मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|द्वितीय परिच्छेद|
नागपूजा

द्वितीय परिच्छेद - नागपूजा

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


मार्गशीर्षशुक्लपंचम्यांनागपूजोक्ताहेमाद्रौस्कांदे शुक्लामार्गशिरेपुण्याश्रावणेयाचपंचमी स्नानदानैर्बहुफलानागलोकप्रदायिनीति इयंनागपूजायांषष्ठीयुतैवग्राह्या पंचमीनागपूजायांकार्याषष्ठीसमन्विता तस्यांतुतुषितानागाइतरासचतुर्थिकेतिमदनरत्नेवचनात् ‍ ।

मार्गशीर्षशुक्लपंचमीस नागपूजा सांगतो . - हेमाद्रींत स्कांदांत - " मार्गशीर्षांतील शुक्लपंचमी आणि श्रावणांतील शुक्लपंचमी ह्या पुण्यकारक आहेत ; स्नानदानेंकरुन बहुफलदायक व नागलोक प्राप्त करुन देणार्‍या आहेत . " ही पंचमी नागपूजेविषयीं षष्ठीयुक्तच घ्यावी . कारण , " नागपूजेविषयीं पंचमी षष्ठीयुक्त घ्यावी , त्या षष्ठीयुक्त पंचमीस नाग संतुष्ट होतात . इतर पंचमी चतुर्थीयुक्त घ्यावी . " असें मदनरत्नांत वचन आहे .

N/A

References : N/A
Last Updated : June 21, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP