मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद पूर्वार्ध|
कर्णवेध

तृतीयपरिच्छेद - कर्णवेध

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


आतां कर्णवेध सांगतो.
अथकर्णवेधः मदनरत्नेवसिष्ठश्रीधरौ मासेषष्ठेसप्तमेवाष्टमेवावेध्यौकर्णौद्वादशेषोडशेह्नि मध्ये नाह्नः पूर्वभागेनरात्रौनक्षत्रेद्वेद्वेतिथीवर्जयित्वा अत्रजन्ममासोवर्ज्यः ज्योतिर्निबंधेगर्गः मासेषष्ठेसप्तमेवाप्यष्टमेमासिवत्सरे कर्णवेधंप्रशंसंतिपुष्ट्यायुः श्रीविवृद्धये मदनरत्ने प्रथमेसप्तमेमासिअष्टमेदशमेथवा द्वादशेचतथाकुर्यात्कर्णवेधंशुभावहं हेमाद्रौव्यासः कार्तिकेपौषमासेवाचैत्रेवाफाल्गुनेपिवा कर्णवेधंप्रशंसंतिशुक्लपक्षेशुभेदिने श्रीधरः हरिहयकरचित्रासौम्यपौष्णोत्तरार्यादितिवसुषुघटालीसिंहवर्जेसुलग्ने शशिगुरुबुधकाव्यानांदिनेपर्वरिक्तारहिततिथिषुशुद्धेनैधनेकर्णवेधः मदनरत्नेबृहस्पतिः द्वितीयादशमीषष्ठीसप्तमीचत्रयोदशी द्वादशीपंचमीशस्तातृतीयाकर्णवेधने सौवर्णीराजपुत्रस्यराजतीविप्रवैश्ययोः शूद्रस्यचायसीसूचीमध्यमाष्टांगुलात्मिका हेमाद्रौदेवलः कर्णरंध्रेरवेश्छायानविशेदग्रजन्मनः तंदृष्ट्वाविलयंयांतिपुण्यौघाश्चपुरातनाः शंखः अंगुष्ठमात्रसुषिरौकर्णौनभवतोयदि तस्मैश्राद्धंनदातव्यंदत्तंचेदासुरंभवेत् ।

मदनरत्नांत - वसिष्ठ व श्रीधर - “ जन्मदिवसापासून बाराव्या किंवा सोळाव्या दिवशीं बालकाचे कान टोंचावें. अथवा सहाव्या, सातव्या, किंवा आठव्या, मासांत कान टोंचावे. दिवसाच्या मध्यभागीं, पूर्वभागीं व रात्रीं कान टोंचूं नयेत. कर्णवेधास नक्षत्रवृद्धि व दिनवृद्धि वर्ज्य करावी. ” कर्णवेधाविषयीं जन्ममास वर्ज्य करावा. ज्योतिर्निबंधांत - गर्ग - “ सहाव्या, सातव्या किंवा आठव्या मासांत अथवा बाराव्या मासांत कर्णवेध प्रशस्त आहे. त्यापासून पुष्टि, आयुष्य, श्री यांची वृद्धि होते. ” मदनरत्नांत - “ पहिला, सातवा, आठवा, दहावा किंवा बारावा ह्या मासांत कर्णवेध करावा, तो शुभ होय. ’, हेमाद्रींत - व्यास - “ कार्तिक, पौष, चैत्र, अथवा फाल्गुन या मासांत शुक्लपक्षांत शुभदिवशीं कर्णवेध प्रशस्त होय. ” ‘ कर्णवेध विषमवर्षी करावा, समवर्षीं करुं नये. त्यांत प्रथमवर्षीं कर्तव्य असतां वर सांगितलेले मास घ्यावे. तृतीयादिवर्षीं कर्तव्य असतां हे कार्तिकादिक मास समजावे, असें धर्मसिंधुसारांत आहे. ’ श्रीधर - “ श्रवण, अश्विनी, हस्त, चित्रा ’ मृग, रेवती, तीन उत्तरा, पुष्य, पुनर्वसु, धनिष्ठा ह्या नक्षत्रांवर; चंद्र, गुरु, बुध, शुक्र ह्या वारीं; अमा, पूर्णिमा, चतुर्थी, नवमी, चतुर्दशी ह्या तिथि वर्ज्य करुन अन्य तिथींचे ठायीं; कुंभ, वृश्चिक, सिंह हीं लग्नें वर्ज्य करुन अन्य लग्नीं; अष्टमस्थान शुद्ध असतां कर्णवेध शुभ होय. ” मदनरत्नांत - बृहस्पति - “ द्वितीया, दशमी, षष्ठी, सप्तमी, त्रयोदशी, द्वादशी, पंचमी आणि तृतीया, ह्या तिथि कर्णवेधाविषयीं शुभ होत. बालकाच्या आठ अंगुळें लांबीची सूची ( कर्णवेधाची तार ) असावीं. ती अशी - राजपुत्राच्या कर्णवेधाविषयीं सुवर्णाची; ब्राह्मण, वैश्य यांना रुप्याची; शूद्राला लोखंडाची, याप्रमाणें तार करावी. ” हेमाद्रींत - देवल - “ ज्या ब्राह्मणाच्या कानाच्या छिद्रांतून सूर्याचे किरण बाहेर पडत नाहींत त्या ब्राह्मणाला पाहिलें असतां पाहणाराचे पुरातन पुण्यसमुदाय नाश पावतात. अर्थात्‍ मोठें छिद्र वाढवावें. ” शंख - “ ज्याचे कर्ण, अंगुष्ठमात्र छिद्र नाहींत अशा ब्राह्मणास श्राद्धास सांगूं नये. सांगितलें असतां तें श्राद्ध आसुर ( असुरांनीं भक्षित ) होतें.”

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP