संस्कृत सूची|शास्त्रः|आयुर्वेदः|सार्थ माधवनिदान|
अनाहरोगनिदान

माधवनिदान - अनाहरोगनिदान

" शरिरेंद्रिय-सर्वात्मा संयोगधारी जीवितम् " अशी जीवनाची आयुर्वेदीय, व्यापक व्याख्या आहे.


 आनाहरोगाचीं कारणें. प्रकार व लक्षणें.
आमं शकुद्धा निचितं क्रमेण भूयो विबद्धं विगुणानिलेन ॥
प्रवर्तमानं न यथास्वमेनं विकारमानाहमुदाहरन्ति ॥१॥
तस्मिन्भवत्यामसमुद्भवे तु तृष्णाप्रतिश्यायशिरोविदाह: ॥
आमाशये शूलमथो गुरूत्वं ह्रत्स्तम्भउद्नारविघातनं च ॥२॥
स्तम्भ: कटीपृष्ठपुरीषमूत्रे शूलेऽथ मूर्च्छा शकृतश्च छर्दि: ॥
श्वासश्च पक्वाशयजे भवन्ति तथाऽलसोक्तानि च लक्षणानि ॥३॥

रोग्याच्या शरीरात आम आणि मल क्रमाने सांचत गेले व दूषित वायूमुळे त्यांचा अवरोध होऊन त्यांची जशी प्रवृत्ती व्हावयास पाहिजे तशी झाली नाही, तर त्यांमुळे जो रोग होतो त्यास आनाह असे म्हणतात. याचे प्रकार तोन आहेत ते :--- पहिला आमापासून उत्पन्न होतो. त्यांत आमाशयात वेदना, जडत्व, तहान, पडसे. श्वास, शूल, मूर्च्छा, अंग जड होणे, ढेकर न येणे, यांतीवाटे मल पडणे, डोक्याचा दाह होणे, हृदय, कंबर व पाठ ताठणे आणि मलमूत्रांचा अवष्टंभ होणे ही लक्षणे उत्पन्न होतात व दुसरा पक्वाशयांत उद्भवतो. त्यात अलसकांमुळे (पोट फुगणे, मलावरोध होणे वगैरे) होणारे सर्व विकार द्दष्टीस पडतात.

N/A

References : N/A
Last Updated : June 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP