मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद पूर्वार्ध|
प्रकीर्णकनिर्णय

तृतीयपरिच्छेद - प्रकीर्णकनिर्णय

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


आतां प्रकीर्णकनिर्णय सांगतो . -

अथप्रकीर्णकनिर्णयः श्रीरामकृष्णतनयः कमलाकरसंज्ञितः निरुप्यतिथिकृत्यंतुप्रकीर्णवक्तुमुद्यतः १

श्रीरामकृष्णभट्टाचा पुत्र कमलाकरभट्ट पूर्वीं ( द्वितीय परिच्छेदांत ) तिथिकृत्य निरुपण करुन प्रकीर्णक ( मिश्रप्रकरण ) सांगण्याकरितां उद्युक्त ( उत्कंठित ) झालेला आहे .

तत्रादौसंस्कारेषुगर्भाधानम् ‍ तत्रप्रथमरजोदर्शने दुष्टमासग्रहणसंक्रमादिफलंतत्रशांत्यादिचपितृकृतंभट्टकृतप्रयोगरत्नेज्ञेयम् ‍ किंचित्तूच्यते मदनरत्नेनारदः अमारिक्ताष्टमीषष्ठीद्वादशीप्रतिपत्स्वपि परिघस्यतुपूर्वार्धे व्यतीपातेचवैधृतौ संध्यासूपप्लवेविष्ट्यामशुभंप्रथमार्तवं रोगीपतिव्रतादुः रवीपुत्रिणीभोगभोगिनी पतिव्रताक्लेश भागीसूर्यवारादिषुक्रमात् ‍ वैधव्यंसुतलाभश्चमैत्रंशत्रुविवर्धनम् ‍ मित्रलाभः शत्रुवृद्धिः कुलर्द्धिर्बंधुनाशनम् ‍ मरणंवंशवृद्धिश्चनिराहारः कुलक्षयः तेजश्चसुतनाशश्चकुलहानिस्तिथिक्रमात् ‍ गर्गः सुभगाचैवदुः शीलावंध्यापुत्रसमन्विता धर्मयुक्ताव्रतघ्नीचपरसंतानमोदिनी सुपुत्राचैवदुः पुत्रापितृवेश्मरतासदा दीनाप्रजावतीचैवपुत्राढ्याचित्रकारिणी साध्वीपतिप्रियानित्यंसुपुत्राकष्टचारिणी स्वकर्मनिरताहिंस्रापुण्यपुत्रादिसंयुता नित्यंधनचयासक्तापुत्रधान्यसमन्विता मूर्खाचाज्ञापुण्यवतीदस्त्रर्क्षादेः क्रमात्फलम् ‍ नारदः कुलीरवृषचापांत्यनृयुक्कन्यातुलाघटाः राशयः शुभदाज्ञेयानारीणांप्रथमार्तवे गर्गः सुभगाश्वेतवस्त्रास्याद्दृढवस्त्रापतिव्रता क्षौमवस्त्राक्षितीशास्यान्नववस्नासुखान्विता दुर्भगाजीर्णवस्त्रास्याद्रोगिणीरक्तवाससा नीलांबरधरानारीपुष्पिताविधवाततः वस्त्रेस्युर्विषमारक्तबिंदवः पुत्रमाप्नुयात् ‍ समाश्चेत्कन्यकाश्चेतिफलंस्यात्प्रथमार्तवे ।

त्यांत आधीं संस्कार सांगावयाचे त्या संस्कारांपैकीं गर्भाधानसंस्कार सांगतों - त्या गर्भाधानसंस्कारांत प्रथम रजोदर्शनाचे ठायीं दुष्टमास , ग्रहण , संक्रांति इत्यादिकांचें फल व त्याविषयीं शांति वगैरे करणें तो सर्व निर्णय आमच्या वडिलांनीं केलेला आहे तो नारायणभट्टांनीं केलेल्या प्रयोगरत्नांतून जाणावा . थोडेंसें येथें सांगतों - मदनरत्नांत नारद - " अमावास्या , रिक्ता ( ४।९।१४ ) तिथि , अष्टमी , षष्ठी , द्वादशी , प्रतिपदा , परिघयोगाचा पूर्वार्ध , व्यतीपात , वैधृति , संध्यासमय , उपद्रव , विष्टि , यांचे ठायीं प्रथम रजोदर्शन झालें असतां तें अशुभ होय . रविवारीं रोगी , सोमवारीं पतिव्रता , मंगळवारीं दुःखी , बुधवारीं पुत्रवती , गुरुवारीं भोग भोगणारी , शुक्रवारीं पतिव्रता , शनिवारीं क्लेश भोगणारी याप्रमाणें वारांचे ठायीं प्रथम रजोदर्शनाचें फल समजावें . प्रतिपदेस वैधव्य , द्वितीयेस पुत्रलाभ , तृतीयेस मित्रत्व , चतुर्थीस शत्रुवृद्धि , पंचमीस मित्रलाभ , षष्ठीस शत्रुवृद्धि , सप्तमीस कुलवृद्धि , अष्टमीस बंधुनाश , नवमीस मरण , दशमीस वंशवृद्धि , एकादशीस उपवास , द्वादशीस कुलक्षय , त्रयोदशीस तेज , चतुर्दशीस पुत्रनाश , पंचदशीस ( अमावास्या पौर्णिमेस ) कुलहानि याप्रमाणें प्रथमरजोदर्शनाचे ठायीं तिथिफलें समजावीं . " गर्ग - " अश्विनीस सुभगा , भरणीस दुःशीला , कृत्तिकेस वंध्या , रोहिणीस पुत्रवती , मृगास धर्मयुक्त , आर्द्रास व्रतघातकी , पुनर्वसूस परसंतानानें हर्ष पावणारी , पुष्यास सुपुत्रवती , आश्लेषांस दुष्टपुत्रवती , मघांस पितृगृहीं सदा राहणारी , पूर्वांस दीना , उत्तरांस प्रजायुक्त , हस्तास बहुत पुत्रयुक्त , चित्रांस चित्रकरणारी , स्वातीस साध्वी , विशाखांस नित्य पतिप्रिया , अनुराधांस सुपुत्रा , ज्येष्ठांस कष्ट करणारी , मूळास आपल्या कर्माविषयीं तत्पर , पूर्वाषाढांस हिंसा करणारी , उत्तराषाढांत पुण्यकारक पुत्रादिकांनीं युक्त , श्रवणास सतत द्रव्यसंचय करणारी , धनिष्ठांस आसक्त , शततारकांस पुत्रधान्ययुक्त , पूर्वाभाद्रपदांस मूर्ख , उत्तराभाद्रपदांस ज्ञानशील , रेवतीस पुण्यवती याप्रमाणें प्रथम रजोदर्शनाविषयीं नक्षत्रांचें फल समजावें . " नारद - " कर्क , वृषभ , धनु , मीन , मिथुन , कन्या , तूळ , कुंभ , ह्या राशी स्त्रियांच्या प्रथम रजोदर्शनाविषयीं शुभ आहेत . " गर्ग - " शुभवस्त्र परिधान केलेलें असतां प्रथम रजोदर्शन झालें तर सुभगा होते . दृढवस्त्रावर झालें तर पतिव्रता होते . पाटाव नेसलेली असून झालें तर पृथिवीपति होते . नव्या वस्त्रावर झालें तर सुखयुक्त होते . जीर्णवस्त्रावर रजोदर्शन प्रथम झालें तर दुर्भगा ( दुर्भाग्यवती ) होते . रक्तवस्त्रावर प्रथम रजोदर्शन असतां रोगिणी होते . नीलवस्त्रावर प्रथम रजोदर्शन झालें तर ती स्त्री विधवा होते . वस्त्रावर आर्तवाचे बिंदु विषम पडले असतां पुत्र होतो . आणि सम बिंदु पडले असतां कन्या होते . याप्रमाणें प्रथमरजोदर्शनाचें फल समजावें .

अथस्त्रीसंसर्गवर्जनमाह वसिष्ठः प्रभूतदोषेयदिदृश्यतेतत्पुष्पंतदाशांतिककर्मकार्यम् ‍ विवर्जयेदेवतदैकशय्यांयावद्रजोदर्शनमुत्तमेह्नि ज्योतिर्निबंधेवसिष्ठः आद्यर्तौपौषशुक्रोर्जमधुशुचिनभस्याः कुयुक् ‍ पापवारारिक्तामार्काष्टषष्ठ्यः पितृपरसदनेरात्रिसंध्यापराह्णे मिश्रोग्रामूलतीक्ष्णंविवरमनरुणाल्पाधिकास्त्रंगराष्टोत्पातः पापस्यलग्नंनसदरुणजरन्नीलचित्रांबरंच आद्यर्तौदुर्भगानारीविष्कंभेचेद्रजस्वला वंध्याचैवातिगंडेचशूलेशूलवतीभवेत् ‍ गंडेतुपुंश्चलीनारीव्याघातेचात्मघातिनी वज्रेचस्वैरिणीप्रोक्तापातेचपतिघातिनी परिघेमृतवंध्याचवैधृतौपतिमारिणी शेषाः शुभावहायोगायथानामफलप्रदाः ।

आतां स्त्रीसंबंध वर्ज्य सांगतो . वसिष्ठ - " जेव्हां पुष्कळ दोष असतां प्रथम रजोदर्शन होईल तेव्हां शांति करावी , जोंपर्यंत उत्तम दिवशीं रजोदर्शन होई तोंपर्यंत स्त्रीसंयोग वर्ज्यच करावा . " ज्योतिर्निबंधांत वसिष्ठ - " पौष , ज्येष्ठ , कार्तिक , चैत्र , आषाढ , भाद्रपद हे मास ; निंद्य योग ; पापवार ( रविवार , मंगळवार , शनिवार ); रिक्ता तिथि ( ४।९।१४ ), अमावास्या , द्वादशी , अष्टमी , षष्ठी , ह्या तिथि ; पितृगृह ; परगृह ; रात्रि ; संध्यासमय ; अपराह्णकाल ; मिश्र ( कृत्तिका , विशाखा ), उग्र ( पूर्वा , पूर्वाषाढा , पूर्वाभाद्रपदा , मघा , भरणी ), तीक्ष्ण ( आश्लेषा , ज्येष्ठा , आर्द्रा ) हीं नक्षत्रें ; तिथि , वार इत्यादिकांचा संधि ; अरुण भिन्न वर्णाचें अल्प किंवा अधिक असें रक्त ; गरजकरणापासून पुढचीं आठ करणें ; उत्पात ; पापग्रहाच्या राशीचें लग्न ; अरुण , जीर्ण , नील व चित्र असें वस्त्र ; हीं प्रथम रजोदर्शनाचे ठायीं चांगलीं नाहींत . " " स्त्री विष्कंभयोगावर प्रथम रजस्वला झाली तर दुर्भाग्ययुक्त होते . अतिगंडावर वंध्या होते . शूलयोगावर झाली तर शूलयुक्त होते . गंडयोगावर झाली तर जारिणी होते . व्याघातयोगावर झाली तर आत्मघातकी होते . वज्रयोगावर झाली तर जारिणी होते . व्यतीपातावर झाली तर पतिघातकी होते . परिघावर झाली तर मृतवंध्या ( मुलें मरणारी , मरतवांझ ) होते . वैधृतीवर झाली तर पतीस मारणारी होते . बाकीचे शुभकारक योग आपल्या नांवासारखें फल देणारे आहेत . "

N/A

References : N/A
Last Updated : June 24, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP