमादधाति सैवापचीति प्रवदन्ति केचित्‌ ॥२॥
साध्या स्मृता पीनसपार्श्वशूलकासज्वरच्छर्दियुता न साध्या ॥३॥

त्यांपैकी काही गाठी पिकतात, काही स्रवतात, काहीं नाहीशा होतात व काही नव्या उद्‌भवतात व त्यापासून रोग्यास पुष्कळ दिवसपर्यंत पीडा सोसावी लागते. हिलाच कोणी अपची म्हणतात व ही बहुतकरून साध्य असते. पण जेव्हां ती पीनस, पार्श्चशूल, कस, ज्वर व छर्दि या उपद्रवांनी युक्त होते तेव्हा तिला असाध्यत्व येते.

N/A

References : N/A
Last Updated : June 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP