मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|द्वितीय परिच्छेद|
रथसप्तमी

द्वितीय परिच्छेद - रथसप्तमी

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


माघशुक्लसप्तमीरथसप्तमी साअरुणोदयव्यापिनीग्राह्या सूर्यग्रहणतुल्यातुशुक्लामाघस्यसप्तमी अरुणोदयवेलायांतस्यांस्नानंमहाफलमितिचंद्रिकायांविष्णुवचनात् ‍ अरुणोदयवेलायांशुक्लामाघस्यसप्तमी प्रयागेयदिलभ्येतकोटिसूर्यग्रहैः समेतिवचनाच्च यत्तुदिवोदासीये अचलासप्तमीदुर्गाशिवरात्रिर्महाभरः द्वादशीवत्सपूजायांसुखदाप्राग्युतासदेतिषष्ठीयुतत्वमुक्तम् ‍ तद्यदापूर्वेऽह्निघटिकाद्वयंषष्ठीसप्तमीचपरेद्युः क्षयवशादरुणोदयात्पूर्वंसमाप्यतेतत्परंज्ञेयम् ‍ तत्रषष्ठ्यांसप्तमीक्षयंप्रवेश्यारुणोदयेस्नानंकार्यम् ‍ मदनरत्नेभविष्योत्तरे माघेमासिसितेपक्षेसप्तमीकोटिभास्करा कुर्यात्स्नानार्घ्यदानाभ्यामायुरारोग्यसंपदः ।

माघशुक्ल सप्तमी ही रथसप्तमी होय . ती अरुणोदयव्यापिनी घ्यावी . कारण , " माघमासाची शुक्ल सप्तमी सूर्यग्रहणासारखी पुण्यकारक आहे . त्या सप्तमीस अरुणोदयकालीं स्नान केल्यानें मोठें फल प्राप्त होतें . " असें चंद्रिकेंत विष्णुवचन आहे . आणि " प्रयागाचे ठायीं अरुणोदयकालीं माघशुक्ल सप्तमी जर प्राप्त होईल तर ती कोटि सूर्यग्रहणांशीं समान आहे " असें वचनही आहे . आतां जें दिवोदासीयांत - " रथसप्तमी , दुर्गाष्टमी , शिवरात्रि चतुर्दशी , महाभर , आणि गोवत्सद्वादशी ह्या तिथि सर्वदा पूर्वयुक्त घ्याव्या , त्या सुखदायक होतात . " ह्या वचनानें रथसप्तमी षष्ठीयुक्त घ्यावी असें सांगितलें , तें ज्या वेळीं पूर्वदिवशीं षष्ठी दोन घटिका आणि त्याच दिवशीं सप्तमी असून दुसर्‍या दिवशीं अरुणोदयाचे पूर्वीं समाप्त होत असेल त्या वेळीं षष्ठीयुक्त घ्यावी , असा त्याचा अभिप्राय समजावा . त्या ठिकाणीं ‘ तिथ्यादौ तु भवेद्यावान् ‍ ह्नासो वृद्धिः परे‍ऽहनि । तावान् ‍ ग्राह्यः स पूर्वेद्युरदृष्टोपि स्वकर्मणि ’ या वचनावरुन सप्तमीच्या क्षयघटिका जितक्या असतील तितक्या घटिका षष्ठींत सप्तमी आहे असें समजून षष्ठींतच अरुणोदयकालीं स्नान करावें . मदनरत्नांत भविष्योत्तरांत - " माघमासांत शुक्ल पक्षांतील सप्तमी कोटिभास्करतुल्य आहे ; ती स्नान व अर्घ्यदान केल्यानें आयुष्य , आरोग्य व संपत्ति यांना देते . "

अत्रविधिर्भविष्ये स्नात्वाषष्ठ्यामेकभक्तंसप्तम्यांनिश्चलंजलम् ‍ रात्र्यंतेचालयेथास्त्वंदत्वाशिरसिदीपकम् ‍ तथाजलंप्रक्रम्य नकेनचाल्यतेयावत्तावत्स्नानंसमाचरेत् ‍ सौवर्णेराजतेपात्रेभक्त्यालाबुमयेथवा तैलेनवर्तिर्दातव्यामहारजनरंजिता महारजनंकुसुंभम् ‍ समाहितमनाभूत्वादत्वाशिरसिदीपकम् ‍ भास्करंह्रदयेध्यात्वा इमंमंत्रमुदीरयेत् ‍ नमस्तेरुद्ररुपायरसानांपतयेनमः वरुणायनमस्तेस्तुहरिवासनमोस्तुते जलेपरिहरेद्दीपंध्यात्वासंतर्प्यदेवताइति चंदनेनलिखेत्पद्ममष्टपत्रंसकर्णिकम् ‍ मध्येशिवंसपत्नीकंप्रणवेनचसंयुतम् ‍ पूर्वादिदलेषुरविभानुविवस्वद्भास्करसवित्रर्कसहस्त्रकिरणसर्वात्मकान् ‍ संपूज्यगृहंगच्छेदिति स्नानमंत्रश्चकाशीखंडे यद्यज्जन्मकृतंपापंमयासप्तसुजन्मसु तन्मेरोगंचशोकंचमाकरीहंतुसप्तमी एतज्जन्मकृतंपापंयच्चजन्मांतरार्जितम् ‍ मनोवाक्कायजंयच्चज्ञाताज्ञातेचयेपुनः इतिसप्तविधंपापंस्नानान्मेसप्तसप्तिके सप्तव्याधिसमायुक्तंहरमाकरिसप्तमि एतन्मंत्रत्रयंजप्त्वास्नात्वापादोदकेनरः केशवादित्यमालोक्यक्षणान्निः कलुषोभवेत् ‍ ।

या सप्तमीचे दिवशीं विधि सांगतो भविष्यांत - " षष्ठीचे दिवशीं स्नान करुन एकभक्त करावें . आणि रात्रीच्या अंतीं ( पहांटेस ) सप्तमींत मस्तकावर दीप ठेऊन निश्चल ( कोणी न चाळविलेलें ) जल चाळवावें . " तसेंच - उदकाचा उपक्रम करुन सांगतो - " जोंपर्यंत कोणीही उदक चाळविलें नाहीं तोंपर्यंत उदकांत जाऊन स्नान करावें . सोन्याच्या किंवा रुप्याच्या अथवा भोपळ्याच्या पात्रांत तेल घालून कुसुंभाच्या रंगानें रंगविलेली वात घालून दीप लावावा . आणि मन स्वस्थ करुन मस्तकावर दिवा धरुन ह्रदयाचेठायीं भास्कराचें ध्यान करुन हा पुढील मंत्र म्हणावा . " तो मंत्र असाः - " नमस्ते रुद्ररुपाय रसानां पतये नमः ॥ वरुणाय नमस्तेस्तु हरिवास नमोस्तुते . " या मंत्रानें ध्यान करुन उदकामध्यें दीप द्यावा , व देवतांचें तर्पण करावें . " चंदनानें अष्टदलांचें कर्णिकायुक्त कमल काढावें . मध्यें पत्नीसहित ओंकारयुक्त शिवाची आणि पूर्वादि आठ पत्रांचे ठायीं रवि , भानु , विवस्वान् ‍, भास्कर , सविता , अर्क , सहस्त्रकिरण , सर्वात्मा , यांची पूजा करुन गृहास जावें . स्नानमंत्र सांगतो - काशीखंडांतः - " यद्यज्जन्मकृतं पापं मया सप्तसु जन्मसु ॥ तन्मे रोगं च शोकं च माकरी हंतु सप्तमी ॥१॥ एतज्जन्मकृतं पापं यच्च जन्मांतरार्जितं ॥ मनोवाक्कायजं यच्च ज्ञाताज्ञाते च ये पुनः ॥२॥ इति सप्तविधं पापं स्नानान्मे सप्तसप्तिके ॥ सप्तव्याधिसमायुक्तं हर माकरि सप्तमि ॥३॥ हे तीन मंत्र जपून पादोदका ( गंगे ) मध्यें स्नान करुन केशवादित्याचें दर्शन घेईल तो मनुष्य क्षणांत निष्पाप होईल . "

दिवोदासीये मदनरत्नेच इक्षुदंडेनजलंचालयित्वासप्तार्कपत्राणिबदरीपत्राणिचशिरसिनिधायपूर्वोक्तैर्मंत्रैः स्नात्वातिलपिष्टमयापूपैर्हैमंसूर्यंसंपूज्यविप्रायदद्यात् ‍ अर्घ्यमंत्रोमदनरत्ने सप्तसप्तिवहप्रीतसप्तलोकप्रदीपन सप्तमीसहितोदेवगृहाणार्घ्यंदिवाकर ततः जननीसर्वलोकानांसप्तमीसप्तसप्तिके सप्तव्याह्रतिकेदेविनमस्तेसूर्यमंडलइतिप्रार्थयेत् ‍ सौरागमे अर्कपत्रैः सबदरैर्दूर्वाक्षतसचंदनैः अष्टांगविधिनाचार्घ्यंदद्यादादित्यतुष्टये अत्रदानविशेषोमदनरत्नेभविष्ये ताम्रपात्रेयथाशक्त्यामृन्मयेवाथभक्तिमान् ‍ स्थापयेत्तिलपिष्टंचसघृतंसगुडंतथा कांचनंतालकंकृत्वाअशक्तस्तिलपिष्टजम् ‍ संच्छाद्यरक्तवस्त्रेणपुष्पैर्धूपैरथार्चयेत् ‍ दानमंत्रस्तु आदित्यस्यप्रसादेनप्रातः स्नानफलेनच दुष्टदौर्भाग्यदुः खघ्नंमयादत्तंतुतालकम् ‍ तालकंकर्णाभरणमितितत्रैवोक्तम् ‍ दीपपात्रमितिहेमाद्रौ तत्रैवभविष्योत्तरे एवंविधंरथवरंरथवाजियुक्तंहैमंचहैमशतदीधितिनासमेतम् ‍ दद्याच्चमाघसितसप्तमिवासरेयः सोसंगचक्रगतिरेवमहींभुनक्ति इयंमन्वादिरपि इयंचशुक्लपक्षस्थत्वात्पौर्वाह्णिकीग्राह्या यदामाघोमलमासोभवतितदामासद्वयेमन्वादिश्राद्धंकुर्यात् ‍ मन्वादिकंतैर्थिकंचकुर्यान्मासद्वयेपिचेतिस्मृतिचंद्रिकोक्तेः ।

दिवोदासीयांत व मदनरत्नांतही सांगतो - उंसाचे दंडानें उदक चाळवून रुईचीं सात पानें व बोरीचीं सात पानें मस्तकावर ठेवून वर सांगितलेल्या मंत्रांनीं स्नान करुन तिलपिष्टाच्या अपूपांनीं सुवर्णाच्या सूर्यप्रतिमेची पूजा करुन ती प्रतिमा ब्राह्मणाला द्यावी . अर्घ्यमंत्र - मदनरत्नांत सांगतो - " सप्तसप्तिवहप्रीत सप्तलोकप्रदीपन ॥ सप्तमीसहितो देव गृहाणार्घ्यं दिवाकर ॥ " नंतर " जननी सर्वलोकानां सप्तमी सप्तसप्तिके ॥ सप्तव्याह्रतिके देवि नमस्ते सूर्यमंडले ॥ " या मंत्रानें प्रार्थना करावी . सौरागमांत - " आदित्याच्या संतोषार्थ रुईचीं पानें , बोरें , दूर्वा , अक्षता , चंदन यांहींकरुन अष्टांगविधीनें अर्घ्य द्यावें . " या सप्तमीस विशेष दान सांगतो मदनरत्नांत भविष्यांत - " भक्तिमान् ‍ मनुष्यानें तांब्याच्या पात्रांत किंवा आपल्या शक्तीप्रमाणें मृन्मयपात्रांत घृतगुडसहित तिळांचे पीठ ठेवावें , त्याजवर सोन्याचें तालक ( कर्णभूषण , तानवड ) करुन व अशक्तानें तिलपिष्टाचें करुन रक्तवस्त्रानें आच्छादित करुन ठेवावें आणि त्याची पुष्पांनीं व धूपांनीं पूजा करावी . " त्याच्या दानाचा मंत्र - " आदित्यस्य प्रसादेन प्रातः स्नानफलेन च ॥ दुष्टदौर्भाग्यदुःखघ्नं मया दत्तं तु तालकम् ‍ ॥ " तालक म्हणजे कर्णभूषण असें तेथेंच सांगितलें आहे . तालक म्हणजे दीपपात्र , असें हेमाद्रींत आहे . तेथेंच भविष्योत्तरांत - " याप्रमाणें सोन्याचा उत्तम रथ घोड्यांसहित करुन त्यांत सुवर्णाचा सूर्य ठेऊन जो मनुष्य माघ शुद्ध सप्तमीच्या दिवशीं ब्राह्मणास देईल त्याच्या रथाच्या गतीचा कोठेंही प्रतिबंध न होतां तो पृथ्वीचा उपभोग घेईल . म्हणजे निष्कंटक पृथ्वीचें राज्य करील . " ही सप्तमी मन्वादिही आहे . ही शुक्लपक्षस्थ असल्यामुळें पूर्वाह्णव्यापिनी घ्यावी . जेव्हां माघ मलमास असेल तेव्हां मलमास व शुद्धमास या दोन्ही मासांत मन्वादिश्राद्ध करावें . कारण , " मन्वादिक श्राद्ध आणि तीर्थश्राद्ध हें दोन्ही मासांत करावें असें स्मृतिचंद्रिकावचन आहे .

N/A

References : N/A
Last Updated : June 21, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP