मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|द्वितीय परिच्छेद|
नवरात्रपारणानिर्णय

द्वितीय परिच्छेद - नवरात्रपारणानिर्णय

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


आतां नवरात्रपारणानिर्णय सांगतो .

अथनवरात्रपारणानिर्णयः साचदशम्यांकार्या आश्विनेमासिशुक्लेतुकर्तव्यंनवरात्रकम् ‍ प्रतिपदादिक्रमेणैव यावच्चनवमीभवेत् ‍ त्रिरात्रंवापिकर्तव्यंसप्तम्यादियथाक्रममितिहेमाद्रौधौम्यवचनात् ‍ नवमीतिथिपर्यंतंवृद्ध्यापूजाजपादिकमितिप्रागुक्तवचनैर्नवमीपर्यंतंप्रधानभूतपूजाद्युक्तेरुपवासादेश्चांगत्वेनतत्पर्यंतत्वात् ‍ आदिशब्देनोपवासोक्तेः पूर्वोक्तत्रिरात्रव्रतेनवम्याअप्युपोष्यत्वाच्च नचपारणांतत्वेनत्रिरात्रत्वं विष्णुत्रिरात्रादौतथा प्रसक्तेः नचात्रोपवासेमानाभावइतिवाच्यम् ‍ एवंचविंध्यवासिन्यांनवरात्रोपवासतः एकभक्तेननक्तेनतथैंवायाचितेनच पूजनीयाजनैर्देवीस्थानेस्थानेपुरेपुरइतिहेमाद्रौभविष्योक्तेः नवरात्रसमाख्यातोनवम्याअप्युपोष्यत्वाच्च ननुतिथिह्रासेऽष्टावप्युपवासाभवंतीतिकथंसमाख्या तेनकर्मविशेषेनवरात्रशब्दोरुढः अतएवोक्तंदेवीपुराणे तिथिवृद्धौतिथिह्नासेनवरात्रमपार्थकमितिचेन्न तिथिह्नासेपिनवतिथीनामुपोष्यत्वान्नवरात्रत्वाक्षतेः एतेन रात्रीणांप्राधान्यात् ‍ ह्नासेअमामादायनवत्वमितिमूर्खोक्तिः परास्ता यत्तुदेवीपुराणे कन्या संस्थेरवौशक्रशुक्लामारभ्यनंदिकाम् ‍ अयाचीह्यथवैकाशीनक्ताशीप्यथवांब्वदइतिव्रतचतुष्टयमुक्तंतल्लौहाभिसारिकविषयम् ‍ तस्य जयाभिलाषीनृपतिः प्रतिपत्प्रभृतिक्रमात् ‍ लौहाभिसारिकंकर्मकारयेद्यावदष्टमीमितिभविष्येऽष्टमीपर्यंतत्वमेवोक्तेः रुपनारायणेनतुनंदादिव्रतप्रयोगंपृथगेवोक्त्वातस्यनवम्यांपारणमुक्तम् ‍ यदपिनिर्णयदीपे आश्विनेशुक्लपक्षेतुनवरात्रमुपोषितः नवम्यांपारणंकुर्याद्दशमीमिश्रितानचेत् ‍ दशमीमिश्रितायत्रपारणेनवमीभवेत् ‍ दुःखदारिद्यदाज्ञेयातथाव्रतविनाशिनीतिब्राह्मनाम्नालिखितंवचनं यच्चरुद्रयामलइतिवदंति अष्टम्यासहकार्यास्यान्नवमीपारणादिने योमोहाद्दशमीवेधेनवम्यांचंडिकांयजेत् ‍ पारणंचप्रकुर्याद्वैतस्यपुण्यंनिरर्थकम् ‍ नवम्यांपारितादेवीकुलवृद्धिंप्रयच्छति दशम्यांपारितादेवीकुलनाशंकरोतिवै तस्मात्तुपारणंकुर्यान्नवम्यांविबुधाधिपेत्यादीनि तानियदिसमूलानितदालौहाभिसारिकनंदादिव्रतचतुष्ट्यविषयाणि तस्याऽष्टमीपर्यंतत्वमेवोक्तेरित्युक्तंप्राक् ‍ अन्यथामहाष्टम्यांपरविद्धायांपारणाविधानेपूर्वनिबंधैर्विरोधोदुर्वारः स्यात् ‍ यानितुकैश्चिल्लिखितानिनवम्यांपारणाविधायकानिवचनानितानिहेमाद्यादिविरुद्धत्वान्निर्मूलानि समूलत्वेपियदादिनद्वयेनवमीतदाद्वितीयदिनउपोष्यतिथ्यंतेपारणान किंतुनवमीमध्येकार्येत्येवंनेयानि शिवरात्रिपारणावत् ‍ ।

ती पारणा दशमीचेठायीं करावी . कारण , " आश्विनमहिन्यामध्यें शुक्लपक्षांत नवरात्र करावें , तें प्रतिपदेपासून नवमीपर्यंत करावें . अथवा सप्तमीपासून त्रिरात्र करावें . " ह्या हेमाद्रींतील धौम्यवचनावरुन ; व " नवमी तिथीपर्यंत वृद्धीनें पूजा , जप , उपवास इत्यादिक करावीं " ह्या पूर्वोक्त वचनांनीं नवमीपर्यंत मुख्य पूजादिक सांगितल्यावरुन उपवासादिक अंगभूत कर्मैं तेथपर्यंत करावीं , असें झालें आहे . ‘ जपादिकं ’ येथें आदिशब्दानें उपवास सांगितला आहे . आणि पूर्वोक्त त्रिरात्रव्रतांत नवमीचेंही उपोषण सांगितलें आहे . आतां तें त्रिरात्रव्रत असें होतें कीं , दोन दिवस उपोषण व तिसर्‍या दिवशीं पारणा , असें केल्यानें पारणापर्यंत व्रत धरुन तें त्रिरात्र होतें , असें म्हणूं ? तर तसें म्हणतां येणार नाहीं . कारण , विष्णुत्रिरात्रादि व्रताचेठायीं देखील तसा प्रसंग ( पारणासहित त्रिरात्र ) येईल . आतां ह्या नवरात्रव्रताचेठायीं उपवास करण्याविषयीं प्रमाण नाहीं , असें म्हणूं ? तर असें म्हणतां कामा नये ; कारण , " नवरात्र उपवास किंवा एकभक्त किंवा नक्त अथवा अयाचितभ क्षण करुन नगरानगरामध्यें जागोजागीं विंध्यवासिनी देवीचें पूजन करावें . " असें हेमाद्रींत भविष्यवचन आहे आणि नवरात्र असें नाम असल्याकारणानें नवमीचे दिवशींही उपोषण आवश्यक आहे . शंका - तिथिक्षय असतां जर आठही उपवास होतात तर नवरात्र असें नाम कसें ? यावरुन विशेष कर्माचे ठायीं नवरात्र शब्द रुढ आहे . नव रात्रींनीं होणारें तें नवरात्र असा यौगिक समजूं नये . म्हणूनच देवीपुराणांत सांगतो . " तिथिवृद्धि व तिथिक्षय असतां नवरात्र शब्द व्यर्थ आहे . " यावरुन नवरात्र शब्द अन्वर्थक होण्याकरितां नवमीचे दिवशींही उपोषण करावें , असें नाहीं ? समाधान - ‘ नवरात्र ’ हा शब्द नऊ रात्रींचा बोधक यौगिकच आहे . रात्रि म्हणजे तिथि समजावी . तिथिक्षय असला तरी नऊ तिथींचें उपोषण होत असल्यामुळें नवरात्रत्व नष्ट होत नाहीं . ‘ नवरात्र ’ या पदांत रात्र शब्द तिथिबोधक आहे . यावरुन , रात्री प्रधान असल्यामुळें तिथिक्षय असता अमावास्या धरुन नऊ रात्रि कराव्या , असें मूर्खानें सांगितलें तें खंडित झालें . आतां जीं देवीपुराणांत - " कन्यासंक्रांतीस सूर्य असतां शुक्लप्रतीपदेस आरंभ करुन अयाचित अथवा एकभुक्त किंवा नक्त अथवा उदकभक्षण करावें " अशीं चारप्रकारचीं व्रतें सांगितलीं ; तीं पूर्वोक्त लौहाभिसारिक कर्मविषयक आहेत . कारण , तें लौहाभिसारिक कर्म " जयेच्छु राजानें प्रतिपदेपासून अनुक्रमानें अष्टमीपर्यंत लौहाभिसारिक कर्म करवावें " ह्या भविष्यवचनांत अष्टमीपर्यंतच सांगितलें आहे . रुपनारायणानें तर - प्रतिपदादि व्रतप्रयोग वेगळाच सांगून त्याची नवमींत पारणा

सांगितली आहे . आणि जें निर्णयदीपांत - " आश्विनशुक्लपक्षांत नवरात्र उपोषण करुन दशमीमिश्रित नसेल त्या नवमींत पारणा करावी . जेथें पारणाविषयीं दशमीमिश्रित नवमी असेल तेथें ती नवमी दुःखदारिद्य देणारी व व्रतनाश करणारी होते " असें ब्रह्मपुराणांतील म्हणून लिहिलेलें वचन तें ; आणि जें रुद्रयामलांत म्हणून सांगतात कीं , " अष्टमीयुक्त नवमींत पारणा करावी . जो मोहानें दशमीयुक्त नवमींत चंडिकेचें पूजन करील व पारणाही करील त्याचें पुण्य निरर्थक होईल . देवीची पारणा नवमीस केली तर कुलवृद्धि होते , व दशमीस देवीची पारणा केली तर कुलनाश होतो ; तस्मात् ‍ नवमीस पारणा करावी . " इत्यादि वचनें तीं जर समूल असतील तर लौहाभिसारिक कर्मांत जीं चार व्रतें सांगितलीं तद्विषयक जाणावीं . तें लौहाभिसारिक कर्म अष्टमीपर्यंतच करावें , असें पूर्वीं सांगितलें आहे . तसें नसेल तर परविद्ध महाष्टमीचेठायीं ( नवमींत ) पारणाविधान केलें असतां वर सांगितलेल्या ग्रंथांशीं विरोध निवारण करण्यास अशक्य होईल . आतां जीं केचित् ‍ ग्रंथकारांनीं वचनें नवमीचेठायीं पारणा करण्याविषयीं लिहिलीं आहेत , तीं हेमाद्यादि ग्रंथविरुद्द असल्यामुळें निर्मूल होत , समूल असलीं तरी जेव्हां दोनदिवशीं नवमी असेल तेव्हां दुसर्‍या ( उर्वरित ) नवमीदिवशीं उपोषण केलेल्या तिथीच्या अंतीं पारणा करुं नये , तर नवमीमध्यें करावी , अशाविषयीं लावावीं . जशी शिवरात्रीची पारणा

दुसर्‍या दिवशीं चतुर्दशींत सांगितली , तद्वत् ‍.

अत्रकेचित्पारणाहेसूतकादिप्राप्तौतदतिक्रम्यपारणांकुर्यादित्याहुः तन्मंदम् ‍ काम्योपवासेप्रक्रांतेत्वंतरामृतसूतके तत्रकाम्यव्रतंकुर्याद्दानार्चनविवर्जितमितिमाधवीयेकौर्मोक्तेः व्रतयज्ञविवाहेषुश्राद्धेहोमेर्चनेजपे प्रारब्धेसूतकंनस्यादनारब्धेतुसूतकमितिविष्णुवचनाच्चाशौचमध्येपितत्कर्तव्यतावगतेः पारणांतत्वाद्व्रतस्यप्रारंभस्तुतेनैवोक्तः प्रारंभोवरणंयज्ञेसंकल्पोव्रतसत्रयोः नांदीमुखंविवाहादौश्राद्धेपाकपरिक्रियेति रुद्रयामलेपि सूतकेपारणंकुर्यान्नवम्यांहोमपूर्वकम् ‍ तदंतेभोजयेद्विप्रान् ‍ दानंदद्याच्चशक्तित इति तदंतेसूतकांते एवंस्त्रीभिरपिरजोदर्शनमध्येकर्तव्यमेवपारणम् ‍ संप्रवृत्तेपिरजसिनत्याज्यंद्वादशीव्रतमितिमाधवीयेऋष्यशृंगवचनात् ‍ द्वादशीव्रतमित्युपलक्षणम् ‍ प्रारब्धदीर्घतपसांनारीणांयद्रजोभवेत् ‍ नतत्रापिव्रतस्यस्यादुपरोधः कदाचनेतितत्रैवसत्यव्रतवचनात् ‍ किंच एकादश्यादौपंचषाशौचपातेमासांतेपारणापत्तिः मासोपवासांतेपंचषाशौचपातेजीवनासंभवश्च यत्तु नियमस्थायदानारीप्रपश्येदंतरारजः उपोष्यैवतुतारात्रीः स्नात्वाशेषंचरेद्व्रतमित्यंगिरोवचनम् ‍ यच्चहारीतवचनम् ‍ नियमस्थाव्रतस्थास्त्रीरजः पश्येत्कथंचन त्रिरात्रंतुक्षिपेदूर्ध्वंव्रतशेषंसमापयेत् ‍ तद्विधवोपवासविषयम् ‍ तासांतत्रभोजननिषेधादितिकेचित् ‍ वयंतुप्रागुक्तसत्यव्रतवचनेदीर्घतपसामिति विशेषणोपादानाद्दूदशीव्यतिरिक्तसकलैकाहोपवासविषयोऽयंनिषेधः त्रिरात्रनवरात्रादिदीर्घव्रतेषुतुरजोमध्येपारणेतिब्रूमः आशौचमध्येतुसर्वापिपारणाभवतिप्रागुक्तकौर्मवचनादितिसिद्धम् ‍ अयंचोपवासपारणानिर्णयः सर्वव्रतेषुबोद्धव्यइत्यलंभूसया ।

येथें केचित् ‍ ग्रंथकार - पारणादिवशीं सूतकादिक प्राप्त असतां तें गेल्यानंतर पारणा करावी असें म्हणतात . तें त्यांचें म्हणणें मंद आहे . कारण , " काम्य उपवासाचा आरंभ केल्यावर मध्यें मृताशौच येईल तर आशौचामध्यें काम्यव्रत करावें . दान व पूजन करुं नये . " ह्या माधवीयांतील कौर्मवचनावरुन ; व " व्रत , यज्ञ , विवाह , श्राद्ध , होम , पूजन , जप यांचा आरंभ केला असतां सूतक असलें तरी सूतक नाहीं . प्रारंभ केला नसेल तर सूतक आहे " ह्या विष्णुवचनावरुनही आरंभिलेलें व्रत आशौचामध्येंही करावें असें होतें . व्रत पारणा होईपर्यंत आहे . प्रारंभ कोणता तो त्यानेंच सांगितला आहे - " यज्ञाचा प्रारंभ ब्राह्मणवरणः व्रत व सत्र यांचा प्रारंभ संकल्प ; विवाहादिकांचा प्रारंभ नांदीश्राद्ध ; आणि श्राद्धाचा प्रारंभ पाकनिष्पत्ति होय . " रुद्रयामलांतही " सूतकामध्यें नवमीस होम करुन पारणा करावी व सूतकाचे समाप्तीनंतर ब्राह्मण भोजन करुन यथाशक्ति दक्षिणा द्यावी . " असेंच स्त्रियांनींही रजोदर्शनामध्यें पारणा करावी . कारण , " रजोदर्शन झालें असतांही द्वादशीव्रत सोडूं नये . " असें माधवीयांत ऋष्यशृंगवचन आहे . द्वादशीव्रत म्हटलें तें इतर व्रतांचें उपलक्षण आहे . कारण , " दीर्घ तपास आरंभ केलेल्या स्त्रियांस त्या तपामध्यें जें रजोदर्शन होतें त्या अवस्थेंतही कधींच व्रतलोप होत नाहीं . " असें माधवीयांत सत्यव्रतवचन आहे . आणखी असें कीं , जर आशौचावस्थेंत पारणा होत नसेल तर एकादश्यादिक व्रताचेठायीं एकानंतर दुसरें , त्यानंतर तिसरें , असें आशौच एकावर एक पांच सहावेळ प्राप्त असतां मासाचे अंतीं पारणा प्राप्त होईल . मासोपवासव्रताचे अंतीं ( एकामागून दुसरें असें ) पांचसहावार आशौच प्राप्त असतां वांचण्याचा असंभवही होईल . आतां जें " जेव्हां व्रतस्थ स्त्री असून मध्यें रजस्वला होईल तेव्हां ते विटाळाचे दिवस उपोषण करुन स्नान केल्यानंतर राहिलेलें व्रत करावें " असें अंगिराचें वचन आणि जें हारीतवचन " नियम धरणारी व्रतस्थ स्त्री रजस्वला होईल तर तीन दिवस गेल्यानंतर तिनें शेष राहिलेलें व्रत समाप्त करावें " तें विधवेच्या उपवासाविषयीं जाणावें . कारण , त्यांस रजोदर्शनावस्थेंत भोजनाचा निषेध आहे ; असें केचित् ‍ म्हणतात . आम्ही तर पूर्वोक्त सत्यव्रतवचनामध्यें ‘ दीर्घतपसां ’ असें विशेषण असल्यामुळें द्वादशीवांचून इतर सकल एकदिवस उपवासाचे पारणेविषयीं हा अंगिरानें व हारीतानें सांगितलेला निषेध होय . त्रिरात्र , नवरात्र इत्यादिक दीर्घव्रताविषयीं तर रजोदर्शनामध्येंही पारणा होते , असें सांगतों . पूर्वोक्त कौर्मवचनावरुन आशौचामध्यें तर सारी पारणा होते , असें सिद्ध झालें . हा उपवासाचे पारणेचा निर्णय सर्व व्रतांविषयीं जाणावा . आतां बहुत सांगणें पुरे करितों .

दशम्यांदेवीविसर्जयेत् ‍ तदुक्तंदुर्गाभक्तितरंगिण्यांदेवीपुराणे ततः प्रातः पूजयित्वादशम्यांविधिपूर्वकम् ‍ संप्रेषणंतुकर्तव्यंगीतवादित्रनिः स्वनैः रुपंदेहियशोदेहिभगंभगवतिदेहिमे पुत्रान्देहिधनंदेहिसर्वकामांश्चदेहिमे महिषघ्निमहामायेचामुंडेमुंडमालिनि आयुरारोग्यमैश्वर्यंदेहिदेविनमोस्तुते इतिसंप्रार्थ्यदेवींतुतत उत्थापयेद्बुधः उत्तिष्ठदेविचंडेशिशुभांपूजांप्रगृह्यच कुरुष्वममकल्याणमष्टाभिः शक्तिभिः सह गच्छगच्छपरंस्थानंस्वस्थानंदेविचंडिके व्रजस्रोतोजलंवृद्ध्यैस्थीयतांचजलेत्विहेति उत्थाप्यजलंनीत्वा दुर्गेदेविजगन्मातः स्वस्थानंगच्छपूजिते संवत्सरेव्यतीतेतुपुनरागमनायवै इमांपूजांमयादेवियथाशक्त्योपपादिताम् ‍ रक्षार्थंत्वंसमादायव्रजस्वस्थानमुत्तममितिजलेप्रवाहयेत् ‍ ।

दशमीचेठायीं देवीचें विसर्जन करावें . तें सांगतो - दुर्गाभक्तितरंगिणींत देवीपुराणांत - " नंतर दशमीस प्रातः काळीं यथाविधि पूजन करुन गायन , वाद्यें यांच्या शब्दांनीं देवीचें संप्रेषण ( विसर्जन ) करावें . प्रार्थनेचे मंत्र - रुपं देहि यशो देहि भगं भगवति देहि मे ॥ पुत्रान् ‍ देहि धनं देहि सर्वकामांश्च देहि मे ॥ महिषघ्नि महामाये चामुंडे मुंडमालिनि आयुरारोग्यमैश्वर्यं देहि देवि नमोस्तु ते ॥ अशी देवीची प्रार्थना करुन नंतर उत्थापन करावेम . उत्थापनाचा मंत्रः - उत्तिष्ठ देवि चंडेशि शुभां पूजां प्रगृह्य च ॥ कुरुष्व मम कल्याणमष्टाभिः शक्तिभिः सह ॥ गच्छ गच्छ परं स्थानं स्वस्थानं देवि चंडिके ॥ व्रज स्रोतोजलं वृद्ध्यै स्थीयतां च जले त्विहे ॥ असें उत्थापन करुन उदकाजवळ नेऊन - दुर्गे देवि जगन्मातः स्वस्थानं गच्छ पूजिते ॥ संवत्सरे व्यतीते तु पुनरागमनाय वै ॥ इमां पूजां मया देवि यथाशक्त्योपपादितां ॥ रक्षार्थं त्वं समादाय व्रज स्वस्थानमुत्तमं ॥ या मंत्रानें उदकांत वाहवावी . "

N/A

References : N/A
Last Updated : May 31, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP