मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|द्वितीय परिच्छेद|
होलिकोत्सव

द्वितीय परिच्छेद - होलिकोत्सव

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


फाल्गुनपौर्णमासीहोलिका साचसायाह्नव्यापिनीग्राह्या सायाह्नेहोलिकांकुर्यात्पूर्वाह्णेक्रीडनंगवामितिवचनादितिनिर्णयामृतेउक्तम् ‍ ज्योतिर्निबंधेतु प्रतिपद्भूतभद्रासुयार्चिताहोलिकादिवा संवत्सरंचतद्राष्ट्रंपुरंदहतिसाद्भुतम् ‍ प्रदोषव्यापिनीग्राह्यापौर्णिमाफाल्गुनीसदा तस्यांभद्रामुखंत्यक्त्वापूज्याहोलानिशामुखइति नारदवचनात्प्रदोषव्यापिनीत्युक्तम् ‍ हेमाद्रौमदनरत्नेचभविष्ये अस्यांनिशागमेपार्थसंरक्ष्याः शिशवोगृहे गोमयेनोपलिप्तेचसचतुष्केगृहांगणेइत्यादिनातत्रैवतद्विधानाच्च तेनेयंपूर्वविद्धा श्रावणीदुर्गनवमीदूर्वाचैवहुताशनी पूर्वविद्धैवकर्तव्याशिवरात्रिर्बलेर्दिनमितिबृहद्यमब्रह्मवैवर्तोक्तेश्च दिनद्वयेप्रदोषव्याप्तौपरैवपूर्वदिनेभद्रासत्त्वात्तत्रचहोलिकानिषेधात् ‍ तदुक्तंनिर्णयामृतेमदनरत्नेचपुराणसमुच्चये भद्रायांदीपिताहोलीराष्ट्रभंगंकरोतिवै नगरस्यचनैवेष्टातस्मात्तांपरिवर्जयेत् ‍ तथा भद्रायांद्वेनकर्तव्येश्रावणीफाल्गुनीतथा श्रावणीनृपतिंहंतिग्रामंदहतिफाल्गुनी तथा दिनार्धात्परतोपिस्यात्फाल्गुनीपौर्णिमायदि रात्रौभद्रावसानेतुहोलिकादीप्यतेतदेति यदातुपूर्वदिनेचतुर्दशीप्रदोषव्यापिनीपरदिनेचक्षयवशात्सायाह्नात्प्रागेवपूर्णिमासमाप्यते तदापूर्वदिनेसंपूर्णरात्रौभद्रासत्त्वात्तत्रचतन्निषेधात् ‍ परेऽहनिप्रतिपद्येंवकुर्यात् ‍ सार्धयामत्रयंवास्याद्दितीयदिवसेयदा प्रतिपद्वर्धमानातुतदासाहोलिकास्मृतेतिभविष्यवचनादितिनिर्णयामृतकारः मदनरत्नेऽप्येवम् ‍ यत्तु वह्नौवह्निंपरित्यजेदितिभविष्यम् ‍ व ह्नौहोलिकायांवह्निंप्रतिपदंवर्जयेदित्यर्थः तदुक्तभिन्नविषयमितितत्रैवोक्तम् ‍ अन्येतुतस्यांभद्रामुखंत्यक्त्वेत्यर्थः प्रदोषव्यापिनीचेत्स्याद्यदापूर्वदिनेतदा भद्रामुखंवर्जयित्वाहोलिकायाः प्रदीपनमितिनारदवचनात् ‍ निशागमेप्रपूज्येतहोलिकासर्वदाबुधैः नदिवापूजयेढ्ढुंढांपूजितादुः खदाभवेदितिदिवोदासीयेवचनात् ‍ यामत्रयोर्ध्वयुक्ताचेत्प्रतिपत्तुभवेत्तिथिः भद्रामुखंपरित्यज्यकार्याहोलामनीषिभिरितिविद्याविनोदेऽभिधानाच्च भद्रामुखंविहायपूर्वदिनएवकार्येत्याहुः भद्रामुखंतु नाड्यस्तुपंचवदनंगलकस्तथैकेतिरत्नमालोक्तंज्ञेयम् ‍ शिष्टाचारोप्येवमेव ।

फाल्गुनपौर्णमासी ही होलिका होय . होलिकेविषयीं ही पूर्णिमा सायाह्नीं ( पांच भाग केलेल्या दिवसाचे पांचव्या भागीं ) असलेली घ्यावी . कारण , " होलिका सायाह्नीं करावी , आणि बलिप्रतिपदेस गोक्रीडन करणें तें पूर्वाह्णीं करावें " असें वचन आहे , असें निर्णयामृतांत सांगितलें आहे . ज्योतिर्निबंधांत तर - " प्रतिपदा , चतुर्दशी व भद्रा ( कल्याणी , पूर्णिमेचें पूर्वार्ध ) यांचे ठायीं आणि दिवसा केलेली जी होळी ती एका वर्षाचे आंत त्या नगरास व राष्ट्रास जाळिते ; म्हणून फाल्गुनी पौर्णिमा सर्वदा प्रदोषव्यापिनी घ्यावी . त्या पौर्णिमेंत भद्रामुख वर्ज्य करुन प्रदोषकालीं होळी पुजावी " ह्या नारदवचनावरुन प्रदोषव्यापिनी पूर्णिमा होळीविषयीं घ्यावी , असें सांगितलें आहे . हेमाद्रींत मदनरत्नांत भविष्यांत - " ह्या पौर्णिमेच्या दिवशीं प्रदोषकालीं बालक बाहेर जातील त्यांना घरांत संरक्षण करुन ठेवावें . आणि गोमयानें सारविलेल्या चतुष्कोण गृहाच्या अंगणांत होळी करावी " इत्यादि वचनानें प्रदोषकालींच होळीचें विधानही आहे . यावरुन ही होलिका पूर्णिमा चतुर्दशीयुक्त घ्यावी , असें होतें . आणि " श्रावणी पूर्णिमा , दुर्गानवमी , दूर्वाष्टमी , होलिकापूर्णिमा , शिवरात्रि चतुर्दशी आणि बलिप्रतिपदा ह्या पूर्वविद्धाच कराव्या " असें बृहद्यमाचें ब्रह्मवैवर्तपुराणाचें वचनही आहे . दोन दिवस प्रदोषव्याप्ति असतां पराच करावी . कारण , पूर्वदिवशीं प्रदोषकालीं भद्रा ( कल्याणी ) असल्यामुळें त्या कल्याणीवर होळीचा निषेध आहे . तें सांगतो निर्णयामृतांत मदनरत्नांत पुराणसमुच्चयांत - " भद्रेवर पेटविलेली होळी राष्ट्राचा नाश करिते . आणि त्या नगरासही ती इष्ट नाहीं . म्हणून होळीविषयीं भद्रा वर्ज्य करावी . " तसेंच - " श्रावणी पौर्णिमेस सांगितलेलें रक्षाबंधन , आणि फाल्गुनी पौर्णिमेस सांगितलेलें होलिका पेटविणें हीं दोन कृत्यें भद्रेवर करुं नयेत . कारण , रक्षाबंधन भद्रेवर केलें असतां राजाचा नाश करितें . आणि होळी पेटविली असतां गांवाला जाळिते . " तसेंच - " जेव्हां दिवसा दोन प्रहरांनंतर फाल्गुनी पौर्णिमा असेल तेव्हां रात्रीं भद्रा संपल्यानंतर होळी पेटवावी . " ज्या वेळीं पूर्वदिवशीं प्रदोषकालीं चतुर्दशी असेल व दुसर्‍या दिवशीं पूर्णिमा तिथि क्षीण झालेली असल्यामुळें सायाह्नाच्या ( पांच भाग केलेल्या दिवसाचे पांचव्या भागाच्या ) पूर्वींच संपत असेल त्या वेळीं पूर्वदिवशीं सार्‍या रात्रींत भद्रा असल्यामुळें त्या भद्रेचे ठायीं होळीचा निषेध असल्याकारणानें परदिवशीं प्रतिपदेंतच होळी करावी . कारण , " दुसर्‍या दिवशीं जेव्हां साडेतीन प्रहर पौर्णिमा असून प्रतिपदा वाढती असेल तेव्हां ती होलिका म्हटली आहे " असें भविष्यवचन आहे , असें निर्णयामृतकार सांगतो . मदनरत्नांतही असेंच आहे . आतां जें - " अग्नीविषयीं अग्नि वर्ज्य करावा , म्हणजे होळीविषयीं प्रतिपदा वर्ज्य करावी " असें भविष्यवचन तें वर सांगितलेल्या व्यतिरिक्त पौर्णिमाव्याप्तिविषयीं आहे , असें तेथेंच सांगितलें आहे . इतर ग्रंथकार तर - तिचे ठायीं भद्रामुख टाकून , असा अर्थ सांगतात . कारण , " जेव्हां पूर्वदिवशीं प्रदोषव्यापिनी पूर्णिमा असेल तेव्हां भद्रामुख वर्ज्य करुन होळी पेटवावी " ह्या नारदवचनावरुन ; व " सर्वदा प्रदोषकालीं विद्वानांनीं होलिका पुजावी . दिवसा होलिका पुजूं नये . कारण , दिवसा पुजली तर दुःख देणारी होईल . " ह्या दिवोदासीयांतील वचनावरुन ; आणि " तीन प्रहरांपुढें प्रतिपदा तिथि असेल तर पूर्व दिवशीं भद्रामुख वर्ज्य करुन विद्वानांनीं होलिका करावी " असें विद्याविनोदांत सांगितल्यावरुनही भद्रामुख टाकून पूर्वदिवशींच होलिका करावी , असें सांगतात . भद्रामुख कोणतें म्हणाल तर सांगतो - " पूर्णिमेचें पूर्वार्ध भद्रा होय . त्या भद्रेच्या चवथ्या पादाच्या पहिल्या पांच घटिका भद्रामुख होय . आणि एक घटिका गलक ( गळा ) म्हटला आहे " असें रत्नमालेंत सांगितलेलें भद्रामुख समजावें . शिष्टाचारही असाच ( भद्रामुख सोडून पूर्वदिवशींच करण्याचा ) आहे .

अत्रचेच्चंद्रग्रहणंतदाततोर्वाड्निःशिभद्रावर्ज्यपौर्णमास्यांहोलिकादीपनम् ‍ अथपरेह्निग्रस्तोदयस्तदापूर्वदिनेभद्रावर्ज्यंरात्रौचतुर्थयामेविष्टिपुच्छेवाहोलिकाकार्या ग्रहोत्तरंप्रतिपत्सत्त्वात्तत्पूर्वंचदिवाहोलानिषेधादितिदिवोदासचंद्रप्रकाशौ वस्तुतस्तुपरदिनेप्रदोषेपौर्णमासीसत्त्वेकर्मकालस्पर्शेचतुर्थयामादिगौणकालग्रहणेमानाभावाद्भद्राभावाच्चग्रहणकालएवहोलाकार्या नच सर्वेषामेववर्णानांसूतकंराहुदर्शने स्नात्वाकर्माणिकुर्वीतशृतमन्नंविवर्जयेदितिनिषेधात् ‍ कथंसूतकेहोलेतिवाच्यम् ‍ तस्योत्तरार्धशेषत्वात् ‍ पूजामंत्रस्तु असृक्पाभयसंत्रस्तैः कृतात्वंहोलिबालिशैः अतस्त्वांपूजयिष्यामिभूतेभूतिप्रदाभवेति यत्तुवार्तिककारैर्होलिकाआचारप्राप्तेत्युक्तम् ‍ तत्रहेमाद्याद्युदाह्रतभविष्यवचनान्यसिद्धानिकृत्वाचिंताज्ञेया आर्त्यधिकरणवत् ‍ हुताशनीमलमासेनभवति इयंमन्वादिरपि सातुपौर्वाह्णिकीग्राह्या मलमासेसतिमन्वादिश्राद्धंमासद्वयेकार्यमित्युक्तंप्राक् ‍ कृत्यचिंतामणौब्राह्मे नरोदोलागतंदृष्ट्वागोविंदंपुरुषोत्तमं फाल्गुन्यांसंयतोभूत्वागोविंदस्यपुरंव्रजेत् ‍ ।

ह्या पौर्णिमेस जर चंद्रग्रहण असेल तर चंद्रग्रहणाच्या पूर्वी रात्रीं भद्रारहित पौर्णिंमेंत होळी पेटवावी . आतां जेव्हां दुसर्‍या दिवशीं चंद्राचा ग्रस्तोदय असेल तेव्हां पूर्वदिवशीं रात्रीं भद्रा टाकून चवथ्या प्रहरीं किंवा भद्रापुच्छावर होलिका करावी . कारण , दुसर्‍या दिवशीं ग्रहण संपल्यानंतर प्रतिपदा असल्यामुळें प्रतिपदेंत होळीचा निषेध आहे . आणि ग्रहणापूर्वी म्हटलें तर दिवसा होळीचा निषेध आहे , असें दिवोदास चंद्रप्रकाश सांगतात . वास्तविक म्हटलें तर - दुसर्‍या दिवशीं प्रदोषकालीं पौर्णिमा असतां व तिचा कर्मकालाला स्पर्श असतां पूर्वरात्रीं पहांटेस चवथा प्रहर व भद्रापुच्छ इत्यादि गौण कालाचें ग्रहण करण्याविषयीं प्रमाण नसल्यामुळें व प्रदोषकालीं भद्रा नसल्यामुळें ग्रहणकालींच होळी करावी . आतां " राहुदर्शन झालें असतां ब्राह्मणादि सर्वही वर्णांना सूतक आहे , म्हणून स्नान करुन विहित कर्मै करावीं , आणि शिजविलेलें अन्न असेल तें टाकावें " ह्या वचनानें निषेध असल्यामुळें सूतकांत होळी कशी होईल ? अर्थात् ‍ होणार नाहीं ; असें बोलूं नये . कारण , तें राहुदर्शननिमित्त सूतक पुढच्या अर्धांत सांगितलेल्या कर्मविषयक आहे . होळीविषयीं नाहीं . होळीच्या पूजेचा मंत्र - ‘ असृक्पाभयसंत्रस्तैः कृता त्वं होलि बालिशैः ॥ अतस्त्वां पूजयिष्यामि भूते भूतिप्रदा भव ॥ ’

होलिका मलमासांत होत नाहीं . ही फाल्गुनी पूर्णिमा मन्वादिही आहे . ती तर मन्वादिश्राद्धाविषयीं पूर्वाह्णव्यापिनी घ्यावी . फाल्गुन मलमास असतां मन्वादिश्राद्ध दोन्ही मासांत करावें , असें पूर्वीं सांगितलें आहे . कृत्यचिंतामणींत ब्रह्मपुराणांत - " फाल्गुनी पौर्णिमेस मनुष्यानें नियमित होऊन गोविंद पुरुषोत्तमाला दोलेंत बसवून त्याला झोंपी काढून त्याचें दर्शन घेतल्यानें तो मनुष्य वैकुंठास जाईल . "

N/A

References : N/A
Last Updated : June 21, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP