मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|द्वितीय परिच्छेद|
कुंभसंक्रांती

द्वितीय परिच्छेद - कुंभसंक्रांती

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


आतां फाल्गुनमासाचीं कृत्यें सांगतो -

कुंभेषोडशघटिकाः पुण्याः शेषंप्राग्वत् ‍ फाल्गुनकृष्णाष्टम्यांविशेषः कल्पतरौ फाल्गुनस्यचमासस्यकृष्णाष्टम्यांमहीपते इत्युपक्रम्य जातादाशरथेः पत्नीतस्मिन्नहनिजानकी उपोषितोरघुपतिः समुद्रस्यतटेतदा रामपत्नीचसंपूज्यासीताजनकनंदिनीति ।

कुंभसंक्रांतीला पूर्वीच्या सोळा घटिका पुण्यकाळ . इतर सर्व निर्णय प्रथमपरिच्छेदांत सांगितल्याप्रमाणें समजावा . फाल्गुन कृष्ण अष्टमीस विशेष सांगतो कल्पतरुंत - " हे राजा ! फाल्गुन कृष्ण अष्टमीचे दिवशीं " असा उपक्रम करुन " दाशरथि रामाची पत्नी जानकी त्या दिवशीं झाली . त्या दिवशीं रघुपति राम समुद्राच्या तीरीं उपोषित राहिला होता . रामाची पत्नी व जनकाची कन्या जी सीता तिची त्या दिवशीं पूजा करावी . "

N/A

References : N/A
Last Updated : June 21, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP